Agriculture news in marathi From ‘Kisanputra Andolan’ Protest on the occasion of Black Day | Page 2 ||| Agrowon

‘किसानपुत्र आंदोलन’कडून काळ्या दिनानिमित्त निषेध

टीम अॅग्रोवन
शनिवार, 19 जून 2021

किसानपुत्र आंदोलनाच्या वतीने शुक्रवारी (ता.१८) राज्याच्या विविध भागात शेतकरी पारतंत्र्य दिनानिमित्त काळा दिवस पाळण्यात आला. सरकारचा िनषेध करून काळे कायदे रद्द करण्याचे मागणी करण्यात आली.

औरंगाबाद : किसानपुत्र आंदोलनाच्या वतीने शुक्रवारी (ता.१८) राज्याच्या विविध भागात शेतकरी पारतंत्र्य दिनानिमित्त काळा दिवस पाळण्यात आला. सरकारचा िनषेध करून काळे कायदे रद्द करण्याचे मागणी करण्यात आली. या आंदोलनात संघटनेचे प्रमुख अमर हबीब सहभागी झाले होते. पुण्यासह मराठवाड्याच्या अनेक भागात शेतकऱ्यांनी काळ्या फिती लावून सरकारचा निषेध केला. पुण्यात खासदार गिरीश बापट यांना निवदेन देण्यात आले. 

शेतकरी विरोधी कायदे आणि त्यांना असलेले घटनेच्या ‘३१ ब’ कलमाचे आणि अनुच्छेद ‘९’ चे संरक्षण याची माहिती आंदोलकांनी लोकांना दिली. ही घटना दुरुस्ती १८ जून १९५१ रोजी, मूळ घटना राष्ट्राला अर्पित झाल्यानंतर आणि निर्वाचित संसद स्थापित व्हायच्या आधी कशी केली गेली. सध्या अनुच्छेद ‘९’ मध्ये २८४ कायदे असून, त्यातील २५० शेतीशी निगडित असल्याची माहितीही लोकांना देण्यात आली.  

१८ जून १९५१च्या पहिल्या घटनादुरुस्तीने शेतकऱ्यांना पारतंत्र्यात ढकलत त्यांचे मूलभूत हक्क डावलण्यात आला. कमाल जमीन धारणा कायदा, जमीन अधिग्रहण कायदा, आवश्यक वस्तू कायदा हे काळे कायदे रद्द करण्याचे आवाहन किसानपुत्रांनी केले. शेतकरी स्वातंत्र्याच्या लढ्यात योगदान देण्याचे आवाहनही या वेळी करण्यात आले.

खासदार बापट यांना निवेदन
पुण्यातील किसानपुत्रांनी खासदार गिरीश बापट यांनी भेट घेऊन त्यांना शेतकरी विरोधी कायदे व परिशिष्ट ९ रद्द करण्याची मागणी करणारे निवेदन दिले. किसानपुत्र आंदोलनाचे समन्वयक मयूर बागुल आणि नितीन राठोड, किसानपुत्र आंदोलन माहिती तंत्रज्ञान संयोजक असलम सय्यद यांनी गुरुवारी (ता.१७) पुण्याचे खासदार गिरीश बापट यांची भेट घेतली.


इतर ताज्या घडामोडी
खानदेशात कापसाची आठ लाख हेक्टरवर लागवडजळगाव ः  खानदेशात कापूस प्रमुख पीक आहे. यंदा...
भीमा-नीरा नदी काठांवरील गावांनी सतर्क...सोलापूर : ‘‘भीमा-नीरा खोऱ्यात होत असलेल्या...
मराठवाड्यात पाऊस कायम; जोर कमीऔरंगाबाद : मराठवाड्यात शनिवारी (ता. २३)...
नाशिक जिल्ह्यात खासगी पशुसेवकांचे काम...येवला : खासगी पशुसेवक ग्रामीण भागात मोठ्या...
मुगावर ‘लिफ क्रिंकल’ प्रादुर्भावअकोला : गेल्या हंगामात लिफ क्रिंकल विषाणूजन्य...
परभणी जिल्ह्यात मोठ्या, मध्यम...परभणी ः पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाला....
लिंबूवर्गीय पिकातील आंबिया बहर फळगळ...सद्यःस्थितीत आंबिया बहराची फळे ही विकसनशील...
नीरा देवघर धरणक्षेत्रात सर्वाधिक २५५...पुणे : कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पश्चिम पट्यात...
‘एफआरपी’ वाटपात राज्याची आघाडी : शेखर...पुणे ः साखर उद्योगाचा गाळप हंगाम यंदा आव्हानात्मक...
विमा लाभापासून शेतकऱ्यांना वंचित...नगर : नैसर्गिक आपत्ती, अन्य कारणाने नुकसान होऊनही...
साताऱ्यात पावसाचा जोर कमी झालासातारा : जिल्ह्यातील प्रमुख धरणांच्या पाणलोट...
केळी उत्पादकांना वादळ नुकसानभरपाईची...अकोला : जिल्ह्यात अकोट तालुक्यात १५ मे २०२० रोजी...
अतिवृष्टिग्रस्तांना अन्नधान्य,...नाशिक : आपत्तीग्रस्त आणि पूरग्रस्तांना मदत म्हणून...
हलक्‍या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा...महाराष्ट्रावरील हवेच्या दाबात वाढ होत असून, उत्तर...
मराठवाड्यात पावसाचा जोर ओसरलाऔरंगाबाद : मराठवाड्यात गुरूवारच्या (ता.२२) तुलनेत...
औरंगाबाद जिल्ह्यात हमीभावातील ज्वारी,...औरंगाबाद : जिल्ह्यात आधारभूत दराने खरेदी केंद्र...
नांदेड जिल्ह्यात खरीप पिके पाण्याखालीनांदेड : जिल्ह्यात बुधवारनंतर गुरुवारी झालेल्या...
खानदेशात कांद्याच्या रोपवाटिका...जळगाव : खानदेशात कांदा रोपवाटिकांमध्ये रोपे...
अतिवृष्टीचा हिंगोलीतील ७१ गावांत दणकाहिंगोली ः जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात जुलै...
चिपळूणमधील दीड हजार जणांना पुरातून...रत्नागिरी : अतिवृष्टीचा तडाखा चिपळूण, खेड,...