मांजरममध्ये दूध उत्पादकांचे ‘चाबूक फोडो ’ आंदोलन

नांदेड : रयत क्रांती संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मांजरम (ता. नायगाव) येथे दूध दरवाढीच्या मागणीसाठी सरकारच्या प्रतीकात्मक पुतळ्यास शेणाने अंघोळ घालत चाबूक फोडो आंदोलन करण्यात आले.
‘Chabuk Fodo’ movement of milk producers in Manjaram
‘Chabuk Fodo’ movement of milk producers in Manjaram

नांदेड : रयत क्रांती संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मांजरम (ता. नायगाव) येथे दूध दरवाढीच्या मागणीसाठी सरकारच्या प्रतीकात्मक पुतळ्यास शेणाने अंघोळ घालत चाबूक फोडो आंदोलन करण्यात आले. या वेळी राज्य सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

रयत क्रांती संघटनेचे नेते आमदार सदाभाऊ खोत यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण राज्यात दूध दर वाढीच्या मागणीसाठी चाबूक फोडो आंदोलन पुकारले होते. त्यानुसार मांजरम येथे आंदोलन करण्यात आले.  लॉकडाउनचा गैरफायदा घेत खासगी दूध कंपन्या व सहकारी दूध संघांनी दूधदर विक्री प्रतिलिटर १० ते १८ रुपयांनी पाडले आहेत.

सध्या गायीच्या दुधाला दर २२ रुपये व म्हशीच्या दुधाला दर ३२ रुपये मिळतो. हा दर शेतकऱ्यांना परवडणारा नाही. पशू खाद्याचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. अशा परिस्थितीत हा दर शेतकऱ्यांना संकटात टाकणारा आहे. शुद्ध पाण्याच्या बाटलीचा दर २० रुपये आहे. तर, दुधाला प्रतिलिटर २२ रुपये दर आहे. पाण्याला दूधापेक्षा जास्त महत्त्व आल्यासारखे आहे.

सरकारने उसाच्या एफआरपीनुसार दुधाला किमान आधारभूत किंमत द्यावी. गाईच्या दुधाला किमान ३० रुपये प्रतिलिटर व म्हशीच्या दुधाला किमान ६० रुपये प्रतिलिटर दर द्यावे. शेतीपूरक दूध व्यवसायाला संरक्षण द्यावे, आदी मागण्या करण्यात आल्या. 

या वेळी गणेश शिंदे, सुरेश महाराज, गणेश गायकवाड, हणमंत गायकवाड, गणेश डॉक्टर, जयराज शिंदे, गोविंद गायकवाड, राजेश दरेगाव, विनायक गायकवाड, शरद शिंदे, विश्वनाथ शिंदे आदी शेतकरी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com