agriculture news in Marathi ९०१ seed bag and 22 lac compensation for farmers Maharashtra | Page 2 ||| Agrowon

अमरावतीत बियाणे कंपनीकडून ९०१ बॅग, २२ लाखांची भरपाई

टीम अॅग्रोवन
रविवार, 12 जुलै 2020

जिल्ह्यात सोयाबीन बियाणे उगवणीबाबत १ हजार ५५४ तक्रारींची तालुकास्तरीय तक्रार निवारण समितीकडून पाहणी झालेली आहे. यामध्ये सदोष बियाण्याबाबत कंपनीने ९०१ बॅग व २२ लाख ७६ हजार ४४५ रूपये भरपाई ४८९ शेतकऱ्यांना दिलेली आहे.

अमरावती : जिल्ह्यात सोयाबीन बियाणे उगवणीबाबत १ हजार ५५४ तक्रारींची तालुकास्तरीय तक्रार निवारण समितीकडून पाहणी झालेली आहे. यामध्ये सदोष बियाण्याबाबत कंपनीने ९०१ बॅग व २२ लाख ७६ हजार ४४५ रूपये भरपाई ४८९ शेतकऱ्यांना दिलेली आहे. उर्वरित तक्रारींची तालुकास्तरीय तक्रार निवारण समितीमार्फत पाहणी सुरू असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय चवाळे यांनी दिली.

राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात ११ शेतकऱ्यांना भरपाईचे वाटप करण्यात आले यावेळी ते बोलत होते. प्रत्येक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मिळवून देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी यावेळी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात ११ शेतकऱ्यांना ७८ हजार ४५० रूपये इतक्या भरपाईचे वाटप झाले. जिल्हा परिषदेचे माजी सभापती जयंतराव देशमुख यांच्यासह अनेक पदाधिकारी, अधिकारी व शेतकरी बांधव यावेळी उपस्थित होते.

यशोमती ठाकूर म्हणाल्या की, पंचनामा प्रक्रियेला वेग मिळाला पाहिजे. त्यासाठी तपासणी पथकांची संख्या वाढवावी. ज्या शेतकरी बांधवांनी महाबीजचे बियाणे पेरले व ते उगवून आले नाही अशा तक्रारींची तातडीने दखल घेऊन तपासणी अहवालाची वाट न पाहता बियाणे बदलून देण्याची कार्यवाही करण्याच्या सूचना शासनाने महाबीजला यापूर्वीच दिल्या आहेत. महाविकास आघाडी शासन खंबीरपणे शेतकरी बांधवांच्या पाठीशी उभे आहे.

‘‘जिल्ह्यात एकूण २ हजार ५९५ सोयाबीन उगवण न झाल्याबाबत तक्रारी तालुका स्तरावर प्राप्त झाल्या असून, त्यापैकी १ हजार ५५४ तक्रारींची तालुकास्तरीय तक्रार निवारण समितीकडून पाहणी झालेली आहे. यामध्ये सदोष बियाण्याबाबत कंपनीने ९०१ बॅग व २२ लाख ७६ हजार ४४५ रूपये भरपाई ४८९ शेतकऱ्यांना दिलेली आहे. उर्वरित तक्रारींची तालुकास्तरीय तक्रार निवारण समितीमार्फत पाहणी सुरू आहे. कंपनी व कृषी सेवा केंद्रामार्फत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई देण्याची कार्यवाही होत आहे,’’ अशी माहिती जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी श्री. चवाळे यांनी दिली.

११ शेतकऱ्यांना धनादेशाचे वाटप 
पालकमंत्र्यांच्या हस्ते उमेश कडू (खुलताबाद, ता. दर्यापूर) यांना १० हजार ४०० रूपये, श्यामभाऊ देशमुख (मोझरी ता. तिवसा) यांना २८ हजार ६०० रूपये, दर्यापूर येथील अशोक घुरडे यांना १३ हजार रूपये, खोलापूर (ता. भातकुली) येथील नामदेव खंडारे व सुरेश मोतीराम इंगळे यांना प्रत्येकी साडेचार हजार रूपये, तर निरूळगंगामाई (ता. भातकुली) येथील उमेश घोडे यांना २२५० रुपये, अंजनगाव बारी येथील श्रीकृष्ण भोपळे, सुधीर दातीर, आरिफ शे. रुस्तम, दीपक जाकड, पांडुरंग खडसे यांना प्रत्येकी २२००रूपये भरपाई देण्यात आली.


इतर ताज्या घडामोडी
पुणे विभागात खरीप पेरणीत अडीच लाख...पुणे ः यंदा जूनच्या सुरुवातीला पावसाने चांगली...
बिबट्याच्या पिंजऱ्यांशेजारीच बसून करणार...मंचर : वनखात्यानेही बिबट्याचे हल्ले रोखण्यासाठी...
खरीप पीक कर्जासाठी भाजपचा आज ठिय्याअमरावती : खरीप हंगाम अर्ध्यावर आला असतानासुद्धा...
औरंगाबादेत ग्राहकांचा रानभाज्या खरेदीला...औरंगाबाद ः आरोग्यदायी व अनेक औषधी गुणधर्म...
नगर जिल्ह्यात तुरीचा ५४ हजार हेक्टरवर...नगर ः नगर जिल्ह्यात यंदा चांगला पाऊस झाला...
रत्नागिरी जिल्ह्यातील ६५ पैकी ४८ धरणे...रत्नागिरी ः अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी...
सांगलीत अडीच हजार क्विंटल मक्याची खरेदीसांगली ः जिल्ह्यातील तीन हमीभाव केंद्रांच्या...
निकृष्ट बियाणे पुरवठादार कंपन्यांवर...अमरावती: निकृष्ट दर्जाच्या बियाणे पुरवठा प्रकरणात...
मराठवाडा विभागातील हवामानानुसार पीक...मराठवाडा विभागातील एकूण हवामान, पर्जन्यमान या...
औरंगाबादमध्ये आज रानभाज्या महोत्सवऔरंगाबाद  ः ‘‘वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
सांगलीत ६८ हजार शेतकऱ्यांनी उतरवला...सांगली  ः जिल्ह्यातील ६८ हजार ०१८...
रिसोडमध्ये पावसाची उघडीपवाशीम  ः राज्यात बऱ्याच भागात पाऊस धुमाकूळ...
वाशीम जिल्ह्यात एक लाख ४२ हजार हेक्टर...वाशीम ः पंतप्रधान पीकविमा योजनेत जिल्ह्यातील...
खानदेशात ताग लागवडीला पसंतीजळगाव  ः कमी पाण्यात व उशिरा लागवड करूनही...
पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत घटकोल्हापूर : पश्चिम भागात पावसाचा जोर घटल्याने...
परभणी विभागात बिजोत्पादन होणार २७ हजार...परभणी : यंदा महाबीजच्या परभणी विभागातील परभणी,...
अकोल्यात पाऊस सुरुचनगर  ः अकोले तालुक्याच्या पश्चिम आदिवासी...
विदर्भातील पोल्ट्री व्यावसायिकांचे...अमरावती : विदर्भातील पोल्ट्री व्यावसायिकांना...
इगतपुरी, नाशिक तालुक्यात वाऱ्यामुळे...नाशिक : जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात झालेल्या...
विक्रीअभावी मालवंडीत लिंबू उत्पादकांना...मालवंडी, जि. सोलापूर ः बार्शी तालुक्यातील मालवंडी...