Agriculture news in marathi ‘In Madha, Pandharpur, Malshiras Flood victims to get financial help ' | Page 2 ||| Agrowon

‘माढा, पंढरपूर, माळशिरसमधील पूरग्रस्तांना आर्थिक मदत मिळणार’

टीम अॅग्रोवन
शनिवार, 8 ऑगस्ट 2020

सोलापूर ः ‘‘गतवर्षी जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या महिन्यात भीमा नदीला आलेल्या पूरपरिस्थितीमुळे माढा, माळशिरस आणि पंढरपूर तालुक्यांतील शेतकऱ्यांच्या पिकांचे, फळबागांचे व जमिनीचे नुकसान झाले होते.

सोलापूर ः ‘‘गतवर्षी जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या महिन्यात भीमा नदीला आलेल्या पूरपरिस्थितीमुळे माढा, माळशिरस आणि पंढरपूर तालुक्यांतील शेतकऱ्यांच्या पिकांचे, फळबागांचे व जमिनीचे नुकसान झाले होते. त्यांच्यासाठी आठ कोटी ६७ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. लवकरच हे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होतील’’, अशी माहिती आमदार बबनराव शिंदे यांनी दिली. 

शिंदे म्हणाले, ‘‘गेल्या वर्षीच्या पावसाळ्यात जुलै-ऑगस्ट महिन्यामध्ये माढा तालुक्यातील १२ गावे, पंढरपूर तालुक्यातील २५ गावे आणि माळशिरस तालुक्यातील ९ गावांतील भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांचे पूर परिस्थितीमुळे फळबागा, चारा वैरण पिकांसहीत जमिनीचे देखील अतोनात नुकसान झाले.

संबंधित नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने शासनाने मदत करावी, म्हणून पाठपुरावा केला होता. पूरग्रस्त गावांसाठी २२ कोटी १४ लाख ६२ हजार ८०२ रुपयांची शासनाकडून मागणी केली होती. या पैकी १४ कोटी ४७ लाख १७ हजार ७११ रुपये डिसेंबरमध्ये मंजूर झाले होते. त्याचे तातडीने संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वाटप करण्यात आले.’’ 

‘‘ दरम्यान, काही पूरग्रस्त शेतकरी या अनुदानापासून वंचित राहिले होते. त्यांच्यासाठी अतिरिक्त ८ कोटी ६७ लाख ४५ हजार रपये एवढ्या अतिरिक्त निधीची शासनाकडे मागणी केली होती. त्यानुसार हा निधी मंजूर झाला. लवकरच तहसीलस्तरावरुन त्याचे वाटप होईल’’, असेही ते म्हणाले. 
 
 


इतर ताज्या घडामोडी
नाशिक जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे दाणादाणनाशिक : पावसाळा सुरू झाल्यानंतर अनेक ठिकाणी...
पीक कर्जासाठी बँकेत मुक्कामाची वेळ येऊ...बुलडाणा ः खरीप हंगामातील पिकांच्या काढणीची वेळ...
पाथरूड परिसरातील प्रकल्प तुडुंबपाथरूड, जि. उस्मानाबाद : पाथरूडसह परिसरात...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ९० टक्के...सिंधुदुर्ग ः जिल्ह्यातील ९० टक्के भातपिकांना...
परभणी, हिंगोलीत अतिवृष्टीमुळे पिकांवर...परभणी : खरीप हंगामातील सोयाबीन काढणीच्या, कापूस...
हिंगोली जिल्ह्यात सोयाबीनच्या शेंगांना...हिंगोली : गतवर्षी प्रमाणे यंदाही सोयाबीनचे पीक ऐन...
‘जायकवाडी’तील विसर्गात घटऔरंगाबाद : जिल्ह्यातील जायकवाडी प्रकल्पातून...
निम्न दुधनातून ७१९० क्युसेकने विसर्गपरभणी : सेलु तालुक्यातील ब्रम्हवाकडी येथील दुधना...
अनुदानाअभावी मर्यादित लाभार्थ्यांना...सिंधुदुर्ग ः कोरोनामुळे शासनाने जिल्हा परिषदेच्या...
ऊसतोडणीच्या तिढ्यावर आज चर्चापुणे : दहा लाख ऊस तोडणी कामगारांच्या मागण्यांबाबत...
यवतमाळ जिल्ह्यात सोयाबीन शेंगांना फुटले...यवतमाळ : खोडकीड, चक्रीभुंगा त्यानंतर आता परिपक्व...
संत्रा उत्पादकांना हेक्टरी लाखाची भरपाई...नागपूर : विदर्भात नैसर्गिक आपत्तीमुळे संत्रा,...
पुण्यात विशिष्ट ठिकाणीच लिंबे विक्रीला...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीने...
गाय एका आठवड्यात दोनदा व्यायली नाशिक ः येथील डॉ. इरफान खान हे व्यवसायाने डॉक्टर...
हवामान बदलाचे सेंद्रिय कर्बावरील परिणामजागतिक हवामान बदल आणि जागतिक तापमान वाढ हे शब्द...
पुण्यात भाजीपाल्याच्या आवकेत घटपुणे : गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
काही भागात पावसाच्या उघडिपीची शक्यता महाराष्ट्रावर बुधवार (ता.२३) पर्यंत  १००४...
राज्य द्राक्ष बागायतदार संघाची ...नाशिक: महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार...
पांगरी परिसरात पिकांवर आस्मानी संकटपांगरी, जि. सोलापूर ः पांगरी (ता. बार्शी) परिसरात...
शेतमाल स्थानिक भागात विकला जाणार : भुजबळनाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यात आदिवासी समाज...