‘लम्पी स्कीन’मुळे दूध उत्पादनाला राज्यात फटका

‘लम्पी स्कीन’ आजाराचा प्रादुर्भाव झालेल्या जनावरांच्या दुधात साधारण वीस टक्के घट झाल्याचे दिसून येत आहे. याशिवाय सुरुवातीच्या काळात काळजी न घेतलेली गाभण जनावरे आणि त्यांच्या प्रजनन क्षमेतवर परिणाम झाला आहे.
‘Lumpy’ hits the milk production
‘Lumpy’ hits the milk production

नगर ः ‘लम्पी स्कीन’ आजाराचा प्रादुर्भाव झालेल्या जनावरांच्या दुधात साधारण वीस टक्के घट झाल्याचे दिसून येत आहे. याशिवाय सुरुवातीच्या काळात काळजी न घेतलेली गाभण जनावरे आणि त्यांच्या प्रजनन क्षमेतवर परिणाम झाला आहे. सध्या या आजाराचा प्रादुर्भाव होण्याचे प्रमाण पूर्णतः आटोक्यात आले असले, तरी बाधित जनावरांमध्ये विविध समस्या दिसून येत आहेत.

नगरसह राज्यातील साधारण पंचवीस जिल्ह्यांत जनावरांना लम्पी स्कीन आजाराचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून आले. गाय वर्गातील जनावरांना या आजाराचा जास्त प्रादुर्भाव होतो. काही ठिकाणी म्हशींमध्येही प्रादुर्भाव दिसून आला. नगर जिल्ह्यातील तेरा तालुक्यांत साधारण पावणेपाचशे जनावरांना आजाराचा प्रादुर्भाव झाला आहे. यातील बहुतांश जनावरे दुभती होती.

पशुसंवर्धन विभागाने तातडीने उपाययोजना करत बाधित जनावरांसह संपर्कात आलेल्या ९६ हजार जनावरांना लंम्पी स्कीन आजार प्रतिबंधक लसीकरण केले. पशुसंवर्धन विभागाने दिलेल्या माहितीनुसार सध्या आजाराची साथ आटोक्यात आली आहे. ज्या जनावरांना आजाराचा प्रादुर्भाव झाला, त्यांच्या दूध उत्पादनात वीस ते तीस टक्क्यांनी घट झाल्याचे दिसून येत आहे. याशिवाय सुरुवातीच्या काळात गाभण असलेल्या गाईला हा आजार झाला असेल तर गर्भपातही दिसून आला. लंम्पी स्कीन आजार झालेल्या गाईच्या दुधात घट झाली असल्याचा पशूपालकांचा अनुभव आहे. ज्यांनी काळजी घेतली त्यांच्या जनावरांना मात्र यापासून बचाव करता आला, असे पशुपालक नितीन काकडे यांनी सांगितले.

राज्यातील जनावरांच्यामध्ये लंम्पी स्कीन आजाराचा प्रादुर्भाव दिसून आला. मात्र, लसीकरण आणि प्रभावी उपाययोजना केल्याने ही साथ पूर्णतः आटोक्यात आली. सध्या नगर जिल्ह्यात एकही जनावर बाधित नाही. आजाराची लक्षणे दिसल्यानंतर सुरुवातीला योग्य काळजी घेणे गरजेचे आहे. जर काळजी घेतली नाही तर दूध उत्पादन, प्रजनन क्षमेतवर परिणाम दिसून येतो. - डॉ. सुनील तुंबारे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, नगर

आजाराची लक्षणे

  • जनावरांना सुरुवातीला ताप येतो, अंगावर गाठी येतात. नाकपुडी कोरडी पडते, चारा कमी खाते.
  • पंधरा दिवस आजाराचा प्रभाव.
  • अंगावर आलेल्या गाठी फुटल्या तर त्याचा प्रभाव महिनाभर राहतो.
  • जनावरांना अशक्तपणा येतो. दुर्बलता आल्याने वेदना होतात.  
  • वेळेत उपचार झाले नाहीत, तर गाभण जनावरांचा गर्भपात होतो.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com