agriculture news in marathi ‘Limboti’ water 23 villages will get it | Page 3 ||| Agrowon

‘लिंबोटी’चे पाणी २३ गावांना मिळणार

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 11 मे 2021

नांदेड : कंधार तसेच लोहा तालुक्यातील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी लिंबोटी धरणातून दोन दलघमी पाणी लाभ क्षेत्रात सोडण्याचे आदेश पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांना दिले.

नांदेड : कंधार तसेच लोहा तालुक्यातील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी लिंबोटी धरणातून दोन दलघमी पाणी लाभ क्षेत्रात सोडण्याचे आदेश पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांना दिले. यामुळे मतदारसंघातील २३ गावांना याचा लाभ होणार आहे. 

मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी व पाटबंधारे दक्षिण विभागाचे कार्यकारी अभियंत्यांकडे लिंबोटी धरणातील आरक्षित पाण्यातील पाणी सोडण्याची मागणी आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी केली होती.  लिंबोटी बंधाऱ्यातून यापूर्वी रब्बीत तीन पाणी पाळ्या सोडण्यात आल्या होत्या. सध्या उन्हाळ्यात दोन पाणी पाळ्या सोडल्या आहेत. कंधार, लोहा तालुक्यातील २३ गावांना या पाण्याचा लाभ होणार आहे. 

कंधार तालुक्यातील नवघरवाडी, घोडज, जांभूळवाडी, आनंदवाडी, उंमरज, बोरी, बाळांतवाडी आदी नऊ, लोहा तालुक्यातील १४ गावांना लाभ होईल. लिंबोटी धरणातून हे पाणी कालवे व नाल्यांद्वारे शनिवारपासून (ता. १५) सोडण्यात येणार आहे.


इतर बातम्या
सोयाबीनने गाठला दहा हजारांचा ऐतिहासिक...अकोला/लातूर ः गेले काही महिने सोयाबीनला चांगला दर...
विदर्भात कृषी अधिकाऱ्यांनीच घेतले विमा...नागपूर ः जिल्हास्तरावर आमचे कार्यालय आहे, हे...
विमा कंपनीचा कारभार चालतोय कृषी...सातारा : जिल्ह्यात खरिपाच्या सुरूवातीस पावसाने...
मराठवाड्यात पीकविम्याबाबत शेतकऱ्यांसमोर...औरंगाबाद : पीकविमा उतरविण्याची सोय त्यासाठी जागर...
चिपळूणमधील पूरग्रस्तांसाठी पुनर्वसन...रत्नागिरी : ढगफुटीसदृश पावसामुळे चिपळूणकरांचे...
पाणी ओसरताच तातडीने पंचनामेकोल्हापूर : पूरग्रस्तांना आवश्यक ती मदत राज्य...
खानदेशात पीकविमा कंपनीचे कार्यालयच नाही जळगाव : खानदेशात पंतप्रधान पीकविमा योजनेंतर्गत...
लातूरला सोयाबीन ९१४१ रुपये !लातूर ः येथील लातूर उच्चत्तम कृषी उत्पन्न  ...
शाश्‍वत कापूस उत्पादन तंत्रज्ञान अवगत...अकोला ः कापूस हे विदर्भातील प्रमुख पीक आहे. या...
अकोल्यात ५५ हजार हेक्टरला तडाखाअकोला ः गेल्या आठवड्यात जिल्ह्यात ५२ पैकी ३५...
रत्नागिरीत हजार हेक्टर भातक्षेत्र...रत्नागिरी : अतिवृष्टीमुळे मोठ्या नद्यांना आलेल्या...
सांगलीत ३३ हजार हेक्टर पिकांचे नुकसानसांगली : जिल्ह्यात गेल्या चार-पाच दिवसांपासून...
खानदेशात पंधरा हजार हेक्टर बाजरीची...जळगाव : खानदेशात यंदा पाऊस लांबल्याने आणि...
नाशिक बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांचे...नाशिक : नाशिक बाजार समितीसंदर्भात शासनाकडे...
खानदेशात हलक्या सरी; जोरदार पावसाचा अभावजळगाव : खानदेशात यंदा पाऊसमान अद्याप कमी आहे....
नांदेड जिल्ह्यात पीकविमा योजनेत नऊ लाख...नांदेड : पंतप्रधान पीक विमा योजनेत शेतकऱ्यांनी...
मराठवाड्यातील पशुविज्ञान केंद्राचे घोडे...परभणी ः भारतीय कृषी संशोधन परिषदेने महाराष्ट्र...
परभणी जिल्ह्यात भाजीपाला पिकांची नासाडीपरभणी ः अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेकडो एकरवरील...
पैसे थकवणाऱ्या व्यापाऱ्यांचे लिलाव बंद...सोलापूर ः शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या पट्ट्या...
पुण्यात लाख हेक्टरवर खरिपाच्या पेरण्या पुणे : जिल्ह्यात जुलै महिन्याच्या तिसऱ्या...