agriculture news in marathi ‘1 crore on the banks of rivers Bamboo plants to be planted ' | Agrowon

नद्यांच्या काठावर १ कोटी बांबूरोपांची होणार लागवड : पाशा पटेल

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 14 जानेवारी 2021

औरंगाबाद : नद्यांचे संवर्धन करण्यासाठी 'नदी झाकी तो जल राखी' हे ब्रीद घेऊन येत्या पाच वर्षांत १ कोटी बांबूरोपांची नद्यांच्या काठावर लागवड करण्यात येईल. 

औरंगाबाद : ‘‘नद्यांचे संवर्धन करण्यासाठी 'नदी झाकी तो जल राखी' हे ब्रीद घेऊन येत्या पाच वर्षांत १ कोटी बांबूरोपांची नद्यांच्या काठावर लागवड करण्यात येईल. त्यासाठी मोहीम हाती घेण्यात आली आहे,’’ अशी माहिती राज्य कृषी मूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल यांनी दिली. 

पटेल औरंगाबाद येथे सोमवारी (ता.११) आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. पटेल म्हणाले, ‘‘उत्पन्न वाढ, पर्यावरण रक्षण हे दोन महत्त्वाचे उद्देश डोळ्यासमोर ठेऊन ही मोहीम हाती घेतली आहे. १ जानेवारी २०२१ ला या मोहिमेची सुरवात जवळवाडी (ता. पाटोदा, जि. बीड) येथून झाली. गोदावरी, मांजरा नदी व या दोन्ही नद्यांच्या उपनद्यांच्या काठावर बांबू लागवड होईल. भारत सरकार, राज्य सरकार, फिनिक्स फाउंडेशन व कलाम कृषी शेतकरी उत्पादक कंपनीतर्फे ही मोहीम राबविली जात आहे.’’ 

पटेल म्हणाले,‘‘पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यात बांबू महत्त्वाची भूमिका बजावेल. अधिक ३० टक्‍के कार्बन घेणे व ३२० किलो ऑक्सिजन देण्याची क्षमता बांबूमध्ये आहे. पेट्रोल, डिझेल जाळण येत्या २०३० पासून बंद करण्याचा निर्णय काही महत्त्वाच्या देशांनी घेतला आहे. भारतातही २०२७ पासून पेट्रोल, डिझेल वापरण्याचे प्रमाण घटविण्याचा संकल्प करण्यात आला आहे. त्यासाठी बांबू हे महत्त्वाचे पीक ठरणार आहे.’’ 

‘‘बांबूपासून इथेनॉल निर्मिती होते. याशिवाय सीएनजी, कपडा, फर्निचर, आदी वस्तूही बांबूपासून तयार होतात. त्यामुळे बांबू शेतीला चांगले दिवस असतील. एकरी एक लाख रुपये देण्याची क्षमता या पिकात आहे. केंद्र सरकार व राज्य शासन १ कोटी बांबू रोप देणार आहे. येत्या जूनपासून बांबू लागवड मोहिमेला अधिक व्यापक केले जाईल,’’ असेही पटेल यांनी सांगितले.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष संजय केनेकर, ओबीसी मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस भगवान घडामोडे, किसान मोर्चाचे शहराध्यक्ष मदन नवपूते, शिवाजीराव पाथ्रीकर, प्रा. राम बुधवंत आदींची उपस्थित होते.


इतर बातम्या
केंद्र सरकारकडून कृषी कायदांना...नवी दिल्ली ः दिल्लीच्या सीमांवर कृषी...
जळगावात हरभरा आला कापणीलाजळगाव ः जिल्ह्यात रब्बीची पेरणी २००...
प्रदर्शनातील कृषी ज्ञानाचा खजाना पाहून...माळेगाव, जि. पुणे ः कृषिक २०२१- कृषी तंत्रज्ञान...
पुणे विभागात उसाच्या ५५ टक्के लागवडीपुणे ः यंदा पावसाळ्यात झालेल्या दमदार पावसामुळे...
देवना साठवण तलावाचा प्रलंबित प्रश्न...नाशिक : येवला तालुक्यातील अवर्षणप्रवण उत्तरपूर्व...
‘बर्ड फ्लू’ रोखण्यासाठी ९० दिवस...परभणी ः जिल्ह्यात बर्ड फ्लूचा प्रसार आणि संसर्ग...
ग्रामसभांना ३१ मार्चपर्यंत परवानगी...अकोला : राज्यातील ग्रामपंचायतींमध्ये कोविड-१९च्या...
अतिवृष्टीचा मदत आठवड्यात मिळणारसोलापूर : गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात झालेल्या...
महावितरणच्या आदेशामुळे वीज ग्राहक...सोलापूर : कोरोनाच्या साथीमुळे घटलेले आर्थिक...
भंडारा जळीत प्रकरणाचा अहवाल शासनाकडे नागपूर : भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील शिशू...
उन्हाळी सोयाबीन लागवडीस गतीअकोला : यंदाच्या खरीप सोयाबीन काढणीच्या वेळेस...
वारणेत उभारणार पशुवैद्यकीय महाविद्यालय...वारणानगर, जि. कोल्हापूर : येथील वारणा सहकारी...
राज्यात साडेचार लाख क्‍विंटल मका...औरंगाबाद : बंद पडलेली मका खरेदी जवळपास एका...
यवतमाळ : पोल्ट्रीत चार हजार कोंबड्यांचा...यवतमाळ : कोरोनाच्या संकटातून सावरू पाहणाऱ्या...
शेतकऱ्यांच्या भूमिकेवर न्यायालयाची...नवी दिल्ली ः कृषी कायद्यांवरून निर्माण झालेल्या...
तूर खरेदीसाठी जिल्हानिहाय उत्पादकता...परभणी ः केंद्र शासनाच्या किमान आधारभूत किंमत...
कांदा निर्यातदारांसाठी आता ‘ओनियन नेट’ नागपूर : कांदा उत्पादनाच्या बाबतीत जागतीक स्तरावर...
खानदेशात गारठा वाढला पुणे ः उत्तर भारतातील काही राज्यात थंडीची लाट आली...
खानदेशातून थंडी गायबजळगाव ः खानदेशात गेल्या तीन-चार दिवसांपासून...
परभणी जिल्ह्यात रब्बीत २४.०६ टक्के...परभणी ः जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामात...