Agriculture news in Marathi बायो-सीएनजी गॅसवर ट्रॅक्टर चालविण्याचा प्रयोग | Agrowon

बायो-सीएनजी गॅसवर ट्रॅक्टर चालविण्याचा प्रयोग

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 9 डिसेंबर 2021

शेती आणि शेतीपूरक व्यवसाय करताना कमी खर्चात अधिकचे दोन पैसे मिळविल्याशिवाय शेतकरी, मजुरांसह वाहनचालकांना पर्याय उरला नाही, त्या उद्देशाने वाहनांमध्ये विकसित झालेली नवनवीन टेक्नॉलॉजी स्वीकारताना आता ग्रामीण भागही पुढे येऊ पाहत आहे.

माळेगाव, जि. पुणे ः शेती आणि शेतीपूरक व्यवसाय करताना कमी खर्चात अधिकचे दोन पैसे मिळविल्याशिवाय शेतकरी, मजुरांसह वाहनचालकांना पर्याय उरला नाही, त्या उद्देशाने वाहनांमध्ये विकसित झालेली नवनवीन टेक्नॉलॉजी स्वीकारताना आता ग्रामीण भागही पुढे येऊ पाहत आहे. त्याचे उत्तम उदाहरण सध्या माळेगाव साखर कारखान्यावर पाहावयास मिळत आहे. कारखाना प्रशासनाने ऊस वाहतूक खर्चात बचत होण्याच्या पार्श्‍वभूमीवर ट्रॅक्टर सीएनजी कीट बसवून वाहतूकदार यांच्या खर्चात बचत करण्याचा प्रायोगिक तत्त्वावर प्रयोग केला आहे. इंधन दरवाढीच्या पार्श्‍वभूमीवर कारखाना आणि वाहतूकदार या दोघांसाठी हा पर्याय क्रांतिकारक ठरणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही नुकतीच या ट्रॅक्टरची पाहणी केली. 

व्हीएसआय मांजरी येथे माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली २ जुलै रोजी अॅग्रिकल्चर सॉलिड वेस्ट व इंडस्ट्रिअल सॉलिड वेस्ट यांच्यापासून साखर कारखाना स्तरावर बायो -सीएनजी उत्पादन मिळविण्याकरिता वेबिनार झाला होता. त्यामध्ये बायो - सीएनजी प्रकल्प उभारण्याकरिता संबंधित कंपन्यांनी सहभागी कारखानदार प्रतिनिधींना सदर प्रकल्पाची तांत्रिक माहितीचे सादरीकरण करण्यात आले होते. 

त्या पार्श्‍वभूमीवर माळेगाव सहकारी संचालक मंडळाने डिस्टिलरी बायोगॅसपासून बायो -सीएनजी प्रकल्प उभारण्याची मानसिकता केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून प्रायोगिक तत्त्वावर कारखाना प्रशासनाने प्रत्येक गटातील एका सभासद वाहतूकदारांच्या ट्रॅक्टरला मोफत बायो- सीएनजी कीट (रेट्रो फिटमेन्ट किट) बसविण्याचे निश्‍चित केले आहे. त्यानुसार पहिले किट पणदरे येथील ऊस वाहतूकदार शहाजी लकडे यांच्या ट्रॅक्टरला बसविण्यात आले आहे. 

या प्रयोगाची पाहणी सोमवारी (ता. ६) उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माळेगावात केली. या वेळी अध्यक्ष बाळासाहेब तावरे, उपाध्यक्ष बन्सिलाल आटोळे संचालक नितीन सातव, अनिल तावरे, योगेश जगताप आदी पदाधिकारी उपस्थित होते. सहा गटांतील सहा ट्रॅक्टरवर केलेला हा प्रयोग यशस्वी होताच कारखाना स्वतः बायो-सीएनजी गॅसची निर्मिती करणार आहे.

ट्रॅक्टर सीएनजी किटची माहिती
ट्रॅक्टर सीएनजी किटला ड्यूअल फ्यूएल सिस्टिम आहे. सीएनजी किटची मूळ किमत रु. १.३२ लाख आहे. सदर ट्रॅक्टर पूर्ण क्षमतेने (लोडवर - २५ टन) डिझेलवर ३.५ किलोमीटर मायलेज देतो आणि सीएनजी किट बसविल्यानंतर ४.५ ते ५ किलोमीटर मायलेज देते. सीएनजी टॅंक वॉटर कॅपॅसिटी ६० लिटर असून, त्यामध्ये १० किलो सीएनजी बसतो. सदर किट डिझेल व सीएनजी रेशो ३० टक्के डिझेल व ७० टक्के सीएनजी राहील. सदर किटमुळे इंधन (३५ ते ४० टक्के इंधन) बचत होईल आणि प्रदूषण कमी होण्यास मदत होईल. सदर किटमुळे शेतकरी सभासद व वाहतूकदार यांच्या खर्चात बचत होईल.


इतर बातम्या
बासमतीची निर्यात वाढण्याची शक्यता इराण आणि सौदी अरेबियाकडून होणारी बासमती तांदळाची...
राज्यात थंडीची लाट पसरणार :...पुणे : पाकिस्तान मार्गे देशाच्या पश्चिम...
गरीब कुटुंबांच्या उत्पन्नात ५३...आर्थिक उदारीकरणानंतर (Economic liberalization)...
आंबा, काजू हंगाम उशिरा सुरू होण्याचा...  वृत्तसेवा - गेल्या आठवड्याच्या शेवटी...
अन् शेतकऱ्याच्या हातात उरतं फक्त पाचटउसाला तुरा लागणं याला शेतकरी उसाचं वय झालं असं...
केंद्र सरकारकडून ६०६.१९ लाख टन...केंद्र सरकारने २०२१-२०२२ या आर्थिक वर्षात एकूण...
खाद्यतेलातील तेजीचा  सोयाबीनला लाभ...पुणेः देशात पामतेलाची उपलब्धता कमी असल्याने...
तापमानात घट; द्राक्ष मण्यांना तडे नाशिक : रविवारी (ता.२३) रोजी सकाळपासूनच धुके आणि...
उत्तर महाराष्ट्रात थंडीच्या लाटेचा...पुणे : आखाती देशातून आलेल्या धूळ वादळामुळे...
जास्त उत्पादकतेच्या कापूस  बियाण्याला...पुणेः पाकिस्तानमध्ये कापसाची उत्पादकता दिवसेंदिवस...
गुहागरमध्ये दीडशे एकरातील  आंबा, काजू...गुहागर, जि. रत्नागिरी : तालुक्यातील गिमवी देवघर...
गावरान लाल मिरचीचा यंदा ठसकानांदेड : नायगाव तालुक्यातील बरबडा येथील गावरान...
उन्हाळ्यात पाणी टंचाई कमी भासणार पुणे : पावसाळ्यात जोरदार पाऊस झाल्याने भूगर्भातील...
वाशीममध्ये दर शनिवारी  होणार हळद खरेदी...वाशीम ः हळदीचे उत्पादन घेण्यात विदर्भात आघाडीवर...
जालन्यात गहु सोंगणीला सुरुवातपिंपळगाव रेणुकाई, जि. जालना : पिंपळगाव रेणुकाईसह...
रिक्तपदांमुळे नांदेड कृषी विभाग सलाइनवरनांदेड : साडेपाच लाख खातेदार शेतकऱ्यांचा कारभार...
वीजपुरवठा खंडित केल्याशिवाय पर्याय नाही...मुंबई : राज्यातील कृषी वीज पंप ग्राहकांकडे ४१...
बुलडाणा जिल्ह्यात तेरा बाजार...खामगाव, जि. बुलडाणा ः जिल्ह्यातील तेरा कृषी...
पुणे जिल्ह्यात ७७ लाख टन उसाचे गाळपपुणे ः साखर कारखान्यांचा गाळप हंगाम मध्यावर आला...
तोडणीला उशीर होत असल्याने उसाला तुरेनगर : गत दोन वर्षात मोठ्या प्रमाणात झालेल्या...