‘फॅसिझमविरोधात लढण्यास  सक्षम पर्याय गरजेचा’ 

देशात सुरू असलेल्या फॅसिझमविरोधात लढण्यास सक्षम असलेला पर्याय तयार होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केले आहे.
‘To fight against fascism Need a viable option '
‘To fight against fascism Need a viable option '

मुंबई : देशात सुरू असलेल्या फॅसिझमविरोधात लढण्यास सक्षम असलेला पर्याय तयार होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केले आहे. त्यांनी बुधवारी (ता.१) राज्यातील ज्येष्ठ नेते शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी सिल्व्हर ओक येथे भेट घेतली. यानंतर बॅनर्जी आणि पवार यांनी संयुक्तरित्या माध्यमांना संबोधित केले. या वेळी राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि जितेंद्र आव्हाड उपस्थित होते.  बॅनर्जी म्हणाल्या, ‘‘आज ज्या प्रकारे देशात फॅसिझम सुरू आहे, त्याविरोधात सक्षम पर्याय निर्माण झाला पाहिजे. पण हे कोणा एकट्याचे काम नाही. जो सक्षम आहे, त्याला घेऊन हे करावे लागेल. भाजपविरोधात लढणारा सक्षम पर्याय असायला हवा, कोणी लढायला तयार नाही, त्याला आम्ही काय करणार?’’  शरद पवार युपीएमधील सर्वात वरिष्ठ नेते आहेत. त्यामुळे तुम्हाला वाटते का, की शरद पवारांनी युपीएचे नेतृत्व करायला हवं? या पत्रकारांच्या प्रश्नावर ममता म्हणाल्या, ‘‘अरे तुम्ही युपीएची काय भाषा करता आता युपीए राहिलेली नाही. आता फक्त ते जाहीर करायचे राहिले आहे. पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्राचे जुने नाते आहे. आज मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी पवार यांची भेट घेतली. आपल्याला २०२४ मधील लोकसभा निवडणुकीत भाजपविरोधात भक्कम पर्याय देता यावा, या बाबत आमची चर्चा झाली. नेता रस्त्यावर राहिला तरच त्या पक्षाचा विजय होतो, पण राहुल गांधी कायम परदेशात असतात.’’ पवार म्हणाले, ‘‘पश्चिम बंगालमध्ये ममतांचा जो विजय झाला, तो त्यांच्या मेहनतीने झाला आहे. त्यामुळे त्यांचा वैयक्तिक अनुभावावरुन त्यांनी हे विधान केले, ज्याचे आम्ही स्वागत करतो.’’

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com