Agriculture news in marathi ‘acquired land for Palkhi Marg Will pay for it ' | Agrowon

‘पालखी मार्गासाठी संपादित जमिनीचा मोबदला देणार'

टीम अॅग्रोवन
रविवार, 6 सप्टेंबर 2020

सोलापूर : मोहोळ-पंढरपूर या पालखी मार्गावर भूसंपादन केलेल्या शेतकऱ्यांना समृद्धी मार्गाच्या धर्तीवर लाभ दिला आहे. नुकतेच राष्ट्रीय महामार्गाकडून मोबदल्याची रक्कम आली आहे.

सोलापूर : मोहोळ-पंढरपूर या पालखी मार्गावर भूसंपादन केलेल्या शेतकऱ्यांना समृद्धी मार्गाच्या धर्तीवर लाभ दिला आहे. नुकतेच राष्ट्रीय महामार्गाकडून मोबदल्याची रक्कम आली आहे. लवकरच त्याचे वाटप करणार असल्याची माहिती प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिली. 

या रस्त्यावरील मांडवे वस्तीजवळील एक किलोमीटर रस्त्याचे काम पूर्ण झाले. त्यावरून सोलापूर- कराड ही पहिली एसटी बस सोडून रस्ता प्रथमच खुला करण्यात आला. त्यावेळी ढोले बोलत होते. 

ढोले म्हणाले, ‘‘या रस्त्यासाठी आतापर्यंत सुमारे २५० कोटी रुपये वाटप केले आहेत. ज्यांच्या जमिनींचे अधिग्रहण केले आहे, त्यांना लाभ दिला आहे. अनेकांना कौटुंबिक वादामुळे मोबदला देणे राहिले आहे, ते वादही लवकरच मिटवण्यात येतील. त्यानंतर रस्त्याचे काम अधिक वेगाने करून लवकर पूर्ण होण्यासाठी प्रयत्न करत आहोत. या रस्त्यावरून वाहतूक वेगाने आणि जलद होणार आहे. त्यामुळे प्रवाशांचा वेळ, इंधन आणि पैसा वाचणार आहे.’’

या वेळी प्रकल्प संचालक संजय कदम, प्रकल्प व्यवस्थापक एन. पाशा, समन्वयक अनिल विपत, अभियंता यादव कुर्मा, भाजपचे तालुका सरचिटणीस रमेश माने, तालुका कृषी अधिकारी बापूसाहेब मोरे, नगरसेवक प्रमोद डोके, विवेक भांगे, शेतकरी नारायण मांडवे आदी उपस्थित होते.


इतर ताज्या घडामोडी
ट्रायकोडर्मा वापरण्याच्या पद्धतीट्रायकोडर्मा ही उपयुक्त बुरशी असून, ती रोपांच्या...
जनावरांचे पावसाळ्यातील व्यवस्थापनपावसाळ्यात होणाऱ्या वातावरणातील अचानक बदलामुळे...
खानदेशात अत्यल्प पेरणीजळगाव ः खानदेशात या महिन्यात अपवाद वगळता हवा तसा...
नांदेडमध्ये सोयाबीनचे क्षेत्र वाढण्याची...नांदेड : जिल्ह्यात यंदा चार लाख हेक्टरवर...
परभणीत १२.६४ टक्के पेरणीपरभणी ः जिल्ह्यात यंदाच्या (२०२१) खरीप हंगामात...
देशात वीज पडून दरवर्षी दोन हजार...पुणे : हरिताच्छादन कमी झाल्याने होणारी तापमान वाढ...
कांदा उत्पादक शेतकऱ्याचा प्रामणिकपणानाशिक : जगात प्रामाणिकपणा लोप पावत चालला असल्याची...
अन्नद्रव्यांवरून खतांचे व्यवस्थापन...गेवराई, जि. बीड : जमिनीतील उपलब्ध...
आंबेओहळ प्रकल्पात  ३० टक्के पाणीसाठाकोल्हापूर : आजरा तालुक्यात असलेल्या आंबेओहळ...
वनौषधी पानपिंपरीचे दर वाढल्याने...अकोला ः जिल्ह्यात सातपुड्याच्या पायथ्याशी अकोट,...
नुकसान टाळण्यासाठी  मिश्र पिकांवर भरराळेगाव, जि. यवतमाळ : गेल्या वर्षी कपाशीवर आलेली...
यवतमाळमध्ये अनधिकृत खतांचा साठा जप्तयवतमाळ : परवान्यात नसतानाही खतांचा अनधिकृतपणे...
सांगली जिल्ह्यात खरिपाची २५ टक्के...सांगली : जिल्ह्यात खरीप हंगामाचे सरासरी क्षेत्र २...
सूक्ष्म खाद्य उन्नयन योजनेसाठी अर्ज...वाशीम : जिल्ह्यात २०२०-२१ ते २०२४-२५ या...
पुण्याचा पर्यटन विकास आराखडा तयार करा पुणे : जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी सविस्तर...
प्रताप सरनाईकांचे ठाकरेंना पत्र; ...मुंबई : शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी...
काळानुरूप बदल स्वीकारा : नितीन गडकरीवर्धा : बाजार समित्यांनी केवळ शेतमाल खरेदी विक्री...
संत्रा आयात शुल्कप्रकरणी बांगलादेशशी...अमरावती : नागपुरी संत्र्याचा सर्वात मोठा आयातदार...
मॅग्नेट ः फलोत्पादन पिकांसाठी एकात्मिक...राज्यातील कृषी हवामान विभागनिहाय फळे, भाजीपाला व...
शेतीवरील आर्थिक ताण कमी करण्यासाठी...हरितक्रांतीनंतर काही दशकांमध्ये विपरीत परिणाम...