नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर संचलनाद्वारे कृषी कायद्यांविरोधात शक्तीप्रदर्शनावर
ताज्या घडामोडी
नद्यांच्या काठावर १ कोटी बांबूरोपांची होणार लागवड : पाशा पटेल
औरंगाबाद : नद्यांचे संवर्धन करण्यासाठी 'नदी झाकी तो जल राखी' हे ब्रीद घेऊन येत्या पाच वर्षांत १ कोटी बांबूरोपांची नद्यांच्या काठावर लागवड करण्यात येईल.
औरंगाबाद : ‘‘नद्यांचे संवर्धन करण्यासाठी 'नदी झाकी तो जल राखी' हे ब्रीद घेऊन येत्या पाच वर्षांत १ कोटी बांबूरोपांची नद्यांच्या काठावर लागवड करण्यात येईल. त्यासाठी मोहीम हाती घेण्यात आली आहे,’’ अशी माहिती राज्य कृषी मूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल यांनी दिली.
पटेल औरंगाबाद येथे सोमवारी (ता.११) आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. पटेल म्हणाले, ‘‘उत्पन्न वाढ, पर्यावरण रक्षण हे दोन महत्त्वाचे उद्देश डोळ्यासमोर ठेऊन ही मोहीम हाती घेतली आहे. १ जानेवारी २०२१ ला या मोहिमेची सुरवात जवळवाडी (ता. पाटोदा, जि. बीड) येथून झाली. गोदावरी, मांजरा नदी व या दोन्ही नद्यांच्या उपनद्यांच्या काठावर बांबू लागवड होईल. भारत सरकार, राज्य सरकार, फिनिक्स फाउंडेशन व कलाम कृषी शेतकरी उत्पादक कंपनीतर्फे ही मोहीम राबविली जात आहे.’’
पटेल म्हणाले,‘‘पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यात बांबू महत्त्वाची भूमिका बजावेल. अधिक ३० टक्के कार्बन घेणे व ३२० किलो ऑक्सिजन देण्याची क्षमता बांबूमध्ये आहे. पेट्रोल, डिझेल जाळण येत्या २०३० पासून बंद करण्याचा निर्णय काही महत्त्वाच्या देशांनी घेतला आहे. भारतातही २०२७ पासून पेट्रोल, डिझेल वापरण्याचे प्रमाण घटविण्याचा संकल्प करण्यात आला आहे. त्यासाठी बांबू हे महत्त्वाचे पीक ठरणार आहे.’’
‘‘बांबूपासून इथेनॉल निर्मिती होते. याशिवाय सीएनजी, कपडा, फर्निचर, आदी वस्तूही बांबूपासून तयार होतात. त्यामुळे बांबू शेतीला चांगले दिवस असतील. एकरी एक लाख रुपये देण्याची क्षमता या पिकात आहे. केंद्र सरकार व राज्य शासन १ कोटी बांबू रोप देणार आहे. येत्या जूनपासून बांबू लागवड मोहिमेला अधिक व्यापक केले जाईल,’’ असेही पटेल यांनी सांगितले.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष संजय केनेकर, ओबीसी मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस भगवान घडामोडे, किसान मोर्चाचे शहराध्यक्ष मदन नवपूते, शिवाजीराव पाथ्रीकर, प्रा. राम बुधवंत आदींची उपस्थित होते.
- 1 of 1028
- ››