Agriculture news in marathi ‘Leaf Crinkle’ appears on Muga | Page 2 ||| Agrowon

मुगावर ‘लिफ क्रिंकल’ प्रादुर्भाव

टीम अॅग्रोवन
रविवार, 25 जुलै 2021

गेल्या हंगामात लिफ क्रिंकल विषाणूजन्य रोगामुळे मुग, उडदाचे संपूर्ण पीक शेतकऱ्यांच्या हातातून गेले होते. यंदाही काही ठिकाणी मुगाच्या पिकावर हा विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव जिल्ह्यात आढळून आला आहे.

अकोला : गेल्या हंगामात लिफ क्रिंकल विषाणूजन्य रोगामुळे मुग, उडदाचे संपूर्ण पीक शेतकऱ्यांच्या हातातून गेले होते. यंदाही काही ठिकाणी मुगाच्या पिकावर हा विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव जिल्ह्यात आढळून आला आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील कीटकशास्त्र विभाग, कृषी विभागाच्या चमूने केलेल्या संयुक्त पाहणीत अकोला, अकोट, तेल्हारा तालुक्यात हा प्रादुर्भाव आढळलेला आहे.

संयुक्त चमूने अकोला जिल्ह्यातील अकोला, अकोट व तेल्हारा तालुक्यातील मुग पिकाची प्रत्यक्ष पाहणी केली असता केळीवेळी, गणोरी, आपोती, आपातापा, घुसर, दहिहंडा, पाटेगाव, हिंगणी, मानब्दा, दापोरा पनाळा, मंचनपूर, येवदा आदी भागांमध्ये मुगाचे पीक ३० ते ३५ दिवसांचे झाले आहे. शेतकऱ्यांसोबत केलेल्या चर्चेदरम्यान साधारणपणे ८० ते ८५ टक्के मुगाचा पेरा हा विशिष्ट वाणाचा  आहे. या पिकावर लिफ क्रिंकल विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव आढळून आलेला आहे.

विशेष म्हणजे याच भागांमध्ये मागील वर्षी सुद्धा मुगाच्या पिकावर याच विषाणू रोगाचा प्रादुर्भाव आढळून आला होता. त्यामुळे रोगग्रस्त झाडाच्या पानावर खोलगट व उभारलेल्या भेगा दिसतात. पानाची टोके खाली वाकतात. झाडे खुरटी व खुजी राहतात. पानाच्या शिरा काही वेळा पिवळ्या पडतात. रोगग्रस्त झाडाला फुलोरा उशिरा येतो व शेंगा लागत नाहीत.

रोगाचा प्रसार मुख्यतः हा रोगग्रस्त बियाण्यांद्वारे होतो. एखाद्या भागात बियाण्याद्वारे या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास त्या भागात या रोगाचा दुय्यम प्रसार हा रस शोषण करणाऱ्या किडीमुळे होतो. म्हणून या किडींचे नियंत्रण करणे हे या विषाणूजन्य रोगाचा दुय्यम प्रसार रोखण्याचे दृष्टिकोनातून अत्यंत गरजेचे ठरते. कृषी विभागाच्या चमूने प्रत्यक्ष शेतात पाहणी दरम्यान मुगावर रसशोषण करणाऱ्या किडी आढळून आल्या नाहीत. मात्र विषाणू रोगाच्या प्रादुर्भावास सुरुवात झालेली आहे.

अशा करा उपाययोजना
या रोगाचा दुय्यम प्रसार थांबविण्याकरिता त्वरित खालील उपाययोजना करणे आवश्यक आहे. शेत ताणविरहित ठेवावे. ईश्वरी, कोटी चवळी, या तणांवर हा विषाणू राहतो व तेथूनच किडीद्वारे पिकावर येतो. या तणांचा नाश करावा. पिकाला जास्त नत्र खत देणे टाळावे, त्यामुळे पिकाची कायिक वाढ होते व किडींचा प्रादुर्भाव वाढतो. पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतात पेरणीनंतर १५ दिवसांनी पिवळे चिकट सापळे ( १५ बाय ३० सेंमी आकाराचे) हेक्टरी १६ सापळे पिकांच्या उंचीच्या एक फूट उंचीवर लावावे. मावा, पांढरी माशी व फुलकिडीचा प्रादुर्भाव दिसताच शिफारस केलेल्या कीटकनाशकांची फवारणी करावी.


इतर ताज्या घडामोडी
देवसंस्थांच्या जमिनीवर वहिवाटदारांचा...जेजुरी, जि. पुणे : देवसंस्थानच्या मालकीच्या...
पुरस्कारांच्या प्रस्तावावरून कृषी...अकोला : विविध पुरस्कारांसाठी शेतकऱ्यांनी दाखल...
कोयना धरणात १०१ टीएमसीवर पाणीसाठाकोयनानगर, जि. सातारा : शंभर दिवस ओलांडलेल्या...
उजनी धरणात उपयुक्त साठा ६४ टक्केच;...सोलापूर : उजनी धऱणाच्या पाणलोट क्षेत्रात अद्यापही...
अकोला जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा...अकोला ः जिल्ह्यात अतिपावसाने धुमाकूळ घातला असून...
राज्यात तीन अन्न प्रक्रिया प्रकल्पांचे...नाशिक : राज्यातील तीन अन्न प्रक्रिया प्रकल्पांचे...
वाशीम झेडपी निवडणुकीचा चेंडू पुन्हा...वाशीम : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रिक्त...
‘एफआरपी’च्या तुकड्यांनी शेतकरी...कऱ्हाड, जि. सातारा : एकरकमी ‘एफआरपी’चे तीन तुकडे...
हिंगोलीत मुहूर्ताच्या सोयाबीनला ११ हजार...हिंगोली : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत...
पीक नुकसान नोंदीसाठी विमा कंपन्यांच्या...परभणी : ७२ तासांच्या आत पीक नुकसानीची नोंद...
राज्यसभेच्या एका जागेसाठी ४ ऑक्टोबरला...नवी दिल्ली : महाराष्ट्रातून राज्यसभेवर रिक्त...
गणेशोत्सवासाठी सिंधुदुर्ग सज्ज; तीन...सिंधुदुर्गनगरी : घरोघरी गणेशोत्सव साजरा करण्याची...
ई-पीक पाहणीसाठी सोलापुरचे जिल्हाधिकारी...सोलापूर ः माढा तालुक्यात सुरू असलेल्या ई-पीक...
परभणी जिल्ह्यात १२७ गावे बाधितपरभणी ः जिल्ह्यात सोमवार (ता. ६) ते मंगळवार (ता....
हतनूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरूभुसावळ, जि. जळगाव : तालुक्यातील हतनूर धरणात...
संगणकीय सातबारावर कुळांची नावे नोंद करागडहिंग्लज, जि. कोल्हापूर : हस्तलिखित सातबारा...
पावसाचा २७ हजार हेक्टरला फटकानाशिक : नांदगाव तालुक्यातील झालेल्या...
सहा हजार क्विंटल धान्याचे होणार कंपोस्ट...भंडारा : वैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे गेल्या...
शेतकरी पुरस्कारासाठी दाखल केलेले...अकोला : शेतीत विविध प्रयोग करणाऱ्या, उत्पादन...
एकरकमी ‘एफआरपी’साठी ‘मिस कॉल’ मोहीमकोल्हापूर : केंद्र सरकारने ‘एफआरपी’चे तुकडे...