agriculture news in marathi ‘Apply online for Krishi Swavalamban Yojana’ | Agrowon

‘कृषी स्वावलंबन योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करा`

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 30 ऑक्टोबर 2020

परभणी : ‘‘बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना २०२०-२१ अंतर्गत शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे.

परभणी : ‘‘बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना २०२०-२१ अंतर्गत शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. याचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी महाडीबीटीपीच्या mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर दाखल ऑनलाइन अर्ज करावे’’, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातर्फे करण्यात आले.

बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना (क्षेत्राबाहेरील) व डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेच्या अंतर्गत नवीन विहीर खोदण्यासाठी २ लाख ५० हजार रुपये, जुनी विहीर दुरुस्तीसाठी ५० हजार रुपये, इनवेल बोरिंगसाठी २० हजार रुपये, विद्युत पंपासाठी २० हजार रुपये, वीज जोडणीसाठी १० हजार रुपये, शेततळे अस्तरीकरणासाठी १ लाख रुपये, सुक्ष्म व ठिबक सिंचनासाठी ५० हजार रुपये किंवा तुषारसाठी २५ हजार आणि परसबागेसाठी ५ हजार रुपये,  तसेच पीव्हीसी व एचडीपीई पाइपसाठी ३० हजार रुपये लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यांवर देण्यात येतात. 

या योजनेअंतर्गत नवीन किंवा जुनी विहीर दुरुस्ती व शेततळे प्लास्टिक अस्तरीकरण यापैकी एका योजनेचा पॅकेज स्वरूपात लाभ संबंधितांना देण्यात येतो. त्यासाठी योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्याकडून ऑनलाइन अर्ज मागवून घेतले जातात. विशेष घटक अथवा शासनाच्या कोणत्याही नवीन विहीर व जुनी विहीर दुरुस्ती या योजनेचा लाभ घेतला असेल, त्यांना लाभ मिळत नाही.

ग्रामसभेने शिफारस केलेल्या शेतकऱ्यांनी संकेतस्थळावर अर्ज दाखल करावे. गटविकास अधिकाऱ्यांतर्फे प्रस्तावाची मूळ प्रत आवश्यक त्या कागदपत्रांसह कृषी अधिकारी पंचायत समिती यांच्याकडे सादर करावी. योजनेचा कालावधी नवीन सिंचन विहीर पॅकेजसाठी २ वर्षांचा असून इतर बाबीसाठी १ वर्षाचा आहे. प्रस्ताव सादर केल्याची पोच घ्यावी, असे आवाहन कृषी व पशुसंवर्धन सभापती मीरा टेंगसे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक, कृषी विकास अधिकारी हनुमंत ममदे यांनी केले.


इतर ताज्या घडामोडी
नगरमध्ये डाळिंबाच्या दरात सुधारणानगर ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न...
एफआरपीप्रश्नी सोलापूर जिल्ह्यातील बैठक...सोलापूर : जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी अद्यापही...
नांदेड जिल्ह्यात ढगाळ वातावरणाचा...नांदेड : खरिपातील नुकसानीनंतर शेतकऱ्यांनी...
शहीद नितीन भालेराव अनंतात विलीननाशिक : भारतीय निमलष्कराच्या केंद्रीय राखीव पोलिस...
डाळिंब, आंब्याच्या विम्यासाठी ३१...नाशिक : ‘‘राज्य शासनाच्या पुनर्रचित हवामान आधारित...
परभणी, पाथरी, गंगाखेडमधील कापसाची...परभणी : ‘‘राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन...
परभणीतील अपात्र शेतकऱ्यांकडून ‘शेतकरी...परभणी : पंतप्रधान किसान सन्मान निधी (पीएम- किसान...
खानदेशात रब्बीसाठी आवर्तनांची प्रतीक्षाजळगाव : खानदेशात सर्वच प्रकल्पांमधील जलसाठे मुबलक...
औरंगाबाद, बीड जिल्ह्यात विशेष पथके...औरंगाबाद : औरंगाबाद व बीड जिल्ह्यात बिबट्याच्या...
जळगाव जिल्हा परिषदेत रिक्त पदांमुळे...जळगाव : ग्रामविकासाचा केंद्रबिंदू असलेल्या जिल्हा...
अंबड तालुक्यात चार ठिकाणी कापूस खरेदी...अंबड, जि. जालना : तालुक्यात चार ठिकाणी कापूस...
पपई उत्पादकांना खर्चही निघेनाअकोला : पारंपरिक पिकांची चाकोरी सोडत शेतकरी...
मराठवाड्यात तुरीवरच शेतकऱ्यांचे आर्थिक...औरंगाबाद : यंदा अतिपावसाने उडीद, सोयाबीनचे अतोनात...
खडकपूर्णा धरणाचे आवर्तन अखेर सुरूबुलडाणा : देऊळगावराजा तालुक्यातील शेतकऱ्यांना...
...तर महावितरणचे कार्यालय जाळणार :  आ....अमरावती :  वरुड, मोर्शी तालुक्यांत...
मक्यावर अमेरिकन लष्करी अळीनगर  : नगर तालुक्यातील पिंपळगाव वाघा परिसरात...
पुण्यात भात काढणी अंतिम टप्प्यातपुणे  : दिवाळी सणामुळे भात पट्यात अनेक...
टेंभूचे आवर्तन सुरू करण्याची मागणीकडेगाव, जि. सांगली  : रब्बी हंगामासाठी टेंभू...
सांगलीत एफआरपीची प्रतीक्षासांगली : जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी ऊस...
शेतकऱ्यांच्या अनुदानाबाबत ठाकरे सरकार...नांदेड : निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरे यांनी...