‘जवाद’ चक्रीवादळाची  तीव्रता कमी होणार

बंगालच्या उपसागरातील ‘जवाद’ चक्रीवादळ उत्तरेकडे सरकू लागले आहे. या चक्रीवादळाची तीव्रता कमी होणार असून, आज (ता. ५) दुपारपर्यंत ही प्रणाली ओडिशाच्या पुरीजवळ पोचण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
‘Jawad’ of cyclone The intensity will decrease
‘Jawad’ of cyclone The intensity will decrease

पुणे : बंगालच्या उपसागरातील ‘जवाद’ चक्रीवादळ उत्तरेकडे सरकू लागले आहे. या चक्रीवादळाची तीव्रता कमी होणार असून, आज (ता. ५) दुपारपर्यंत ही प्रणाली ओडिशाच्या पुरीजवळ पोचण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. या चक्रीवादळाचा राज्यावर परिणाम होण्याची शक्यता कमी आहे. अंदमान समुद्रातील कमी दाब क्षेत्राचे शुक्रवारी (ता. ३) ‘जवाद’ चक्रीवादळात रुपांतर झाले. शनिवारी (ता. ४) प्रणालीचे केंद्र आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणमपासून २१०किलोमीटर, ओडिशाच्या गोपाळपासून ३२० किलोमीटर, पुरीपासून ३९० किलोमीटर, तसेच पारदीपपासून ४७० किलोमीटर अग्नेयेकडे समुद्रात होते. प्रणाली आता उत्तरेकडे सरकत आहे. वादळाची तीव्रता कमी होणार आहे. आंध्र प्रदेशात पावसाची शक्यता आहे.              नाशिक, सातारा, कोकणात नुकसान नाशिक, सातारा आणि कोकणात काही ठिकाणी तिसऱ्या दिवशीही पावसाची संततधार सुरूच होती. नाशिकमध्ये द्राक्षे, साताऱ्यात स्ट्रॉबेरी आणि कोकणात आंब्याचे नुकसान होत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com