Agriculture News in Marathi ‘To fight against fascism Need a viable option ' | Agrowon

‘फॅसिझमविरोधात लढण्यास  सक्षम पर्याय गरजेचा’ 

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 2 डिसेंबर 2021

देशात सुरू असलेल्या फॅसिझमविरोधात लढण्यास सक्षम असलेला पर्याय तयार होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केले आहे.

मुंबई : देशात सुरू असलेल्या फॅसिझमविरोधात लढण्यास सक्षम असलेला पर्याय तयार होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केले आहे. त्यांनी बुधवारी (ता.१) राज्यातील ज्येष्ठ नेते शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी सिल्व्हर ओक येथे भेट घेतली. यानंतर बॅनर्जी आणि पवार यांनी संयुक्तरित्या माध्यमांना संबोधित केले. या वेळी राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि जितेंद्र आव्हाड उपस्थित होते. 

बॅनर्जी म्हणाल्या, ‘‘आज ज्या प्रकारे देशात फॅसिझम सुरू आहे, त्याविरोधात सक्षम पर्याय निर्माण झाला पाहिजे. पण हे कोणा एकट्याचे काम नाही. जो सक्षम आहे, त्याला घेऊन हे करावे लागेल. भाजपविरोधात लढणारा सक्षम पर्याय असायला हवा, कोणी लढायला तयार नाही, त्याला आम्ही काय करणार?’’ 

शरद पवार युपीएमधील सर्वात वरिष्ठ नेते आहेत. त्यामुळे तुम्हाला वाटते का, की शरद पवारांनी युपीएचे नेतृत्व करायला हवं? या पत्रकारांच्या प्रश्नावर ममता म्हणाल्या, ‘‘अरे तुम्ही युपीएची काय भाषा करता आता युपीए राहिलेली नाही. आता फक्त ते जाहीर करायचे राहिले आहे. पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्राचे जुने नाते आहे. आज मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी पवार यांची भेट घेतली. आपल्याला २०२४ मधील लोकसभा निवडणुकीत भाजपविरोधात भक्कम पर्याय देता यावा, या बाबत आमची चर्चा झाली. नेता रस्त्यावर राहिला तरच त्या पक्षाचा विजय होतो, पण राहुल गांधी कायम परदेशात असतात.’’ पवार म्हणाले, ‘‘पश्चिम बंगालमध्ये ममतांचा जो विजय झाला, तो त्यांच्या मेहनतीने झाला आहे. त्यामुळे त्यांचा वैयक्तिक अनुभावावरुन त्यांनी हे विधान केले, ज्याचे आम्ही स्वागत करतो.’’


इतर बातम्या
आकडेवारीची जबाबदारी राज्याचीपदोन्नतीतील आरक्षणाच्या मुद्द्यावर आज सर्वोच्च...
सोयाबीन आणि कापसाचे मराठवाडा,...विदर्भ सोयाबीन बाजारभाव (Vidarbha soybean market...
 सर्वोच्च न्यायालयाचा महाराष्ट्र...सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) अखेर...
उन्हाळी पिकांच्या क्षेत्रात २९ टक्के...केंद्र सरकारने धान वगळता उन्हाळी पिकांखालील (...
वीज पुरवठा खंडित करणे हा अन्न सुरक्षा...शेतकर्‍यांकडील थकित विजबिल वसूल करण्यासाठी वीज...
Top 5 News: हरियाणाचं कापूस उत्पादन...1. गेल्या 24 जानेवारीच्या रात्रीपासून...
साखर उत्पादनात यंदा महाराष्ट्र अव्वल ऑल इंडिया शुगर ट्रेडर्स असोसिएशनच्या (AISTA) पीक...
उन्हाळी पिकांना केंद्र सरकार प्रोत्साहन...तेलबिया आणि कडधान्यांमध्ये आत्मनिर्भर (...
पावसामुळे रब्बी हंगामात बंपर उत्पादन...यंदाच्या हंगामात रब्बीच्या एकूण पेरणी क्षेत्रात...
येते दोन दिवस थंडीची लाट कायम राहणार?पुणे : गेल्या 24 जानेवारीच्या रात्रीपासून...
डीएपी खतांचा वापर कमी करा; एनपीके,...वृत्तसेवा - राज्यांनी एनपीके (NPK) आणि...
ओबीसींचा न्याय्य हक्क त्यांना देणारच ः...नागपूर : ‘डेटा देणार की नाही, देणार असतील तर...
एक लाख ६९ हजार शेतकरी कर्जमुक्त बुलडाणा : ‘‘महात्मा जोतीराव फुले शेतकरी...
कोल्हापूरसाठी ४०० कोटींचा निधी कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सर्वसाधारण वार्षिक...
मृत कर्जदारांची सुधारित माहितीसाठी २९...बुलडाणा : कर्जमुक्ती योजनेअंतर्गत मृत कर्जदारांची...
धुळे जिल्ह्यात पारा २.८ अंशांवरपुणे : उत्तर भारतातील शीत वाऱ्यांमुळे महाराष्ट्र...
खतांची चढ्या दराने विक्री नाशिक : रब्बी हंगामातील पिके सध्या जोमात आहेत....
खांडसरी, गूळ उद्योगावर येणार कायद्याचा...पुणे ः राज्यातील गूळ उद्योगावर कायदेशीर नियंत्रण...
‘पोकरा’मधील घोटाळ्याचा अहवाल दडपलापुणे ः नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पात (...
खाद्यतेल आत्मनिर्भरतेची घोषणाचपुणे ः देशात खाद्यतेलाची जवळपास ६० टक्के गरज...