Agriculture news in marathi बुलढाणा जिल्ह्यात शेतकऱ्यांना दोन कोटींची नुकसान भरपाई | Agrowon

बुलडाण्यात दोन कोटींची नुकसान भरपाई

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 26 नोव्हेंबर 2020

''स्वाभिमानी''चे नेते रविकांत तुपकर व कार्यकर्त्यांनी मंगळवारी (ता. २४) दिवसभर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. याची दखल घेत तातडीने २ कोटी २४ लाख २९ हजार रुपयांचा निधी जिल्हा प्रशासनाने तालुक्यांकडे वळती केला.

बुलडाणा  : दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई देऊ, असे राज्य सरकार वेळोवेळी सांगत होते. दिवाळी उलटून दहा दिवस झाले तरी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई न मिळाल्याने ''स्वाभिमानी''चे नेते रविकांत तुपकर व कार्यकर्त्यांनी मंगळवारी (ता. २४) दिवसभर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. याची दखल रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास घेण्यात आली. तातडीने २ कोटी २४ लाख २९ हजार रुपयांचा निधी जिल्हा प्रशासनाने तालुक्यांकडे वळती केला. त्याचे पत्र आंदोलकांच्या हातात सोपविल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

रविकांत तुपकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी बुलडाणा जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर मंगळवारी सकाळी ११ वाजेपासून ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली होती. लवकर तोडगा न निघाल्याने आंदोलकांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालना समोरच चटणी भाकरी खाल्या व तिथेच मुक्काम करण्याचा निर्णय घेतला. या आंदोलनामुळे जिल्हा प्रशासनाने धावपळ सुरू केली. राज्य सचिव, कृषी सचिवांशी संपर्क करण्यात आला.

जिल्हाधिकारी एस. राममूर्ती व निवासी जिल्हाधिकारी दिनेश गीते यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर अखेर रात्री साडेसात वाजता तोडगा निघाला. जिल्हाधिकाऱ्यांनी २ कोटी २४ लाख २९ हजार ५०० रुपयांचा मदत निधी तालुकानिहाय वर्ग केला. सदर निधी तत्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे जिल्ह्यातील सात तालुक्यांचे (पात्र शेतकऱ्यांचे) नुकसान भरपाई वाटपाचे उदिष्ट पूर्ण होणार आहे.

ल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. उर्वरित तालुक्यातील नुकसान भरपाई निधी आठवडाभरात शासनाकडून प्राप्त होताच वितरित करू, असे ठोस आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले. कोणत्याही बँकेने शेतकऱ्यांचा नुकसान भरपाईचा निधी होल्ड केला, परस्पर कर्ज खात्यात वर्ग केला तर त्या बँकेवर कठोर कारवाई करण्याचे आदेश काढण्यासही स्वाभिमानीने जिल्हाधिकाऱ्यांना भाग पाडले.

आंदोलनात राणा चंदन, शे. रफिक शे. करीम, नितीन राजपूत, विनायक सरनाईक, मयूर बोर्डे, ज्ञानेश्वर कल्याणकर, सैय्यद वसीम, महेंद्र जाधव, राजेश गवई, दत्ता पाटील, विजय बोराडे, कडूबा मोरे, रामेश्वर पवार, रामेश्वर अंभोरे, आकाश माळोदे, दत्तात्रय जेऊघाले, गजानन गवळी, मारोती मेढे,जबिर खान यांच्यासह कार्यकर्ते व पदाधिकारी सहभागी झाले होते.


इतर बातम्या
बीजमाता राहीबाई पोपेरे करणार लोकसभा...अकोले, जि. नगर : पारंपरिक बियाण्यांची जोपासना...
तूर विक्रीसाठी ३९८० शेतकऱ्यांची नोंदणीपरभणी ः यंदाच्या खरीप हंगामात (२०२०-२१) आधारभूत...
लातूर येथे बुधवारी जवस पीक प्रात्यक्षिकपरभणी ः लातूर येथील गळीतधान्‍ये संशोधन केंद्र...
कृषी यंत्रणेला तत्पर करणार ः धीरजकुमारऔरंगाबाद : मराठवाड्यासह राज्यातील कृषी विस्तार व...
कृषी विद्यापीठ तंत्रज्ञानाचा वापर करा...नाशिक : शेतकऱ्यांच्या विकासासाठी सातत्याने कृषी...
नगरमध्ये कावळे ‘बर्ड फ्लू’ बाधितनगर ः श्रीगोंदा तालक्यातील भानगाव शिवारात मृत...
नाशिकमध्ये ‘बर्ड फ्लू’च्या देखरेखीसाठी...नाशिक : राज्यातील विविध भागांमध्ये ‘बर्ड फ्लू’चा...
गोसेखुर्दच्या कामात हयगय नको : नितीन...नागपूर : तीन दशकांपेक्षा अधिक काळ लोटूनही...
ट्रॅक्टर मोर्चाबाबत आज सर्वोच्च...नवी दिल्ली : दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करीत...
पावसमधील आंब्याच्या तीन बागांमध्ये...रत्नागिरी : ढगाळ वातावरणामुळे आंबा बागांमध्ये...
ऊसतोडणीचा प्रश्‍न गंभीर नाशिक : गेल्या काही वर्षांपासून जिल्ह्यातील निफाड...
कृषी पंढरीतील यात्रेची उत्सुकता शिगेला माळेगाव, बारामती ः येथील कृषी पंढरीत आजपासून (ता....
‘पोकरा’ अनुदानातून अनेक घटक वगळले पुणे : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पातून (...
कृषी आयुक्‍त थेट बांधावर औरंगाबाद : कृषी विभागाच्या क्षेत्रीय भेट व आढावा...
ठिकठिकाणी ढगाळ वातावरण पुणे ः मागील दोन दिवसांपासून अरबी समुद्राच्या...
समविचारी शेतकऱ्यांचे राष्ट्रीय संघटन...नागपूर ः शेती प्रश्‍नांच्या सोडवणुकीसाठी...
कृषी कायदे शेतकऱ्यांना गुलाम करणारे :...नागपूर : केंद्रातील भाजप सरकारने लोकशाही आणि...
बारामतीमध्ये उद्यापासून कृषी तंत्रज्ञान...माळेगाव, बारामती ः अॅग्रिकल्चरल डेव्हलमेंट ट्रस्ट...
कोरोना लसीकरण क्रांतिकारक पाऊल : ...मुंबई : कोरोना लसीकरणाचा आजचा कार्यक्रम हे एक...
सातारा जिल्ह्यात रब्बीची ९५ टक्के...सातारा : जिल्ह्यातील रब्बी हंगामातील पेरणीची कामे...