agriculture news in Marathi १४७ CORONA affected persons Maharashtra | Agrowon

राज्यात १४७ कोरोनाबाधित रुग्ण 

टीम अॅग्रोवन
शनिवार, 28 मार्च 2020

महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना, तिकडे सांगली जिल्ह्यात कोरोनाचा विळखा वाढत असल्याचे दिसत आहे.

मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना, तिकडे सांगली जिल्ह्यात कोरोनाचा विळखा वाढत असल्याचे दिसत आहे. सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथे शुक्रवारी (ता.२७) १२ रुग्णांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे येथील कोरोनाबाधितांची संख्या २३ वर पोहोचली आहे. तर महाराष्ट्रातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा तब्बल १४७ वर पोहोचला आहे. 

दरम्यान, कोरोनाला रोखण्यासाठी राज्य सरकारने सैन्य दलाची मदत मिळावी यासाठी केंद्र सरकारला पत्र पाठवले आहे. 

इस्लामपुरात जे १२ नवे रुग्ण आढळले आहेत, ते पूर्वीच्या ४ कोरोनाबाधितांच्या संपर्कात आले होते. हे सर्व एकाच कुटुंबातील आहेत. ज्या कुटुंबातील चौघांना लागण झाली होती, त्यांचे कुटुंब मोठे आहे. या कुटुंबातील आधीच चौघांना कोरोनाची लागण झाली होती. हे चौघे हज यात्रा करुन आले होते. त्यानंतर त्यांच्या कुटुंबातील सर्वांची चाचणी केली असता, २५ मार्चला आणखी पाच जण कोरोना पॉझिटिव्ह आले होते. त्यानंतर आणखी १२ जणांची चाचणी केली असता, त्यांचे रिपोर्टही पॉझिटिव्ह आले आहेत. 

हे कुटुंब इस्लामपूरमधील आहे. महत्त्वाचे म्हणजे या कुटुंबाने एका लग्न समारंभालाही हजेरी लावली होती. या कुटुंबाच्या संपर्कात आलेल्या २७ जणांना क्वारंटाईन करण्यात आल्याची माहिती, जलसंपदा मंत्री आणि सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिली आहे. या कोरोनाबाधित रुग्णांवर मिरजेतील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. 

दरम्यान, कोरोनाला रोखण्यासाठी सरकारकडून अनेक प्रयत्नही केले जात आहे. त्यासोबत राज्य सरकारने सैन्य दलाची मदत मिळावी यासाठी पत्र लिहिले आहे, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. अजित पवार म्हणाले, ‘‘राज्य सरकारने सैन्य दलाला पत्र लिहिले आहे. सैन्य दलाची गरज लागल्यास वैद्यकीय मदत मिळावी. यासाठी आम्ही त्यांच्या संपर्कात आहोत. व्यापारी कोकणातील आंबे, नाशिकची द्राक्षही बाजारात विकू शकतात. त्यासोबत गोड्या आणि खाऱ्या पाण्यातील मच्छीही विकता येणार आहे. विक्रेत्यांनी फक्त विक्री करताना काळजी घ्यावी. तसेच पेट्रोल आणि डिझेल हे फळभाज्या आणि फळांची वाहतूक करणाऱ्या ट्रकला दिले जाणार आहे,’’ असेही अजित पवार यांनी सांगितले. 

‘‘भीतीपोटी अनेक डॉक्टर दवाखाने बंद करत आहेत. हे चुकीचे आहे. डॉक्टरांकडे आदर्श म्हणून पाहिले जाते. त्यांना देव मानले जाते. त्यामुळे त्यांनी दवाखाने सुरु ठेवावेत. डॉक्टरांनी तत्परता नाही दाखवली तर सर्वसामान्यांनी जायचे कुठे? अशा शब्दात आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी डॉक्टरांचे कान टोचले आहेत 

कर्जमाफीच्या कामाला स्थगिती 
‘‘शेतकरी कर्जमाफी योजनेच्या कामाला सध्या स्थगिती देण्यात आली आहे. शेतकरी बायोमेट्रिकसाठी तयार नसल्यामुळे काम थांबले आहे. सध्या प्राधान्य कोरोनाच्या कामाला दिले जात आहे,’’ असेही अजित पवार म्हणाले. 


इतर अॅग्रो विशेष
टोळधाडीचा राजस्थानमधील ९० हजार हेक्टरला...जयपूर, राजस्थान  ः राज्यातील २० जिल्ह्यांतील...
यंदा पायी वारी नाही; दशमीला पंढरीत...पुणे : आषाढी वारीची परंपरा जपण्यासाठी राज्य शासन...
अरबी समुद्रातून मॉन्सूनची पुढे चालपुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
राज्यात आजपासून पूर्वमोसमी पावसाची...पुणे  : राज्यात पूर्वमोसमी पावसाला पोषक...
टोळधाडीच्या अस्तित्वाने विदर्भात पसरली...नागपूर   ः टोळधाड मध्यप्रदेशात...
दूध संघांना पेमेंट वाटप सुरुपुणे : राज्यातील दूध संघांनी शेतकऱ्यांना दिलेल्या...
वस्त्रोद्योग येतोय पूर्वपदावरजळगाव ः लॉकडाउनमुळे ठप्प असलेला देशातील...
नाशिक बाजार समिती पुन्हा सुरु;...नाशिक  : नाशिक बाजार समितीत दोन कोरोनाबाधित...
थेट पपई विक्रीतून मिळविला तिप्पट दर !परभणी ः कोरोनाच्या स्थितीमध्ये लॉकडाऊन व...
शेतमालाचे ऑनलाइन तारण कर्ज होणार उपलब्ध...मुंबई : टाळेबंदी कालावधीत शेतकऱ्यांना राज्य वखार...
अतिवृष्टी आणि अतिक्रमणामुळेच पूरस्थिती...मुंबई : अतिवृष्टी आणि अतिक्रमणामुळेच...
शेतकऱ्यांची अडवणूक झाली, तर...नगर : ‘‘शेतकऱ्यांसाठी काम करणे याला आपण सर्वांनी...
मॉन्सून अरबी समुद्रात; सोमवारपर्यंत...पुणे  : नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून)...
सहकाराच्या त्रिस्तरीय रचना मोडण्यास...पुणे : राज्यातील काही जिल्हा मध्यवर्ती सहकारी...
उद्यापासून पूर्वमोसमी पावसाचा अंदाज;...पुणे : राज्यात अक्षरशः भाजून काढणाऱ्या उन्हापासून...
`गोकुळ' ची ४५ लाख लिटर दुधावर प्रक्रिया कोल्हापूर ः लॉकडाउनच्या काळात कोल्हापूर...
पीककर्जासाठी हेलपाटे, भ्रष्ट...संग्रामपूर, जि. बुलडाणा : वेळ सकाळी साधारण...
टोळधाडीमुळे अवघे ५० हेक्‍टरचे नुकसान :...नागपूर: टोळधाडीचा धोका अमरावती विभागात टळला असला...
राज्यात ४० हजार टन दूध पावडर पडूनपुणे : राज्यात ४० हजार टन दूध पावडर (भुकटी) पडून...
मागणीपेक्षाही एक लाख क्विंटल बियाणे...पुणे : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन असले...