हिंगोली ः जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात ३ लाख ५८ हजार ४०३ हेक्टरवर पेरणी प्रस्तावित आहे.
ताज्या घडामोडी
‘भरड धान्य खरेदी केंद्रांसाठी तातडीने कार्यवाही करा’
जळगाव ः जिल्ह्यात रब्बी हंगामात फक्त मका पीक हाती येऊ लागले आहे. परंतु त्याचे दरही पडले आहेत. रब्बी ज्वारीची मळणी सुरू आहे.
जळगाव ः जिल्ह्यात रब्बी हंगामात फक्त मका पीक हाती येऊ लागले आहे. परंतु त्याचे दरही पडले आहेत. रब्बी ज्वारीची मळणी सुरू आहे. या स्थितीत भरडधान्य खरेदीची तयारी प्रशासनाने करावी, अशी मागणी शेतकरी व शेतकरी संघटनांचे पदाधिकारी करीत आहेत.
सध्या हरभरा खरेदी काही तालुक्यात सुरू आहे. परंतु हरभरा, तुरीचे दर बाजारात टिकून आहेत. परंतु ज्वारी, मक्याचे दर कमी आहेत. ज्वारीमध्ये दादर ज्वारीचे दर स्थिर आहेत. शासकीय खरेदी लवकर सुरू न केल्यास शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे.
भरडधान्य खरेदी सुरू करून शेतकऱ्यांचा वित्तीय तोटा कमी करावा, यासाठी महाराष्ट्र राज्य शेतकरी संघटनेतर्फे किरण पाटील, संजय महाजन आदींनी आपल्या मेळाव्यात मुद्दा उपस्थित केला आहे. खरिपात मका उत्पादकांचे नुकसान अधिक झाले. मक्याची शासकीय खरेदी तोकडी करण्यात आली.
सध्या मक्याचे दर बाजारात १२४५ रुपये प्रतिक्विंटल आहेत. तर हमीभाव १८५० रुपये प्रतिक्विंटल आहे. या हंगामात शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागू नये, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत. यामुळे प्रशासनाने शासनाला अवगत करावे. शासकीय खरेदी लवकर सुरू करावी, अशी मागणी करण्यात आली.