agriculture news in marathi ‘For coarse grain shopping centers Take immediate action. ' | Agrowon

‘भरड धान्य खरेदी केंद्रांसाठी तातडीने कार्यवाही करा’

टीम अॅग्रोवन
रविवार, 7 मार्च 2021

जळगाव  ः जिल्ह्यात रब्बी हंगामात फक्त मका पीक हाती येऊ लागले आहे. परंतु त्याचे दरही पडले आहेत. रब्बी ज्वारीची मळणी सुरू आहे.

जळगाव  ः जिल्ह्यात रब्बी हंगामात फक्त मका पीक हाती येऊ लागले आहे. परंतु त्याचे दरही पडले आहेत. रब्बी ज्वारीची मळणी सुरू आहे. या स्थितीत भरडधान्य खरेदीची तयारी प्रशासनाने करावी, अशी मागणी शेतकरी व शेतकरी संघटनांचे पदाधिकारी करीत आहेत. 

सध्या हरभरा खरेदी काही तालुक्यात सुरू आहे. परंतु हरभरा, तुरीचे दर बाजारात टिकून आहेत. परंतु ज्वारी, मक्याचे दर कमी आहेत. ज्वारीमध्ये दादर ज्वारीचे दर स्थिर आहेत.  शासकीय खरेदी लवकर सुरू न केल्यास शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे. 

भरडधान्य खरेदी सुरू करून शेतकऱ्यांचा वित्तीय तोटा कमी करावा, यासाठी महाराष्ट्र राज्य शेतकरी संघटनेतर्फे किरण पाटील, संजय महाजन आदींनी आपल्या मेळाव्यात मुद्दा उपस्थित केला आहे. खरिपात मका उत्पादकांचे नुकसान अधिक झाले. मक्याची शासकीय खरेदी तोकडी करण्यात आली. 

सध्या मक्याचे दर बाजारात १२४५ रुपये प्रतिक्विंटल आहेत. तर हमीभाव १८५० रुपये प्रतिक्विंटल आहे. या हंगामात शेतकऱ्यांना  नुकसान सहन करावे लागू नये, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत. यामुळे प्रशासनाने शासनाला अवगत करावे. शासकीय खरेदी लवकर सुरू करावी, अशी मागणी करण्यात आली.


इतर ताज्या घडामोडी
नाशिकच्या दुर्घटनेमुळे संपूर्ण देश...नवी दिल्ली : नाशिकमध्ये २२ जणांचे प्राण घेणाऱ्या...
परभणी जिल्ह्यात एक लाख १७ हजार टन...परभणी ः ‘‘जिल्ह्याला यंदाच्या (२०२१) खरीप...
मोहोळमध्ये खरेदी, विक्रीदारांना कोरोना...मोहोळ, जि. सोलापूर ः ‘‘मोहोळ येथील दुय्यम निबंधक...
अडीच लाख क्विंटल चंद्रपुरात धान खरेदीचंद्रपूर : शासनाने या वर्षी हमीभावा सोबतच सातशे...
‘पोकरा’चे सुमारे १४ कोटींचे अनुदान...हिंगोली  ः ‘‘जिल्ह्यातील वसमत तालुक्यात...
नाशिकमध्ये लोकसहभागातून 'कोरोनामुक्त...नाशिक : ‘‘कोरोनाचा ग्रामीण भागात वाढलेला...
दर्जेदार शिवभोजन थाळीचे वितरण करा : ...मुंबई : राज्य सरकारने लागू केलेल्या निर्बंधांच्या...
भंडाऱ्यातील ६३ प्रकल्प गाठत आहेत तळभंडारा : सरासरी बरसलेला मॉन्सून, त्यानंतर अवकाळी...
खापणेवाडी-गुरववाडी बंधाऱ्यास गळतीबाजारभोगाव, जि. कोल्हापूर : जांभळी नदीवरील...
शेतकऱ्यांचा शेतीमाल विक्रीला प्रतिसाद...नगर : नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न...
बुलडाण्यात दूध संकलन, वितरणाच्या वेळेत...बुलडाणा ः कोरोना प्रादुर्भाव कमी करण्यासाठी...
पुणे विद्यापीठात उभारणार ‘बांबू पार्क’ पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पाच...
सातबारासह कागदपत्रे घेऊन तलाठी...पातुर्डा, जि. बुलडाणा : पीककर्ज मिळवण्यासाठी...
दुसऱ्या लाटेचा बासमती तांदळास फटका कोल्हापूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका बासमती...
कृषी विभागात कोरोनामुळे आत्तापर्यंत २८...पुणे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने गेल्या काही...
‘पंदेकृवि’ने दीक्षान्त सोहळा पुढे...अकोला ः डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने...
कुर्जा खरेदी केंद्रावर धान मोजणीविना...भंडारा : पवनी तालुक्यातील कुर्जा येथे अनेक...
कापूस पिकासाठी यंत्रमानव ठरणार वरदान ः...अकोला ः देशांतर्गत कापूस लागवडीचे क्षेत्र १२९ लाख...
कृषी विभागातील पाच पुरस्कार्थींचे कौतुक पुणे : राज्याच्या कृषी खात्यात उल्लेखनीय कामे...
विमा उतरवा, अन्यथा बाजार समित्या बंद...पुणे/नाशिक ः शेतकरी, कामगार, राज्य सरकारचे सर्व...