‘Devarjan’ in Udgir filled after seven years
‘Devarjan’ in Udgir filled after seven years

उदगीरमधील ‘देवर्जन’ सात वर्षांनंतर भरला

उदगीर: देवर्जन (ता. उदगीर) येथील मध्यम प्रकल्प तब्बल सात वर्षांनंतर भरला आहे. सोमवारी (ता.२१) सायंकाळी झालेल्या पावसाने तलावाच्या सांडव्यातून विसर्ग सुरू झाला आहे.

उदगीर : देवर्जन (ता. उदगीर) येथील मध्यम प्रकल्प तब्बल सात वर्षांनंतर भरला आहे. सोमवारी (ता.२१) सायंकाळी झालेल्या पावसाने तलावाच्या सांडव्यातून विसर्ग सुरू झाला आहे. लाभक्षेत्रातील सर्व गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

उदगीर शहरासह देवर्जन, दावणगाव, शेकापूर, भाकसखेडा, गंगापूर आदी भावांना या प्रकल्पातून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो. शिवाय, परिसरातील जवळपास दोन हजार हेक्‍टर क्षेत्र या प्रकल्पावर अवलंबून आहे. गेल्या सात वर्षांपासून या प्रकल्पात पाण्याचा साठा अत्यल्प होता. यावर्षी अद्यापपर्यंत या प्रकल्पांमध्ये फक्त २५ टक्के पाणीसाठा झाला होता. हेर, रोहिना लोहारा या भागात पावसाचे प्रमाण कमी होते. 

गेल्या आठ दिवसांपासून परिसरात सुरू झालेल्या पावसामुळे पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली. सोमवारी सायंकाळी पावसाने हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरून सांडव्याद्वारे वाहू लागला आहे.

मंगळवारी (ता.२२) देवर्जनचे तलाठी राहुल आचमे, कृषी सहाय्यक हाळीघोंगडे यांनी या प्रकल्पास भेट देऊन पाहणी केली. परिस्थितीची माहिती तहसिल कार्यालयास दिली. देवर्जन परिसरात पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com