agriculture news in marathi ‘KVK’ is a beekeeping entrepreneur Create: Vice Chancellor Dr. Dhavan | Agrowon

‘केव्हिकें’नी मधमाशीपालनातील उद्योजक निर्माण करावे ः कुलगुरू डॉ. ढवण

टीम अॅग्रोवन
रविवार, 24 मे 2020

परभणी : ‘‘मराठवाड्यातील सर्व कृषी विज्ञान केंद्रांनी मधमाशी पालनाच्या प्रशिक्षणाद्वारे मधमाशीपालन या शेतीपुरक व्यवसायामधील उद्योजक निर्माण करावे’’, असे आवाहन कुलगुरु डॉ. अशोक ढवण यांनी केले. 

परभणी : ‘‘मराठवाड्यातील सर्व कृषी विज्ञान केंद्रांनी मधमाशी पालनाच्या प्रशिक्षणाद्वारे मधमाशीपालन या शेतीपुरक व्यवसायामधील उद्योजक निर्माण करावे’’, असे आवाहन कुलगुरु डॉ. अशोक ढवण यांनी केले. 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषी किटकशास्त्र विभाग आणि मराठवाड्यातील सर्व कृषी विज्ञान केंद्रांतील पीक संरक्षण विषय विशेषज्ञ यांच्यातर्फे जागतिक मधमाशी दिनानिमत्त बुधवारी (ता.२०) आयोजित ऑनलाइन चर्चासत्रात डॉ. ढवण बोलत होते. 

शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले, विस्तार शिक्षण संचालक डॉ. देवराव देवसकर यांचा प्रमुख सहभाग होता. कृषी किटकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. संजीव बंटेवाड, वनस्पती रोगशास्त्र विभाग प्रमुख डॉ.कल्याण आपेट, वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ.जगदीश जहागीरदार, प्रगतिशील मधमाशी संगोपक दिनकर पाटील आदी सहभागी झाले होते. 

डॉ. ढवण म्‍हणाले,‘‘मधमाशांचे पिकातील परागीभवनाच्या दृष्टीने मोठे महत्व आहे. मधमाशी पालन या शेतीपुरक व्यवसायातून उद्योजक निर्माण होण्याची गरज आहे.’’ 
मधुमक्षिका पालन एक कृषिपुरक उद्योग या पुस्तिकेचे विमोचन करण्‍यात आले. तांत्रिक सत्रात डॉ. पुरुषोत्तम नेहरकर यांनी प्रात्यक्षिकाद्वारे मधमाशाच्या विविध प्रजाती बददल माहिती दिली. दिनकर पाटील यांनी चाकूर येथून चर्चासत्रात सहभाग नोंदवून मधमाशी संगोपन, मध काढणी, विविध प्रजातीचा मध आदींबाबत प्रात्यक्षिकाद्वारे माहिती दिली. 

प्रास्ताविक डॉ. बंटेवाड यांनी केले. सूत्रसंचालन खरपुडी येथील कृषी विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ डॉ. अजय मिटकरी यांनी केले. मांजरा ‘केव्हीके’चे विषय विशेषज्ञ डॉ. संदीप देशमुख यांनी आभार मानले. कृषी कीटकशास्त्र विभागातील डॉ. पुरुषोत्तम झंवर, डॉ. धीरज कदम, डॉ. सदाशिव गोसलवाड, डॉ. मिलिंद सोनकांबळे, डॉ. बस्वराज भेदे, डॉ. अनंत बडगुजर, डॉ. फारिया खान, डॉ. श्रध्दा धुरगुडे आदीसह विभागातील विद्यार्थी, कर्मचारी सहभागी झाले होते. 
 


इतर ताज्या घडामोडी
शैक्षणिक वर्ष जूनपासूनच : मुख्यमंत्री...मुंबई : ‘‘शिक्षण हे जीवनावश्यक आहे ते...
राज्यात नवे २४८७ रुग्ण; सध्या ३४,४८०...मुंबई : राज्यात आज दिवसभरात २४८७ नवीन रुग्णांचे...
परवानगी नसलेल्या एचटीबीटी बियाण्यांचा...अमरावती ः घरपोच बियाणे वाटपाच्या माध्यमातून...
लोकांना पूर धोक्‍याची जाणीव करुन द्या ः...भंडारा ः वैनगंगा नदी तसेच इतर नदीकाठावरील खोलगट...
गोंधळी शिवारात ६२ हजारांचा एचटीबीटी...यवतमाळ ः कृषी विभागाच्या पथकाने अमरावती, यवतमाळ...
प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील यंत्रमाग...मालेगाव, जि. नाशिक : ‘‘लॉकडाऊनमुळे यंत्रमागाची...
टोळधाड प्रादुर्भावग्रस्त क्षेत्राला...भंडारा ः भंडारा जिल्ह्यातील टोळधाड...
शेतकऱ्यांनी डिजिटल व्यासपीठाचा वापर...पुणे ः कोरोनामुळे शेतीक्षेत्राचे चित्र बदलणार आहे...
नांदेड जिल्ह्यात पाच हजारावर...नांदेड : किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गंत...
विदर्भ राज्य आंदोलन समितीचे ७ जूनला...अकोला ः कोरोनामुळे उद्योगधंदे, व्यापार, शेती,...
‘कुकडी’चे उन्हाळी आवर्तन सहा जूनला...नगर : ‘कुकडी’च्या उन्हाळी आवर्तनासाठी पुणे येथे...
नगर अर्बन बॅंकेला चाळीस लाखांचा दंडनगर : नगर अर्बन को-ऑपरेटिव्ह बॅंकेला रिझर्व्ह...
नांदेडमधील कापूस संशोधन केंद्रात...नांदेड : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
‘सोयाबीन लागवड तंत्रज्ञान व प्रक्रिये’...परभणी : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील...
दोन वाहनांतील कापूस घेण्याचे आदेश द्या...परभणी : भारतीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) मानवत...
दुग्ध व्यवसायाने घराला आधारशेतीपूरक व्यवसायामध्ये दुग्ध व्यवसाय पूर्वीपासूनच...
पंतप्रधान मोदी यांच्याकडून संशोधक...नाशिक : जिल्ह्यातील वऱ्हाणे (ता.बागलाण) येथील...
ग्रामविकास विभागामार्फत मोफत आर्सेनिक...कोल्हापूर  : नागरिकांची रोगप्रतिकारक शक्ती...
कापसाच्या वाती करून शासनाची आरती...अमरावती  ः पूर्व विदर्भातील पांढऱ्या...
एचटीबीटीबाबत केंद्र सरकारकडे पाठपुरावा...नागपूर  ः एचटीबीटीचा विषय केंद्र सरकारच्या...