Agriculture news in marathi ‘Farm to Home’ activities within the limits of Amravati Municipal Corporation | Agrowon

अमरावती महापालिका हद्दीत ‘फार्म टू होम’ उपक्रम 

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 14 मे 2020

अमरावती ः कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव नियंत्रणासाठी महापालिका हद्दीत सार्वजनिक बाजार बंद करण्यात आले आहे. त्याऐवजी ‘फार्म टू होम’ या संकल्पनेअंतर्गत २७६ शेतकऱ्यांना फळ, भाजीपाला विक्रीची परवानगी देण्यात आली आहे. 

अमरावती ः कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव नियंत्रणासाठी महापालिका हद्दीत सार्वजनिक बाजार बंद करण्यात आले आहे. त्याऐवजी ‘फार्म टू होम’ या संकल्पनेअंतर्गत २७६ शेतकऱ्यांना फळ, भाजीपाला विक्रीची परवानगी देण्यात आली आहे. 

महापालिका आयुक्‍त प्रशांत रोडे यांनी कोरोना संक्रमण रोखण्यासाठी विविध उपाययोजनांवर भर दिला आहे. भाजी व फळबाजारात एकाचवेळी गर्दी होत असल्याने कोरोनाचे संक्रमण वाढण्याची भीती होती. त्यामुळे भाजी व फळबाजार बंद करण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला. त्यामुळे सामान्यांची अडचण झाली. उपलब्ध कोणत्याही ठिकाणाहून भाजीपाला खरेदीची वेळ त्यांच्यावर आली. ही बाब लक्षात घेत महापालिका आयुक्‍त प्रशांत रोडे यांनी ‘फार्म टू होम’ संकल्पनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना फळ, भाजी विक्रीची संधी उपलब्ध करुन दिली. 

फळे, भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना याव्दारे त्यांचा माल थेट ग्राहकांना विकता येणार आहे. त्याकरिता महापालिकेकडून शेतकऱ्यांना अधिकृत परवानाही दिला जाणार आहे. बाजार व परवाना विभागाकडे त्यासाठी अर्ज करावा लागेल. या माध्यामातून शेतकऱ्यांना महापालिका हद्दीत फळे, भाजीपाल्याची विक्री करता येईल. 

२७६ शेतकऱ्यांना परवाने 
महापालिका प्रशासनाने शेतकरी ते ग्राहक संकल्पनेअंतर्गत २७६ शेतकऱ्यांना विक्री परवाने दिले आहेत. थेट विक्री करणाऱ्या या परवानाधारक शेतकऱ्यांना सातबारा व ओळखपत्र सोबत ठेवणे अनिवार्य राहिल. 


इतर बाजारभाव बातम्या
अकलूज येथील जनावरांचा बाजार बंदअकलूज, जि. सोलापूर : ‘‘अकलूज कृषी उत्पन्न...
कोल्हापुरात गुळाच्या नियमित आवकेस...कोल्हापूर : येथील बाजार समितीत गेल्या पंधरा...
जळगावात हिरवी मिरची १८०० ते २६०० रुपयेजळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी (...
नगरमध्ये डाळिंबाच्या दरात सुधारणानगर ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न...
कोल्हापुरात टोमॅटोला दहा किलोस १५० रुपयेकोल्हापूर : येथील बाजार समितीत या सप्ताहात...
कळमना बाजारात मोसंबी दरात सुधारणानागपूर : मागणीअभावी संत्रा दरात घसरण झाली आहे....
औरंगाबादमध्ये गाजर सरासरी १८०० रूपयेऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
परभणीत वाटाणा ३००० ते ४५०० रुपये परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
राज्यात पेरू ३०० ते ३५०० रुपयेजळगावात २५०० ते ३५०० रुपये दर जळगाव : ः...
नाशिकमध्ये वांग्यांना सरासरी ३००० रुपये...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
जळगावात भरताची वांगी १८०० ते २६०० रुपये जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी (...
संत्राचे व्यवहार ११०० ते १४०० रुपये...नागपूर :  मागणीअभावी संत्रा दरातील तेजीची...
नाशिकमध्ये हिरव्या मिरचीच्या दरात...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सोलापुरात हिरवी मिरची, गवार, घेवड्याला...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
पुण्यात भाजीपाल्याची आवक, दर स्थिर पुणे  : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
औरंगाबाद : हिरवी मिरची सरासरी ३०००...औरंगाबाद  : येथील कृषी उत्पन्न बाजार...
परभणीत ढोबळी मिरचीची पंधरा क्विंटल आवकपरभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
राज्यात हिरवी मिरची २००० ते ५००० रुपये...पुण्यात २००० ते ३००० रुपये पुणे : पुणे बाजार...
पपई दर निम्म्यावर; शेतकऱ्यांना फटका जळगाव : खानदेशात गेल्या २० ते २५ दिवसात...
मक्‍याच्या बाजारभावात दौंडमध्ये २००...दौंड, जि. पुणे : दौंड तालुक्‍यात मक्‍याची आवक...