agriculture news in marathi In ‘Mahakhanij’ from foreign countries Sand registration is mandatory | Agrowon

‘महाखनिज’मध्ये परराज्यांतील वाळूची नोंदणी बंधनकारक

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 25 फेब्रुवारी 2021

परभणी ः परराज्यातून वाळू वाहतूक करण्यासाठी संबंधित व्यक्ती, संस्थांनी राज्यामध्ये गौण खनिजाच्या उत्खनन व वाहतुकीसाठीच्या संगणकीय प्रणाली (महाखनिज) मध्ये नोंदणी करणे बंधनकारक आहे.

परभणी ः ‘‘राज्य शासनाने परराज्यांतून होणाऱ्या वाळू वाहतुकीवर काही निर्बंध घातले आहेत. परराज्यातून वाळू वाहतूक करण्यासाठी संबंधित व्यक्ती, संस्थांनी राज्यामध्ये गौण खनिजाच्या उत्खनन व वाहतुकीसाठीच्या संगणकीय प्रणाली (महाखनिज) मध्ये नोंदणी करणे बंधनकारक आहे. त्यामुळे सर्व  संबंधित व्यक्ती, संस्थांनी तरतुदीचे पालन करावे,’’ असे आवाहन उपविभागीय अधिकारी डॉ. संजय कुंडेटकर यांनी केले.

संबंधित व्यक्ती, संस्थांनी परराज्यातून आणलेल्या वाळूचा साठा करून विक्री करताना महाराष्ट्र गौण खनिज उत्खनन नियमातील तरतुदीनुसार व्यापारी परवाना घेणे आवश्यक आहे. इतर राज्यातून रस्त्याने व जलमार्गाने आणलेली वाळू ज्या जिल्ह्याच्या हद्दीमध्ये प्रवेश करेल, त्या जिल्हाधिकारी कार्यालयात आणि परराज्यातून रेल्वेने आणलेल्या वाळूसाठा ती ज्या रेल्वेस्टेशनवर खाली करण्यात येणार आहे. त्या जिल्ह्यात स्वामित्वधन दराच्या १० टक्के एवढी प्रतिब्रास रक्कम जिल्हा खनिज प्रतिष्ठानमध्ये जमा करणे आवश्यक राहील. 

ही रक्कम भरणा केल्यानंतरच संबंधितांना झिरो रॉयल्टी पास देण्याबाबतची कार्यवाही संबंधित जिल्हाधिकारी कार्यालय करेल. संबंधित व्यक्ती अथवा संस्था परराज्यातून आणलेल्या वाळूचा साठा करतील. ती जमीन अकृषिक असणे आवश्यक आहे. वाळूचा साठा व विक्रीची दैनंदिन नोंद साठा नोंदवहीत घेणे आवश्यक आहे. 

या नोंदवहीची क्षेत्रिय कार्यालयाकडून वेळोवेळी तपासणी करण्यात येईल. वाळूसाठा वैध परवान्यापेक्षा जादा आढळल्यास अथवा वाहतूक झिरो रॉयल्टी पासेस शिवाय केलेला आढळून आल्यास महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमानुसार दंडात्मक कारवाईसाठी पात्र राहील, असे डॉ. कुंडेटकर यांनी सांगितले.


इतर ताज्या घडामोडी
खरीप हंगामाच्या तोंडावर ...यवतमाळ : गेल्या दशकात जिल्ह्यातील शेतकरी कधी...
अमरावतीत शासकीय दूध योजनेच्या संकलनात ...अमरावती : कोरोनामुळे हॉटेल आणि दुग्धजन्य पदार्थ...
‘आंबेओहोळ’ची घळभरणी अंतिम टप्यात उत्तूर, जि. कोल्हापूर : आरदाळ-उत्तूर (ता. आजरा)...
म्हैसाळ योजनेतून सांगोल्यासाठी पाणी...सांगोला, जि. सोलापूर : सांगोला वितरिका क्रमांक...
सहा कारखान्यांनी उरकले गाळप; ९७ लाख ३८... सातारा : जिल्ह्यातील साखर हंगाम अंतिम टप्प्यात...
खरिपासाठी नगरमध्ये साडेसहा लाख हेक्टर...पुणे नगर : नगर जिल्ह्यात यंदा खरिपासाठी यंदा ६...
परभणीतील शेतकऱ्यांना ८३ कोटींचा विमा...परभणी : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गंत सन...
ग्रामसभा करणार तेंदुपत्याची विक्री गडचिरोली : पेसा (पंचायत एक्स्टेंशन टू शेडूल...
ग्रामीण रुग्णांसाठी जिल्हा परिषद...सोलापूर ः जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये कोरोनाचा...
कृषी पणन मंडळाकडून आॅनालाइन आंबा...पुणे ः कोरोना संकटातही आंबा उत्पादक शेतकऱ्यांच्या...
अखेर मोसंबी उत्पादकांना विमा परतावा...जालना : जिल्ह्यातील सहा हजारांवर मोसंबी...
राहीबाई पोपेरे यांची वनस्पती संरक्षण...नाशिक : भारत सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण...
डाळिंब अंबिया बहरातील कीड- रोग...डाळिंब बागेत विविध कीड-रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या...
कोरोनाबाबत डाॅ. सिंग यांनी सूचवलेला...नांदेड : कोरोनाविरूद्ध लढण्यासाठी माजी पंतप्रधान...
कोरोना व्हॅक्सिनसाठी वयाची अट शिथिल...कोल्हापूर : भाजीपाला, दूध उत्पादक तसेच...
पुणे बाजार समितीत गर्दीला बसणार लगामपुणे : शहरात कोरोना संसर्गामुळे लावण्यात आलेल्या...
गोसीखुर्द धरणाच्या पाण्याचे ...चंद्रपूर : प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या...
पुणे जिल्ह्यातील धरणांत ७८ टीएमसी...पुणे : गेल्या दीड महिन्यापासून उन्हाच्या झळा...
कोट्यवधींच्या कर्जवसुलीसाठी स्थापन...नांदेड : जिल्हा मध्यवर्ती बँकेची आर्थिक परिस्थिती...
पालखेडच्या आवर्तनाने शेतीसह पिण्याच्या...येवला, जि. नाशिक : पालखेड डाव्या कालव्यातून...