Agriculture news in Marathi ‘Agriculture Technology Parayan’ in ten districts | Agrowon

दहा जिल्ह्यांत ‘कृषी तंत्रज्ञान पारायण’

टीम अॅग्रोवन
रविवार, 26 सप्टेंबर 2021

शेतीपिके आणि पशुसंवर्धनाबाबत ऐनवेळी उद्‍भवलेल्या अडचणीवर मात करून वेळीच नुकसान टाळण्यासाठी मार्गदर्शन मिळावे यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडून कार्यक्षेत्रातील दहा जिल्ह्यांत ‘कृषी तंत्रज्ञान पारायण’ उपक्रम राबविला जात आहे.

नगर ः फळबागा, शेतीपिके आणि पशुसंवर्धनाबाबत ऐनवेळी उद्‍भवलेल्या अडचणीवर मात करून वेळीच नुकसान टाळण्यासाठी मार्गदर्शन मिळावे यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडून कार्यक्षेत्रातील दहा जिल्ह्यांत ‘कृषी तंत्रज्ञान पारायण’ उपक्रम राबविला जात आहे. त्यासाठी शास्त्रज्ञांचे पथक नियुक्त केले आहे.

प्रारंभी प्रत्येक जिल्ह्यातील एका गावांची निवड केली जाईल. सांगली जिल्ह्यातील शेटफळ येथून या उपक्रमाला सुरुवात केली असून, यापुढे हा कार्यक्रम कायम सुरू राहील. कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञांसह कृषी व पशुसंवर्धन विभागही सहभागी असेल. 

शेतपिके, फळपिके, पशुसंवर्धन याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळावे आणि वेळीच होणारे नुकसान टाळण्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडून कृषी तंत्रज्ञान पारायण हा उपक्रम राबवला जात आहे. कार्यक्षेत्रातील नंदूरबार, जळगाव, धुळे, नाशिक, नगर, पुणे, सोलापूर, सांगली, सातारा व कोल्हापूर या जिल्ह्यांत हा उपक्रम असेल. कृषी महाविद्यालये, संशोधन केंद्र, कृषी विज्ञान केंद्रे, विभागीय विस्तार केंद्रे, जिल्हा विस्तार केंद्रे, कृषी विभाग व पशुसंवर्धन विभागाचा सहभाग असेल. 

प्रारंभी प्रत्येक जिल्ह्यात एक गाव निवडले जाईल. त्या गावांत शास्त्रज्ञांचा चमू भेट देऊन त्या गावातील जमीन, हवामान, गावालगत एखादे मोठे शहर आहे का? कृषी प्रक्रिया उद्योग, याचा अभ्यास करून मातीतील कर्बाचे प्रमाण वाढवणे, पाण्याचा शेतीसाठी काटेकोर वापर, पाणी व्यवस्थापनातून उत्पादन वाढ, सेंद्रिय शेती म्हणजे काय, सेंद्रिय शेती कशी करायची, सेंद्रिय शेतीमुळे होणारे फायदे, शेती उत्पादन खर्च कमी करण्यासाठी उपाय, स्मार्ट शेती, रासायनिक खतांचा समतोल वापर, जमीन आरोग्य पत्रिकेनुसार खतांचा वापर, रिमोट सेंन्सींग तंत्राचा शेतीमधील वापर, सूक्ष्म सिंचनाचे प्रकार, स्थानिक हवामानानुसार शेती सल्ला, फळबाग व्यवस्थापन, शेतीमध्ये आधुनिक तंत्राचा वापर, जनावरांसाठी वर्षभराचे चारा नियोजन, अधिक दुग्ध उत्पादनासाठी जनावरांचे व्यवस्थापन, मुक्त गोठा पद्धतीचे फायदे, देशी गोवंश व्यवस्थापन, मुरघास तंत्रज्ञान, शेळीपालन तंत्रज्ञान, पूर्वमशागतीचे अवजारे, शेतीचे यांत्रिकीकरण, कृषी माल प्रक्रिया, मूल्यवर्धन अशा विविध विषयांवर दिवसभर कृषी शास्त्रज्ञ शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतील व त्यांच्याशी संवाद 
साधतील. 

कवी ग. दि. माडगुळकर यांचे जन्मगाव शेटफळे या गावातून या उपक्रमाला सुरुवात झाली आहे. तेथे डॉ. अनिल दुरगुडे, डॉ. अशोक वाळुंज, डॉ. देवेंद्र इंडी, डॉ. प्रकाश मोरे या विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी मार्गदर्शन केले. प्रारंभी प्रत्येक जिल्ह्यातील एक गाव निवडले जाणार असले तरी पुढील काळात या उपक्रमाची व्याप्ती वाढवली जाणार आहे.

राज्यातच नव्हे तर देशात ‘कृषी तंत्रज्ञान पारायण’ हा शेतकरीभिमुख तंत्रज्ञान प्रसाराचा कार्यक्रम प्रथमच आम्ही राबविणार आहोत. यासाठी जिल्हानिहाय शास्त्रज्ञांचा चमू बनवून हा प्रत्येक हंगामातील एक दिवस एक गाव प्रति जिल्हा तंत्रज्ञान प्रसारासाठी घेणार आहे. अशा उपक्रमामुळे शेतकऱ्यांना शेती करण्याचे शास्त्रीय ज्ञान मिळेल व त्यांच्या उत्पन्नात वृद्धी होईल. 
- डॉ. पी. जी. पाटील
कुलगुरू, महात्मा फुले 
कृषी विद्यापीठ, राहुरी


इतर अॅग्रो विशेष
संत्रा छाटणी यंत्र ‘पंदेकृवि’त दाखलअकोला : दिवसेंदिवस या भागात संत्र्याची लागवड वाढत...
‘टॅगिंग’ कपात उपक्रमाच्या यादीत ५३ साखर...पुणे ः थकीत देणी वसूल करण्यासाठी राज्य सरकारने...
शेळीमध्ये टेस्ट ट्यूब बेबीची निर्मितीअकोला ः महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ...
शेतीसाठी दिवसा बारा तास विद्युतपुरवठा...नागूपर : शेतकऱ्यांचे धानाचे पीक गर्भात आहे, ते...
द्राक्ष विमा परताव्यासाठी चकरा...नाशिक : मार्च २०२१ अखेरीस संपलेला द्राक्ष...
मॉन्सूनोत्तर पावसाचा पिकांना दणकापुणे : गेल्या दोन दिवसांपासून पावसासाठी पोषक...
देशातील सोयाबीनची केवळ २७ टक्के काढणीपुणे : खरीप हंगाम २०२१-२२मध्ये सोयाबीनची लागवड...
संघर्षातून फुलले शेतीमध्ये 'नवजीवन'अवघी दोन एकर जिरायती शेती. खाण्यापुरती बाजरी...
विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
विदर्भ, मराठवाड्यात उद्यापासून पावसाची...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) संपूर्ण...
सूक्ष्म सिंचन अनुदानात वाढपुणे ः केंद्र सरकारने पंतप्रधान कृषी सिंचन...
मॉन्सूनची महाराष्ट्रातून माघारपुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
भाजपच्या जातीयवादाला धर्मनिरपेक्षवादाने...मुंबई ः या देशात भाजप जो टोकाचा जातीयवाद करतो आहे...
‘कथनी आणि करणी’त फरक पुन्हा उघडपुणे : आधीच अतिवृष्टीच्या तडाख्यात सापडलेल्या...
बाजाराचा अंदाज घेऊनच सोयाबीन विक्री करापुणे : सरकारने खाद्यतेल आयात शुल्कात कपात...
लातुरात सोयाबीनच्या भावात तीनशेची घसरणलातूर ः खाद्यतेल आयात शुल्क कपातीच्या निर्णयानंतर...
आमदारांच्या स्थानिक विकास निधीत एक...मुंबई : आमदारांचा स्थानिक विकास निधी दोन...
झेंडूसह अन्य फुलांमध्ये शिरसोलीची ओळखजळगाव जिल्ह्यातील शिरसोली गाव फुलशेतीसाठी...
मॉन्सूनचा महाराष्ट्रातून निरोपपुणे : राजस्थानातून परतीच्या प्रवासाला उशिरा...
देशी केळी अन रताळ्यांना नवरात्रीसाठी...कोल्हापूर जिल्ह्यात नवरात्रीच्या निमित्ताने...