agriculture news in marathi ‘Benefits of agricultural schemes Can be taken till January 10 ' | Agrowon

‘कृषीच्या योजनांचा लाभ १० जानेवारीपर्यंत घेता येणार’

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 7 जानेवारी 2021

बुलडाणा ः महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याची मुदत शासनातर्फे वाढविण्यात आली आहे.

बुलडाणा ः महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याची मुदत शासनातर्फे वाढविण्यात आली आहे. आता शेतकऱ्यांना रविवार (ता. १०) पर्यंत अर्ज करता येणार असून शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज भरून लाभ घ्यावा, असे आवाहन सिंदखेडराजा तालुका कृषी अधिकारी वसंत राठोड केले आहे.

कृषी योजनांचा लाभ घेण्यासाठी यापूर्वी ३१ डिसेंबर २०२० पर्यंत मुदत होती. सध्या महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन अर्ज भरणे चालू आहे. विशेष बाब म्हणजे शेतकऱ्यांना आवश्यक असणाऱ्या विविध बाबीसाठी एकदाच नोंदणी करावी लागणार आहे. वारंवार कागदपत्रे देण्याची गरज नाही. आपल्याला आवश्यक असणाऱ्या बाबींचा प्राधान्यक्रम ठरवून नोंदणी करावी. 

लाभार्थी निवड ही नियमाप्रमाणे सोडत पद्धतीने होणार आहे. एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानाअंतर्गत कांदा चाळ, पॅक हाऊस, जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन, फळबागांना आकार देणे, फळबाग लागवड, मधुमक्षिकापालन, हरितगृह, शेडनेट हाऊस, प्लास्टिक मल्चिंग, स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेअंतर्गत आंबा लागवड, डाळिंब लागवड, मोसंबी लागवड, पेरू लागवड, सीताफळ लागवड, तसेच इतर फळबाग लागवड योजना, कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत ट्रॅक्टर, प्रक्रिया संच, पॉवर टिलर, बैलचलित अवजारे, मनुष्य अवजारे, स्वयंचलित अवजारे, कल्टीवेटर, कापणी यंत्र, नांगर, पेरणी यंत्र, मल्चिंग यंत्र, मळणी यंत्र, रोटावेटर, वखर, ठिंबक सिंचन, तुषार सिंचन (स्प्रिंकलर), मोटार पंप संच, डिझेल इंजिन संच, वैयक्तिक शेततळे, शेतातील शेततळे मध्ये प्लास्टिक मल्चिंग, सामूहिक शेततळे आदींचा योजनेत समावेश आहे.


इतर बातम्या
तुळशी धरणक्षेत्रात उच्चांकी ८९५...कोल्हापूर : जिल्ह्यातील तुळशी (ता.राधानगरी)...
टीका, आरोपांचा समाचार; दुसऱ्या दिवशीही...नवी दिल्ली : संयुक्त किसान मोर्चाने आयोजित शेतकरी...
कोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची...पुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या...
मराठवाड्यात पावसाचा जोर ओसरलाऔरंगाबाद : मराठवाड्यात गुरूवारच्या (ता.२२) तुलनेत...
औरंगाबाद जिल्ह्यात हमीभावातील ज्वारी,...औरंगाबाद : जिल्ह्यात आधारभूत दराने खरेदी केंद्र...
नांदेड जिल्ह्यात खरीप पिके पाण्याखालीनांदेड : जिल्ह्यात बुधवारनंतर गुरुवारी झालेल्या...
खानदेशात कांद्याच्या रोपवाटिका...जळगाव : खानदेशात कांदा रोपवाटिकांमध्ये रोपे...
अतिवृष्टीचा हिंगोलीतील ७१ गावांत दणकाहिंगोली ः जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात जुलै...
चिपळूणमधील दीड हजार जणांना पुरातून...रत्नागिरी : अतिवृष्टीचा तडाखा चिपळूण, खेड,...
‘हतनूर’चे ३६ दरवाजे उघडलेजळगाव : तापीनदीवरील भुसावळनजीकच्या हतनूर धरणाच्या...
`रावळगाव`च्या जप्त साखर विक्रीतून ‘...नाशिक : ‘‘मालेगाव तालुक्यातील एस.जे. शुगर रावळगाव...
पेठ, त्र्यंबकेश्वरला मुसळधारनाशिक : जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात पेठ,...
बुलडाण्यातील खरीप पीकविमा प्रश्नावर...बुलडाणा : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गेल्या खरीप...
पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेने कामबंद...वाशीम : जिल्ह्यात पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेने...
शेकडो घरे पाण्याखाली; दरड कोसळून...सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात गुरुवारी (ता. २२)...
पुणे जिल्ह्यातील धरणक्षेत्रात पावसाचा...पुणे : पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागात मुसळधार...
अतिवृष्टी, पुराचा अकोल्यातील ३३ हजार...अकोला : जिल्ह्यात अतिवृष्टी व पुरामुळे ३३ हजार...
गोसीखुर्द प्रकल्पाचे ३१ दरवाजे उघडले नागपूर : विदर्भात सर्वदूर पावसाने जनजीवन विस्कळीत...
सातारा जिल्ह्यातील पाच धरणांतून ७५ हजार... सातारा : गेले तीन दिवस सातारा जिल्ह्याच्‍या...
ढगफुटीने हाहाकारपुणे : पश्‍चिम महाराष्ट्रात मॉन्सूनच्या पावसाने...