‘रोटेशनप्रमाणे धरणाच्या पाण्याचे वाटप करा’

सातारा : ‘‘या वर्षी चांगला पाऊस पडला. त्यामुळे जिल्ह्यातील धरणांमध्ये अपेक्षित पाणीसाठा उपलब्ध आहे. शेतीसाठी व पिण्यासाठी रोटेशनप्रमाणे पाण्याचे वाटप करावे’’, अशा सूचना पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या.
‘Distribute dam water by rotation’
‘Distribute dam water by rotation’

सातारा :  ‘‘या वर्षी चांगला पाऊस पडला. त्यामुळे जिल्ह्यातील धरणांमध्ये अपेक्षित पाणीसाठा उपलब्ध आहे. शेतीसाठी व पिण्यासाठी रोटेशनप्रमाणे पाण्याचे वाटप करावे’’, अशा सूचना पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या.

कालवा सल्लागार समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. खासदार श्रीनिवास पाटील, आमदार अरुण लाड, जयकुमार गोरे, दीपक चव्हाण, अनिल बाबर, जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता संजय डोईफोडे यांच्यासह कालवा सल्लागार समितीचे सदस्य उपस्थित होते.

पालकमंत्री पाटील म्हणाले, ‘‘जिल्ह्यातील धरणांमध्ये अपेक्षित पाणीसाठा आहे. याच्या वाटपाबाबत चांगल्या प्रकारे नियोजन करा. कॅनॉलच्या दुरुस्तीच्या कामामुळे पाणी वाटपाच्या रोटेशनवर परिणाम होणार नाही, यासाठी योग्य नियोजन करून दुरुस्तीची कामे हाती घ्यावी. शेतकऱ्यांकडील थकीत पैशाच्या  वसुलीसाठी प्रभावी अंमलबजावणी करावी.’’

खासदार पाटील, आमदार गोरे, चव्हाण, बाबर यांनी देखील या वेळी सूचना केल्या.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com