agriculture news in marathi ‘FRP’ 392 crore stagnant | Agrowon

नाशिक विभागात ‘एफआरपी’चे तब्बल ३९२ कोटी रखडले

टीम अॅग्रोवन
बुधवार, 17 मार्च 2021

नगर व नाशिक जिल्‍ह्यात आतापर्यंत एफआरपीचे ३९२ कोटी रुपये रखडले आहेत, अशी माहिती येथील प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयातून देण्यात आली. 

नगर ः ऊसतोडीनंतर संबंधित शेतकऱ्यांना उसाचा किमान किफायतशीर दर (एफआरपी) रक्कम चौदा दिवसांच्या आत देणे बंधनकारक आहे. मात्र, त्याचे पालन होत नाही. नगर व नाशिक जिल्‍ह्यात आतापर्यंत एफआरपीचे ३९२ कोटी रुपये रखडले आहेत, अशी माहिती येथील प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयातून देण्यात आली. 

कार्यालयाच्या अहवालानुसार, नगर जिल्ह्यात केवळ पाच साखर कारखान्यांनीच पूर्ण एफआरपी दिली. दोन साखर कारखान्यांकडून किती पैसे येणे आहे, याची माहिती उपलब्ध नाही. नगर जिल्ह्यात २२ व नाशिक जिल्ह्यात ४ अशा २६ साखर कारखान्यांतर्फे आतापर्यंत १ कोटी ३५ लाख टन उसाचे गाळप झाले. १ कोटी ३० लाख २२ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन 
झाले. 

१५ फेब्रुवारीपर्यंत झालेल्या १ कोटी ७ लाख ४६ हजार मेट्रिक टन उसाचे त्या-त्या कारखान्यांनी ठरवलेल्या एफआरपी रकमेनुसार २ हजार ४१२ कोटी ८३ लाख रुपये देणे आहे. त्यातील २ हजार २४ कोटी ८२ लाख रुपये शेतकऱ्यांना दिले आहेत. कोपरगाव, ज्ञानेश्वर, मुळा, संगमनेर व प्रसाद शुगरने पूर्ण रक्कम दिली आहे. संजीवनी व नाशिकमधील द्वारकाधिशच्या  एफआरपीबाबत अहवालात माहिती उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. 

निव्वळ देय जाहीर एफआरपी (प्रतिटन) 

अगस्ती ः २४५५, अशोक ः २१८८, ज्ञानेश्वर ः २०७४, कुकडी ः २४९५, प्रसाद शुगर ः २०९५, डॉ. विठ्ठलराव विखे पाटील (प्रवरा) ः २२१९, गणेश ः २२२९, नागवडे (श्रीगोंदा) ः २६६१, कोपरगाव ः २३५५, मुळा ः २०७५, संगमनेर ः २२४५, संजीवनी ः २०४५, वृद्धेश्वर ः १९९९, केदारेश्वर ः २०५७, अंबालिका ः २५१३, साईकृपा (१) ः २३०५, पियुष शुगर ः २१९८, जयश्रीराम ः २२००,  गंगामाई ः २०३७, क्रांती शुगर ः २२७७, युटेक शुगर ः १८९८, कादवा ः २६९७, वसंतदादा ः २४४५, द्वारकाधीश ः २४९१, एस.जे. शुगर ः२५३६


इतर ताज्या घडामोडी
ट्रायकोडर्मा वापरण्याच्या पद्धतीट्रायकोडर्मा ही उपयुक्त बुरशी असून, ती रोपांच्या...
जनावरांचे पावसाळ्यातील व्यवस्थापनपावसाळ्यात होणाऱ्या वातावरणातील अचानक बदलामुळे...
खानदेशात अत्यल्प पेरणीजळगाव ः खानदेशात या महिन्यात अपवाद वगळता हवा तसा...
नांदेडमध्ये सोयाबीनचे क्षेत्र वाढण्याची...नांदेड : जिल्ह्यात यंदा चार लाख हेक्टरवर...
परभणीत १२.६४ टक्के पेरणीपरभणी ः जिल्ह्यात यंदाच्या (२०२१) खरीप हंगामात...
देशात वीज पडून दरवर्षी दोन हजार...पुणे : हरिताच्छादन कमी झाल्याने होणारी तापमान वाढ...
कांदा उत्पादक शेतकऱ्याचा प्रामणिकपणानाशिक : जगात प्रामाणिकपणा लोप पावत चालला असल्याची...
अन्नद्रव्यांवरून खतांचे व्यवस्थापन...गेवराई, जि. बीड : जमिनीतील उपलब्ध...
आंबेओहळ प्रकल्पात  ३० टक्के पाणीसाठाकोल्हापूर : आजरा तालुक्यात असलेल्या आंबेओहळ...
वनौषधी पानपिंपरीचे दर वाढल्याने...अकोला ः जिल्ह्यात सातपुड्याच्या पायथ्याशी अकोट,...
नुकसान टाळण्यासाठी  मिश्र पिकांवर भरराळेगाव, जि. यवतमाळ : गेल्या वर्षी कपाशीवर आलेली...
यवतमाळमध्ये अनधिकृत खतांचा साठा जप्तयवतमाळ : परवान्यात नसतानाही खतांचा अनधिकृतपणे...
सांगली जिल्ह्यात खरिपाची २५ टक्के...सांगली : जिल्ह्यात खरीप हंगामाचे सरासरी क्षेत्र २...
सूक्ष्म खाद्य उन्नयन योजनेसाठी अर्ज...वाशीम : जिल्ह्यात २०२०-२१ ते २०२४-२५ या...
पुण्याचा पर्यटन विकास आराखडा तयार करा पुणे : जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी सविस्तर...
प्रताप सरनाईकांचे ठाकरेंना पत्र; ...मुंबई : शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी...
काळानुरूप बदल स्वीकारा : नितीन गडकरीवर्धा : बाजार समित्यांनी केवळ शेतमाल खरेदी विक्री...
संत्रा आयात शुल्कप्रकरणी बांगलादेशशी...अमरावती : नागपुरी संत्र्याचा सर्वात मोठा आयातदार...
मॅग्नेट ः फलोत्पादन पिकांसाठी एकात्मिक...राज्यातील कृषी हवामान विभागनिहाय फळे, भाजीपाला व...
शेतीवरील आर्थिक ताण कमी करण्यासाठी...हरितक्रांतीनंतर काही दशकांमध्ये विपरीत परिणाम...