‘सीडी रेशो’ घसरलेल्या  जिल्ह्यांमध्ये उपाय सुरू 

कर्जवाटप व ठेवीचे गुणोत्तर (सीडी रेशो) प्रमाण घसरलेल्या जिल्ह्यांमध्ये विविध उपाय लागू करण्यात आले आहेत. विदर्भातील चार जिल्ह्यांमध्ये ही समस्या असून ते उपसमित्यांच्या वारंवार बैठका घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
‘CD ratio’ dropped Measures started in districts
‘CD ratio’ dropped Measures started in districts

पुणे ः कर्जवाटप व ठेवीचे गुणोत्तर (सीडी रेशो) प्रमाण घसरलेल्या जिल्ह्यांमध्ये विविध उपाय लागू करण्यात आले आहेत. विदर्भातील चार जिल्ह्यांमध्ये ही समस्या असून ते उपसमित्यांच्या वारंवार बैठका घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 

सहकार विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गोंदिया, गडचिरोली, भंडारा आणि चंद्रपूर अशा चार जिल्ह्यांमधील गुणोत्तर ४० टक्क्यांपेक्षा खाली आलेले आहे. त्या बाबत दोन महिन्यांपूर्वी राज्य शासन व बॅंकांसोबत झालेल्या बैठकीत चर्चा झाली होती. ६० ते ६५ टक्क्यांपर्यंत गुणोत्तर असल्यास ती स्थिती जिल्ह्यासाठी उत्तम असते. रिझर्व्ह बॅंकेच्या नियमानुसार गुणोत्तर पाळण्याचा प्रयत्न प्रत्येक जिल्ह्यात होत असून, त्याला यशही मिळते आहे. मात्र विदर्भातील काही जिल्ह्यांबाबत चिंता व्यक्त करण्यात आली. तेथे विविध बॅंकांकडून उपाययोजना केल्या जात आहेत. 

कर्जवाटप व ठेवीचे घसरलेले गुणोत्तर सुधारण्यासाठी या जिल्ह्यांमध्ये विशेष उपसमित्या कार्यान्वयीत करण्यात आलेल्या आहेत. ‘‘४० टक्क्यांच्या वर गुणोत्तर प्रमाण नेण्यासाठी या जिल्ह्यांमधील अग्रणी बॅंकांच्या व्यवस्थापकांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. जे उपाय आवश्यक असतील ते लागू करून ही स्थिती सुधारावी, असेही या व्यवस्थापकांना सांगण्यात आलेले आहे. त्यासाठी या जिल्ह्यांमधील सर्व बॅंकांचे कामकाज सातत्याने संनियंत्रणाखाली ठेवले जात आहे. या प्रयत्नांना यशदेखील काही ठिकाणी मिळत आहे,’’ असेही सूत्रांचे म्हणणे आहे. 

गुणोत्तर वाढविण्यासाठी सर्वच बॅंकांची जिल्हा व गटांमधील स्थिती तपासून त्यावर सूचना केल्या जात आहेत. त्या बाबत विशेष उपसमित्यांच्या बैठकांमध्ये आढावा घेतला जात आहेत. कमी गुणोत्तरामुळे शेतकरी व गरजू घटक कर्जापासून वंचित राहणार नाही, यासाठी दक्षता घेतली जात असल्याचा दावा सहकार विभागाच्या एका अधिकाऱ्याने केला आहे. 

‘‘स्वयंसाह्यता गट, किसान क्रेडिट कार्डधारक शेतकरी कर्जापासून दूर राहणार नाही. तसेच दुग्धविकास, पशुसंवर्धन, मत्स्य व्यवसायासाठी कर्ज द्यावे तसेच मुद्रा योजनेसाठी आलेल्या कर्जप्रस्तावांबाबत सहानुभूतिपूर्वक विचार करावा, असे बॅंकांनना सांगण्यात आले आहे,’’ असे या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com