मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांत १८ लाख टन उसाचे गाळप

cane chrushing
cane chrushing

औरंगाबाद: मराठवाड्यातील औरंगाबाद साखर सहसंचालक कार्यालयांतर्गत येत असलेल्या पाच जिल्ह्यांतील १८ साखर कारखान्यांनी यंदाच्या गाळप हंगामात सहभाग नोंदविला. या सर्व कारखान्यांनी आजवर १८ लाख ६३ हजार ९६२ मेट्रीक टन उसाचे गाळप करताना सरासरी ९.१ च्या साखर उतारऱ्याने १६ लाख ९६ हजार १०७ क्‍विंटल साखरेचे उत्पादन केले.  यंदा कारखान्यांना उसाचा तुटवडा जाणवतो आहे. अनेक साखर कारखाने क्षमतेच्या तुलनेत कमी उस गाळप करीत असल्याची स्थिती आहे. त्यामुळे यंदा अपेक्षित साखर उत्पादन होणार नाही हे जवळपास स्पष्टच आहे. पाचही जिल्ह्यांत गतवर्षी जवळपास २२ साखर कारखान्यांनी उस गाळपात सहभाग नोंदविला. यंदा गाळपासाठी उस कमी उपलब्ध असला तरी प्रत्यक्षात गाळपासाठी उतरणाऱ्या कारखान्यांची संख्या कमी नसल्याने कारखाने अपेक्षित कालावधीपर्यंत गाळ करू शकणार नाहीत हे सुद्धा स्पष्ट आहे.  नंदूरबार जिल्ह्यातील दोन सहकारी व एक खासगी मिळून तीन साखर कारखान्यांनी गाळपात सहभाग घेतला. या तीन कारखान्यांनी ४ लाख ३९ हजार ३५६ टन उसाचे गाळप करत सरासरी ९.४८ च्या उताऱ्याने ४ लाख १६ हजार ५७७ क्‍विंटल साखरेचे उत्पादन केले. जळगाव जिल्ह्यातील केवळ एका कारखान्याने गाळपात सहभाग नोंदवत १ लाख ९९० टन उसाचे गाळप करत ९.८२ च्या उताऱ्याने ९९ हजार १४० क्‍विंटल साखरेचे उत्पादन केले. औरंगाबाद जिल्ह्यातील पाच साखर कारखान्यांनी ३ लाख ५८ हजार ६६९ टन उसाचे गाळप करत ९.१२ च्या उताऱ्याने ३ लाख २६ हजार ९४५ क्‍विंटल साखरेचे उत्पादन केले. जालना जिल्ह्यातील ४ कारखान्यांनी ४ लाख ८१ हजार ४९१ टन उसाचे गाळप करत ९.५६ च्या उताऱ्याने ४ लाख ६० हजार ३०० क्‍विंटल साखरेचे उत्पादन केले. बीड जिल्ह्यातील ५ कारखान्यांनी गाळपात सहभाग घेत ४ लाख ८३ हजार ४५५ टन उसाचे गाळप करताना केवळ ८.१३ च्या उताऱ्याने ३ लाख ९३ हजार १४५ क्‍विंटल साखरेचे उत्पादन केल्याची माहिती साखर विभागाच्यावतीने देण्यात आली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com