‘आंबेओहोळ’ची  घळभरणी अंतिम टप्यात Of ‘Ambeohol’ In the final stages of filling
‘आंबेओहोळ’ची  घळभरणी अंतिम टप्यात Of ‘Ambeohol’ In the final stages of filling

‘आंबेओहोळ’ची घळभरणी अंतिम टप्यात 

आरदाळ-उत्तूर (ता. आजरा) दरम्यान साकारत असलेल्या आंबेओहळ प्रकल्पाच्या घळभरणीचे काम अंतिम टप्प्यात आहे. येत्या पावसाळ्यात या प्रकल्पात पाणी साठवण्याचे शासनाचे नियोजन आहे.

उत्तूर, जि. कोल्हापूर : आरदाळ-उत्तूर (ता. आजरा) दरम्यान साकारत असलेल्या आंबेओहळ प्रकल्पाच्या घळभरणीचे काम अंतिम टप्प्यात आहे. येत्या पावसाळ्यात या प्रकल्पात पाणी साठवण्याचे शासनाचे नियोजन आहे. त्यामुळे प्रकल्पाच्या घळभरणीसह शिल्लक कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. या प्रकल्पामुळे आजरा तालुक्‍यातील २१२३ व गडहिंग्लज तालुक्‍यातील ४२२० हेक्‍टर जमीन ओलिताखाली येणार आहे. 

१ मार्चला प्रकल्पग्रस्तांचा विरोध गृहीत धरून पोलिस बंदोबस्तात कामाला सुरुवात झाली; मात्र आता या ठिकाणचा बंदोबस्त काढून घेतला आहे. स्थानिक पोलिसांच्या मदतीने धळभरणीचे काम सुरू आहे. या प्रकल्पाच्या माती धरणाची लांबी १९७५ मीटर आहे. २७.७८ मीटर उंची आहे. धरणाची माथा पातळी ६९०.२३० आहे. दोन्ही तिरावरील मातीकाम पूर्ण झाले आहे. धळभरणीचे खोदकाम ७७७५१ घनमीटर आहे. मातीकाम २५१४५८ घनमीटर आहे. घळभरणीसाठी १,९५३ लाख निधीची तरतूद आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com