Agriculture news in marathi ‘Lockdown’ restrictions relaxed; Banana prices rise in Akola | Agrowon

‘लॉकडाउन’चे निर्बंध शिथिल;  अकोल्यात केळीचे भाव वधारले 

टीम अॅग्रोवन
बुधवार, 21 जुलै 2021

कोरोनाची दुसरी लाट ओसरल्याचा चांगला परिणाम केळीवर दिसत आहे. सध्या केळीने हजार रुपयांचा पल्ला गाठल्याने उत्पादक समाधान व्यक्त करीत आहेत. 
 

बोर्डी, जि. अकोला : कोरोनाची दुसरी लाट ओसरल्याचा चांगला परिणाम केळीवर दिसत आहे. सध्या केळीने हजार रुपयांचा पल्ला गाठल्याने उत्पादक समाधान व्यक्त करीत आहेत. 

कोरोनामुळे गेल्या वर्षभरापासून सर्वच शेतकरी-शेतमजूर, उद्योजक, व्यावसायिकांना झळ बसली. संत्रा, लिंबू, टरबूज, भाजीपाला, केळी उत्पादक त्रस्त झाले होते. कोरोना काळात केळीचा दर या भागात पाचशेच्या आत आला होता.

चांगल्या दर्जाचा माल असूनही अपेक्षित दर मिळत नव्हते. केळी नाशवंत असल्यामुळे ते काढणीवर आल्यानंतर वेळेतच सर्व प्रक्रिया पूर्ण कराव्या लागतात. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर जो भाव मिळेल, त्या भावात विकण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता.

या काळात व्यापाऱ्यांनी कमी दराने खरेदी केली. वातावरणाचा फटका, चक्रीवादळ, गारपीट, उन्हाचा तडका, जास्त थंडी, अवकाळी पाऊस अशी विविध संकटेही झेलावी लागली. एवढी संकटे असून, सुद्धा ऐन विक्री काळात योग्य भाव मिळत नसल्याने व्यापाऱ्यांना मागेल त्या भावात केळी विकावी लागली होती. लॉकडाउनचे नियम शिथिल होताच केळीच्या वाहतुकीत सुरळीतपणा आला. याचा फायदा केळी इतर राज्यात जाऊ लागली. परिणामी दर आठशे ते हजार रुपये प्रति क्विंटल झाले आहेत.

प्रतिक्रिया
दोन एकरांत केळी लावलेली आहे. चांगला माल विक्रीला येताच कोरोनाचा लॉकडाउन सुरू झाला. व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या अडचणींचा फायदा घेत वाटेल त्या भावाने केळी खरेदी केली. माल नाशवंत असल्यामुळे तो काढणीला आल्यावर जास्त दिवस टिकत नाही. गेल्या काही दिवसांपासून भावामध्ये सुधारणा झाली आहे, चांगला दर मिळत आहे.
-अक्षय आतकड, शेतकरी, बोर्डी, जि. अकोला

प्रतिक्रिया

नैसर्गिक आपत्तीमुळे केळी उत्पादक शेतकरी मेटाकुटीला आला आहे. यंदा मे महिन्यात झालेल्या चक्रीवादळामुळे केळीच्या बागा अक्षरशः जमीनदोस्त झाल्या आणि आता केळीचे उत्पादन घटले. आता मागणी वाढल्याने व पुरेसे उत्पादन नसल्याने चांगला दर मिळत आहे.
-सुनील लाहोरे, केळी उत्पादक

 

 


इतर ताज्या घडामोडी
युरियाची विषबाधा टाळण्यासाठी काळजी...युरियाची विषबाधा ही सर्व पाळीव प्राण्यांमध्ये...
जळगाव जिल्ह्यात ५७ टक्के पाऊसजळगाव : जिल्ह्यात आतापर्यंत ५७ टक्के पाऊस झाला...
शनिवारपर्यंत सुरू राहणार मका, ज्वारीची...औरंगाबाद : राज्यात रब्बीतील मका व ज्वारी खरेदीला...
परभणी जिल्ह्यात पीकविमा तक्रारींचा...परभणी ः पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गंत टोल फ्री...
नाशिक जिल्ह्यात धरणसाठा ४६ टक्क्यांवरनाशिक : गत सप्ताहात जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट...
सोलापूर ःविमा कंपनी शेतकऱ्यांपर्यंत...सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात पीकविम्यासाठी भारती...
अकोला ः नैसर्गिक आपत्तीनंतर पीकविमा...अकोला ः पीकविमा हा आपत्तीच्या काळात शेतकऱ्यांना...
मंगळवेढ्यात सूर्यफूल पीकविम्यातून वगळलेमंगळवेढा, जि. सोलापूर ः मंगळवेढा तालुक्यात...
कोल्हापूर : पीकविम्याच्या ऑनलाइन...कोल्हापूर : विमा योजनेत सहभागाबाबतीत राज्यात...
नाशिक : पीकविम्याबाबत तक्रारींचा पाढानाशिक : पीकविमा कंपन्यांची असक्षम यंत्रणा......
सिंधुदुर्गात कार्यालय; पण शेतकऱ्यांना...सिंधुदुर्गनगरी : विमा कंपनीचे सिंधुदुर्गनगरी येथे...
रत्नागिरी : पूरबाधित शेतकऱ्यांची...रत्नागिरी : जिल्ह्यातील नदी किनारी भागात पुरामुळे...
नांदेडमध्ये विमा कंपनीचे जिल्ह्याच्या...नांदेड : पंतप्रधान पीकविमा योजनेत जिल्ह्यासाठी...
नगर : विमा कार्यालय, हेल्पलाइन नंबरची... नगर : नुकसानीची शेतकऱ्यांना भरपाई मिळावी,...
कोल्हापूर : पूर फुटाने वाढला, इंचाने...कोल्हापूर : जिल्ह्यातील पूरस्थिती हळूहळू कमी होत...
राजकीय नेत्यांनी पूरग्रस्त भागांचे दौरे...मुंबई : राजकीय नेत्यांनी पूरग्रस्त भागाचे दौरे...
विमा कंपनीचा कारभार चालतोय कृषी...सातारा : जिल्ह्यात खरिपाच्या सुरूवातीस पावसाने...
चिपळूणमधील पूरग्रस्तांसाठी पुनर्वसन...रत्नागिरी : ढगफुटीसदृश पावसामुळे चिपळूणकरांचे...
पाणी ओसरताच तातडीने पंचनामेकोल्हापूर : पूरग्रस्तांना आवश्यक ती मदत राज्य...
शेतकरी नियोजन पीक : कांदाशेतकरी : नंदकुमार काशिनाथ उशीर गाव : धोडंबे, ता...