agriculture news in marathi, ्due to lack of rain, sowing has stopped, nagar, maharashtra | Agrowon

दमदार पावसाअभावी नगर जिल्ह्यात दिसेना पेरण्यांची लगबग
टीम अॅग्रोवन
सोमवार, 11 जून 2018

नगर : राज्याच्या बहूतांश भागात मॉन्सूनचे आगमन झाले असून काही ठिकाणी दमदार पाऊस पडत आहे. नगर जिल्ह्यात मात्र अजूनही जोरदार पाऊस झालेला नाही. विशेष म्हणजे अकोले तालुक्‍यातील भंडारदरा परिसरालाही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. चागंला पाऊस नसल्याने अजून कोठेही पेरण्या, कापूस लागवडीची लगबग सुरू झालेली नाही.

नगर : राज्याच्या बहूतांश भागात मॉन्सूनचे आगमन झाले असून काही ठिकाणी दमदार पाऊस पडत आहे. नगर जिल्ह्यात मात्र अजूनही जोरदार पाऊस झालेला नाही. विशेष म्हणजे अकोले तालुक्‍यातील भंडारदरा परिसरालाही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. चागंला पाऊस नसल्याने अजून कोठेही पेरण्या, कापूस लागवडीची लगबग सुरू झालेली नाही.

राज्यात मॉन्सूनचे तीन दिवसांपूर्वी आगमन झाले. विदर्भ, कोकण, मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये दोन दिवसांपासून दमदार पाऊस पडत आहे. मात्र दोन दिवसांपासून नगरमध्ये पाऊस झालेला नाही. पूर्व मोसमी पावसाने जिल्ह्याच्या बहूतांश भागात हजेरी लावलेली असली तरी मॉन्सूनच्या आगमनानंतर मात्र पाऊस झालेला नाही.

नगर जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस अकोले तालुक्‍यात पडतो. तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात तर कित्येक दिवस सूर्यदर्शन होत नाही. मात्र, अजूनही या भागात पाऊस झालेला नाही. सध्या अकोले तालुक्‍यात भातखाचरे तयार करण्याचे कामे सुरू आहे. जिल्ह्याच्या कोणत्याच भागात पेरणी, कापूस लागवडीयोग्य पाऊस झालेला नाही. त्यामुळे बाजारातही खते, बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांचा फारसा उत्साह दिसत नाही. अजून अनेक भागांत खरिपासाठी मशागतीची कामे सुरू आहेत.

मंगळवार (ता. १२) पासून पावसात खंड पडणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले असल्याने आता पेरणी, कापूस लागवडीस दमदार पाऊस झाल्याशिवाय सुरवात होणार नसल्याचे दिसत आहेत. गेल्यावर्षी आतापर्यंत १५.२७ टक्के पाऊस होऊन पेरण्यांना सुरवात झाली होती. यंदा आतापर्यंत ८.७२ टक्के पाऊस झाला आहे.

इतर ताज्या घडामोडी
औरंगाबादेत फ्लॉवर १८०० ते ३००० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
सांगली जिल्हा दुष्काळाच्या छायेतसांगली : पावसाळ्याचा दीड महिन्याचा कालावधी लोटला...
मराठवाड्यातील २६६ मंडळांमध्ये पाऊसऔरंगाबाद/नांदेड ः मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांतील ६३...
पावसाच्या आगमनाने नाशिकमधील शेतकरी...नाशिक : जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने...
पशुसंवर्धन विकासासाठी ७०० कोटींचा निधी...कोल्हापूर  : राज्यातील पशुसंवर्धन विकासाला...
मराठवाड्यातील पावणेनऊ लाखांवर शेतकरी...औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील...
विद्यार्थी, शेतकरीप्रश्नी ‘स्वाभिमानी’...बुलडाणा  : जिल्ह्यातील शेतकरी अनेक समस्यांना...
बारामतीत मुसळधार पाऊसपुणे  : जिल्ह्याच्या कोरडवाहू भागात असलेल्या...
नगर जिल्ह्यातील सहा महसूल मंडळांत...नगर : जिल्ह्यातील ३५ महसूल मंडळांत शनिवारी जोरदार...
कोणत्याही तंत्रज्ञानाचा डोळस स्वीकार...औरंगाबाद   : कोणत्याही तंत्रज्ञानाचा...
विधानसभा निवडणुकीत महायुतीने  २२० जागा...मुंबई  : आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीने...
सोलापूर जिल्ह्यात १७ हजार हेक्टर...सोलापूर ः गेल्या दोन वर्षांपासून सोलापूर जिल्हा...
नाशिक जिल्ह्यातील ४१ हजार हेक्टरवरील...नाशिक : जिल्ह्यात लष्करी अळीचा प्रादुर्भाव...
मराठवाड्यात ४१ हजार हेक्टरवरील मक्यावर...औरंगाबाद : अमेरिकन लष्करी अळीने औरंगाबाद व जालना...
सांगली जिल्ह्यात अमेरिकन लष्करी अळीने...सांगली ः जिल्ह्यात मक्यावर अमेरिकन लष्करी अळीचा...
लष्करी अळीच्या प्रादुर्भावाने नगर...नगर   ः गेल्या वर्षभरात दुष्काळाशी...
मोताळा, देऊळगावराजा तालुक्यात शंभर...बुलडाणा : खरिपात विदर्भात मका उत्पादनात...
साताऱ्यात अकराशे हेक्टरवरील मका पिकावर...सातारा : जिल्ह्यातील पूर्व भागात दुष्काळाची...
इंदापूर तालुक्यात अडीचशे हेक्टरवर...पुणे   ः गेल्या काही दिवसांपासून...
गुलटेकडीत टोमॅटोचे आवकेसह दरही वाढलेपुणे ः गेल्या आठ दिवसांत पावसाने दिलेल्या...