‘कृषी अधिकारीच म्हणतात, खतांसंदर्भात फोन करू नका’

पुणे ः शेतकऱ्यांना खतांची टंचाई भासत आहे. खतांसंदर्भात अधिकारी चक्क फोन करू नका, असे सांगून जबाबदारी झडकण्याचा प्रयत्न करत असेल तर कृषी आयुक्तालयाला टाळे ठोकण्याचा इशारा शेतकरी संघटनेचे क्रांतिसिंह नाना पाटील ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष शिवाजीराव नांदखिले यांनी दिला आहे.
‘Agriculture officials say, don't call for fertilizers’
‘Agriculture officials say, don't call for fertilizers’

पुणे ः शेतकऱ्यांना खतांची टंचाई भासत आहे. कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने पाठपुरावा करून युरियासह अन्य खते उपलब्ध करून देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. मात्र, खतांसंदर्भात अधिकारी चक्क फोन करू नका, असे सांगून जबाबदारी झडकण्याचा प्रयत्न करत असेल तर कृषी आयुक्तालयाला टाळे ठोकण्याचा इशारा शेतकरी संघटनेचे क्रांतिसिंह नाना पाटील ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष शिवाजीराव नांदखिले यांनी दिला आहे.  

‘पुणे जिल्ह्यात युरियाची टंचाई’ ही बातमी ‘अॅग्रोवन’मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयातील मोहीम अधिकारी रवी कावळे यांना वरिष्ठांकडून खुलासा देण्याची मागणी केली आहे. त्यामुळे मोहीम अधिकारी यांनी युरिया खतांसंबधी शेतकऱ्यांना माहिती न देण्याची भूमिका घेतली आहे.

याबाबत प्रदेशाध्यक्ष नांदखिले म्हणाले की, सध्या खरीप हंगाम सुरू आहे. शेतकऱ्यांना बाजरी, तूर, मूग, उडीद पिकांसाठी युरियाची खूप गरज आहे. मात्र, शेतकऱ्यांना युरियासाठी वणवण फिरावे लागत आहे. अनेक ठिकाणी दुकांनामध्ये युरिया मिळत नाही. दुकानदारांना विचारल्यानंतर माल मिळत नसल्याचे सांगत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना युरिया मिळत नसल्याने पिकांसाठी खत टाकण्यापासून वंचित आहे. परिणामी पिके पिवळे पडत आहे. येत्या आठ दिवसांत कृषी विभागाने युरिया उपलब्ध करून द्यावा. अन्यथा अधिकाऱ्यांना व कंपन्यांना शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल.  

कृषी सेवा केंद्राकडून अधिकाऱ्यांना हप्ते जातात. त्यामुळे सेवा केंद्राचालकांविरूद्ध कारवाई करण्यास धजावत नाही. कारण ते हातबट्यातील व्यवहार करतात. केंद्र चालकांनी सर्व माहिती समोर लावली पाहिजे. खतांचे दर वेगवेगळे आढळून येत असून दुकांनदारांच्या नफेखोरीत अधिकारीही सामील आहेत. शेतकरी अडचणीत असताना खतांची माहिती देणे हे अधिकाऱ्यांना बंधनकारक आहे. - पांडुरंग रायते, पुणे जिल्हा अध्यक्ष, शेतकरी संघटना

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com