Agriculture news in Marathi ‘Lumpy’ hits the milk production | Page 2 ||| Agrowon

‘लम्पी स्कीन’मुळे दूध उत्पादनाला राज्यात फटका

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 25 फेब्रुवारी 2021

‘लम्पी स्कीन’ आजाराचा प्रादुर्भाव झालेल्या जनावरांच्या दुधात साधारण वीस टक्के घट झाल्याचे दिसून येत आहे. याशिवाय सुरुवातीच्या काळात काळजी न घेतलेली गाभण जनावरे आणि त्यांच्या प्रजनन क्षमेतवर परिणाम झाला आहे.

नगर ः ‘लम्पी स्कीन’ आजाराचा प्रादुर्भाव झालेल्या जनावरांच्या दुधात साधारण वीस टक्के घट झाल्याचे दिसून येत आहे. याशिवाय सुरुवातीच्या काळात काळजी न घेतलेली गाभण जनावरे आणि त्यांच्या प्रजनन क्षमेतवर परिणाम झाला आहे. सध्या या आजाराचा प्रादुर्भाव होण्याचे प्रमाण पूर्णतः आटोक्यात आले असले, तरी बाधित जनावरांमध्ये विविध समस्या दिसून येत आहेत.

नगरसह राज्यातील साधारण पंचवीस जिल्ह्यांत जनावरांना लम्पी स्कीन आजाराचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून आले. गाय वर्गातील जनावरांना या आजाराचा जास्त प्रादुर्भाव होतो. काही ठिकाणी म्हशींमध्येही प्रादुर्भाव दिसून आला. नगर जिल्ह्यातील तेरा तालुक्यांत साधारण पावणेपाचशे जनावरांना आजाराचा प्रादुर्भाव झाला आहे. यातील बहुतांश जनावरे दुभती होती.

पशुसंवर्धन विभागाने तातडीने उपाययोजना करत बाधित जनावरांसह संपर्कात आलेल्या ९६ हजार जनावरांना लंम्पी स्कीन आजार प्रतिबंधक लसीकरण केले. पशुसंवर्धन विभागाने दिलेल्या माहितीनुसार सध्या आजाराची साथ आटोक्यात आली आहे. ज्या जनावरांना आजाराचा प्रादुर्भाव झाला, त्यांच्या दूध उत्पादनात वीस ते तीस टक्क्यांनी घट झाल्याचे दिसून येत आहे. याशिवाय सुरुवातीच्या काळात गाभण असलेल्या गाईला हा आजार झाला असेल तर गर्भपातही दिसून आला. लंम्पी स्कीन आजार झालेल्या गाईच्या दुधात घट झाली असल्याचा पशूपालकांचा अनुभव आहे. ज्यांनी काळजी घेतली त्यांच्या जनावरांना मात्र यापासून बचाव करता आला, असे पशुपालक नितीन काकडे यांनी सांगितले.

राज्यातील जनावरांच्यामध्ये लंम्पी स्कीन आजाराचा प्रादुर्भाव दिसून आला. मात्र, लसीकरण आणि प्रभावी उपाययोजना केल्याने ही साथ पूर्णतः आटोक्यात आली. सध्या नगर जिल्ह्यात एकही जनावर बाधित नाही. आजाराची लक्षणे दिसल्यानंतर सुरुवातीला योग्य काळजी घेणे गरजेचे आहे. जर काळजी घेतली नाही तर दूध उत्पादन, प्रजनन क्षमेतवर परिणाम दिसून येतो.
- डॉ. सुनील तुंबारे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, नगर

आजाराची लक्षणे

  • जनावरांना सुरुवातीला ताप येतो, अंगावर गाठी येतात. नाकपुडी कोरडी पडते, चारा कमी खाते.
  • पंधरा दिवस आजाराचा प्रभाव.
  • अंगावर आलेल्या गाठी फुटल्या तर त्याचा प्रभाव महिनाभर राहतो.
  • जनावरांना अशक्तपणा येतो. दुर्बलता आल्याने वेदना होतात.  
  • वेळेत उपचार झाले नाहीत, तर गाभण जनावरांचा गर्भपात होतो.

इतर अॅग्रो विशेष
कर्ज परतफेडीला मुदतवाढ मिळावी गोंदिया ः गेल्या हंगामात देण्यात आलेल्या...
परभणी, हिंगोलीत २० हजार क्विंटल हरभरा...परभणी ः किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत...
लासलगावला कांदा लिलावात सहभागी होण्यास...नाशिक : सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या...
विदर्भात मेघगर्जनेसह पूर्वमोसमी पावसाची...पुणे : झारखंड ते उत्तर कर्नाटक, छत्तीसगड आणि...
हापूसचा दराचा गोडवा टिकून रत्नागिरी ः वातावरणातील अनियमितेचा परिणाम यंदा...
राज्यात अद्याप वीस लाख टन ऊस शिल्लक कोल्हापूर : राज्यातील ऊस उत्पादक पट्यातील साखर...
बाजार समित्या बंद ठेवू नका पुणे ः कोरोना टाळेबंदीत शेतीमाल वितरण सुरळीत...
राज्यात चिकन, अंड्यांच्या दरात सुधारणा नगर ः कोरोना व्हायरस संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर...
साखर वाहतुकीसाठी क्विंटलला १०० रुपये...कोल्हापूर : पूर्वेकडील राज्यांनी वाहतूक खर्चात...
कमाल तापमान वाढण्यास सुरुवात पुणे : राज्याच्या अनेक भागांत आकाश कोरडे झाले आहे...
पीक बदलातून शेती झाली किफायतशीरनांदोस (ता.मालवण,जि.सिंधुदुर्ग) गावातील...
देशात यंदा सर्वसाधारण पाऊस;...पुणे : देशभरात यंदा मॉन्सूनचा सर्वसाधारण पाऊस...
चैत्री यात्राही यंदा प्रतिकात्मक...सोलापूर ः कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्‍...
अवजारे उद्योगावर मंदीचे ढग पुणेः राज्यात पाच अब्ज रुपयांची उलाढाल करणाऱ्या...
फळे, भाजीपाला थेट पणन परवान्याला ६...पुणे ः कोरोना टाळेबंदीत शेतीमालाचे नुकसान होऊ नये...
देशाची साखर उत्पादनात उच्चांकी झेप कोल्हापूर ः साखर उत्पादनात देशाची घोडदौड ३०० लाख...
क्यूआर कोड रोखणार हापूसमधील भेसळ रत्नागिरी ः बाजारपेठेमध्ये ‘हापूस’ची कर्नाटक...
जालन्यात वर्षभरात ४२९ टन रेशीम कोष...जालना : येथे प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात...
राज्यात उन्हाचा चटका वाढणार पुणे : आठवडाभर पूर्वमोसमी पावसाने धुमाकूळ...
भाजीपाला विकण्याचे शेतकऱ्यांपुढे आव्हान...कोल्हापूर : ‘ब्रेक द चेन’च्या नवीन...