अमरावतीत बियाणे कंपनीकडून ९०१ बॅग, २२ लाखांची भरपाई

जिल्ह्यात सोयाबीन बियाणे उगवणीबाबत १ हजार ५५४ तक्रारींची तालुकास्तरीय तक्रार निवारण समितीकडून पाहणी झालेली आहे. यामध्ये सदोष बियाण्याबाबत कंपनीने ९०१ बॅग व २२ लाख ७६ हजार ४४५ रूपये भरपाई ४८९ शेतकऱ्यांना दिलेली आहे.
farmer compensation
farmer compensation

अमरावती : जिल्ह्यात सोयाबीन बियाणे उगवणीबाबत १ हजार ५५४ तक्रारींची तालुकास्तरीय तक्रार निवारण समितीकडून पाहणी झालेली आहे. यामध्ये सदोष बियाण्याबाबत कंपनीने ९०१ बॅग व २२ लाख ७६ हजार ४४५ रूपये भरपाई ४८९ शेतकऱ्यांना दिलेली आहे. उर्वरित तक्रारींची तालुकास्तरीय तक्रार निवारण समितीमार्फत पाहणी सुरू असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय चवाळे यांनी दिली. राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात ११ शेतकऱ्यांना भरपाईचे वाटप करण्यात आले यावेळी ते बोलत होते. प्रत्येक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मिळवून देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी यावेळी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात ११ शेतकऱ्यांना ७८ हजार ४५० रूपये इतक्या भरपाईचे वाटप झाले. जिल्हा परिषदेचे माजी सभापती जयंतराव देशमुख यांच्यासह अनेक पदाधिकारी, अधिकारी व शेतकरी बांधव यावेळी उपस्थित होते. यशोमती ठाकूर म्हणाल्या की, पंचनामा प्रक्रियेला वेग मिळाला पाहिजे. त्यासाठी तपासणी पथकांची संख्या वाढवावी. ज्या शेतकरी बांधवांनी महाबीजचे बियाणे पेरले व ते उगवून आले नाही अशा तक्रारींची तातडीने दखल घेऊन तपासणी अहवालाची वाट न पाहता बियाणे बदलून देण्याची कार्यवाही करण्याच्या सूचना शासनाने महाबीजला यापूर्वीच दिल्या आहेत. महाविकास आघाडी शासन खंबीरपणे शेतकरी बांधवांच्या पाठीशी उभे आहे. ‘‘जिल्ह्यात एकूण २ हजार ५९५ सोयाबीन उगवण न झाल्याबाबत तक्रारी तालुका स्तरावर प्राप्त झाल्या असून, त्यापैकी १ हजार ५५४ तक्रारींची तालुकास्तरीय तक्रार निवारण समितीकडून पाहणी झालेली आहे. यामध्ये सदोष बियाण्याबाबत कंपनीने ९०१ बॅग व २२ लाख ७६ हजार ४४५ रूपये भरपाई ४८९ शेतकऱ्यांना दिलेली आहे. उर्वरित तक्रारींची तालुकास्तरीय तक्रार निवारण समितीमार्फत पाहणी सुरू आहे. कंपनी व कृषी सेवा केंद्रामार्फत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई देण्याची कार्यवाही होत आहे,’’ अशी माहिती जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी श्री. चवाळे यांनी दिली.

११ शेतकऱ्यांना धनादेशाचे वाटप  पालकमंत्र्यांच्या हस्ते उमेश कडू (खुलताबाद, ता. दर्यापूर) यांना १० हजार ४०० रूपये, श्यामभाऊ देशमुख (मोझरी ता. तिवसा) यांना २८ हजार ६०० रूपये, दर्यापूर येथील अशोक घुरडे यांना १३ हजार रूपये, खोलापूर (ता. भातकुली) येथील नामदेव खंडारे व सुरेश मोतीराम इंगळे यांना प्रत्येकी साडेचार हजार रूपये, तर निरूळगंगामाई (ता. भातकुली) येथील उमेश घोडे यांना २२५० रुपये, अंजनगाव बारी येथील श्रीकृष्ण भोपळे, सुधीर दातीर, आरिफ शे. रुस्तम, दीपक जाकड, पांडुरंग खडसे यांना प्रत्येकी २२००रूपये भरपाई देण्यात आली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com