ठिबकच्या ३० लाखांच्या अनुदानाचा अपहार

ठिबक अनुदान
ठिबक अनुदान

परभणी ः पंतप्रधान सिंचन योजनेअंतर्गत २०१५-१६ मध्ये जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नावाने ठिंबक सिंचन संचाचे बोगस प्रस्ताव सादर करून २९ लाख ७९ हजार ५१७ रुपयांच्या अनुदानाचा अपहार झाल्याचे समोर आले. या प्रकरणी पूर्णा पोलिसांनी एका कृषी सहायकासह दोघांना अटक केली. त्यांना शनिवारपर्यंत (ता. ३) पोलिस कोठडी सुनावण्यात आली. आणखी तीन आरोपी फरार असल्याची माहिती फौजदार चंद्रकांत पवार यांनी दिली. कृषी सहायक श्‍याम यसमोड, हरीश वंजे अशी संशयितांची नावे आहेत. पंतप्रधान कृषी सिंचन योजनेअंतर्गत २०१५-१६ मध्ये आपल्या नावावर २४ हजार ४०० रुपये अनुदान उचल्याची तक्रार पूर्णा तालुक्यातील एका शेतकऱ्याने केली. त्यानंतर या प्रकरणी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर अज्ञातांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणातील तक्रारींची व्याप्ती वाढत गेल्यानंतर जिल्हाधिकारी पी. शिवशंकर, पोलिस अधीक्षक कृष्णकांत उपाध्ये यांच्या निर्देशानंतर पोलिसांनी तपासाची गती वाढवली. आजवरच्या तपासात ४ हजारांवर पानांचे पुरावे पोलिसांनी जमा केले. ३०६ बनावट प्रस्ताव सादर केले असल्याचे उघडकीस आले. अपहार केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर वंजे आणि यसमोड, तत्कालीन तालुका कृषी अधिकारी आणि दोन कृषी सहायक अशा पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. शनिवारी (ता. २७) हरीश वंजे आणि कृषी सहायक श्‍याम यसमोड या दोघांना पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले. त्यांना शनिवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. तत्कालीन तालुका कृषी अधिकारी आणि दोन कृषी सहायक फरार आहेत. या प्रकरणाचा तपास फौजदार चंद्रकांत पवार नितीन वडकर, विष्णू भिसे करत आहेत.

मृत शेतकऱ्यांच्या नावावरदेखील लाटले अनुदान विहीर, कूपनलिका असा कोणत्याही प्रकारचा सिंचन स्रोत नसलेल्या, काही निधन झालेल्या शेतकऱ्यांच्या नावाने बोगस प्रस्ताव तयार करून, ताडकळस येथील बॅंकेत बोगस बॅंक खाते उघडले. हरीश वंजे याच्यासह तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी ७२ शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यांवर जमा झालेले ठिबक सिंचन संचाचे २९ लाख ७९ हजार ५१७ रुपयांच्या अनुदानाची रक्कम स्वतःच्या खात्यावर वळती केल्याचे समोर आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com