Agriculture news in marathi ‘Children of farmers’ will do Technical assistance to Baliraja | Agrowon

‘शेतकऱ्यांची पोरं’ करणार  बळिराजाला तांत्रिक साह्य

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 5 ऑगस्ट 2021

पावसामुळे पिकांच्या झालेल्या नुकसानीची माहिती विमा कंपनीला कळविण्यासाठी शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यातच विमा कंपनीच्या ऑनलाइन प्रणालीमध्ये असंख्य त्रुटी आहेत.

उजनी, जि. लातूर ः पावसामुळे पिकांच्या झालेल्या नुकसानीची माहिती विमा कंपनीला कळविण्यासाठी शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यातच विमा कंपनीच्या ऑनलाइन प्रणालीमध्ये असंख्य त्रुटी आहेत. त्यामुळे शेतकरी वेळेत नुकसानीची माहिती कंपनीला कळविण्यास अपयशी ठरत आहे. त्या अनुषंगाने ‘शेतकऱ्यांची पोरं’ या संघटनेने शेतकऱ्यांना तांत्रिक साहाय्य करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

 मागील खरीप हंगामात शेतकऱ्यांना पिकांच्या झालेल्या नुकसानीची ऑनलाइन तक्रार क्रॉप इन्शुरन्स ॲपवर न केल्याचा बहाणा देत विमा कंपनीने तालुक्यातील शेतकऱ्यांना विम्यापासून वंचित ठेवले. या वर्षीही मोठ्या पावसामुळे अनेकांच्या पिकांचे नुकसान झाले. परंतु, तंत्रज्ञानाची माहिती नसलेल्या शेतकऱ्यांना कंपनीला पीक नुकसानीची माहिती कळविण्यास अडचणी येत आहेत, ही बाब अध्यक्ष अजिंक्य शिंदे निदर्शनास आली. 

या पार्श्वभूमीवर औसा तालुक्यातील शेतकऱ्यांना आपल्या पिकांच्या नुकसानीची तक्रार ऑनलाइन दाखल करता यावी, यासाठी येथील ‘शेतकऱ्यांची पोरं’ संघटनेतर्फे प्रत्येक गावात तांत्रिक सहाय्यक नेमण्यात आला आहे. यात तालुक्यातील तब्बल ८० गावांमध्ये टीम तयार करण्यात आली आहे. विमा कंपनीकडून शेतकऱ्यांची होणारी लूट थांबवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन अध्यक्ष शिंदे यांनी केले.


इतर बातम्या
जोरदार वारे, मेघगर्जना, विजांसह पावसाचा...पुणे : राज्यात पुढील दोन दिवस जोरदार वारे,...
पुण्यात साकारतेय देशी गाय संशोधन आणि...पुणे ः देशी गायींच्या संवर्धनातून त्यांची...
विमा कंपन्यांना आठ हंगामांत १२ हजार...पुणे ः देशातील खासगी विमा कंपन्यांनी गेल्या आठ...
द्राक्ष हंगामात नियोजन आणि बाजारपेठेचे...अधिक परतावा देणारी पिके म्हणजे जोखीमही मोठी असते...
मागणीमुळे हरभरा दर हमीभावाच्या वर टिकूनपुणे : गेल्या आठवडाभरात हरभऱ्याला चांगली मागणी...
गुन्हा दाखल करण्याऐवजी पुन्हा चौकशीचा...पुणे ः जलयुक्त शिवार योजनेच्या नावाखाली मृद व...
शेतकरी आंदोलन लोकसभा  निवडणुकीपर्यंत...नगर : केंद्रातील भाजप सरकारने ठरविलेल्या...
सोयाबीन कापणीचा दर  एकरी तीन...अकोला : या हंगामात लागवड केलेले कमी कालावधीचे...
महुद ग्रामस्थांची एकजूट कौतुकास्पद :...सोलापूर ः वसुंधरा आणि पृथ्वीच्या रक्षणासाठी...
सिंचनाचे क्षेत्र वाढविण्यासह  दर्जेदार...अमरावती : राजुरा बृहत लघु पाटबंधारे योजनेप्रमाणेच...
पारनेर कारखाना विक्रीतील  दोषींवर...नगर : नगर जिल्ह्यातील पारनेर सहकारी साखर...
वालचंदनगर (जि.पुणे) : लाळ्या खुरकूत...वालचंदनगर, जि. पुणे : गेल्या अनेक दिवसांपासून...
सांगली : रब्बीचे पावणे तीन लाख हेक्टरवर...सांगली : जिल्ह्यात रब्बी हंगामात युरियासह खते,...
खतांची कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्या ...चंद्रपूर : कृत्रिम टंचाई निर्माण करून शेतकऱ्यांना...
सांगलीतील पूरग्रस्तांच्या  मदतीसाठी...सांगली : जिल्ह्यात जुलै महिन्यात आलेल्या...
जायकवाडीतील उपयुक्‍त पाणीसाठा ७१.३९ टक्...औरंगाबाद : मराठवाड्यातील सर्वात मोठ्या जायकवाडी...
नांदेडमधील प्रकल्पांत ८२.५७ टक्के...नांदेड : ऑगष्ट-सप्टेंबर महिन्यात जोरदार पाऊस झाला...
नंदुरबार जिल्ह्यात चार साखर कारखाने...जळगाव : खानदेशात उसाची लागवडदेखील बऱ्यापैकी आहे....
शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यास...सोलापूर ः ‘‘कृषी योजनांचा अधिकाधिक प्रसार करून...
‘‘हतनूर’मधून ३८८ दशलक्ष घनमीटर पाणी...जळगाव ः जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी ९०...