Agriculture news in marathi ‘Making reservations by amending the Constitution That's the decent thing to do, and it should end there. | Agrowon

‘घटनादुरुस्ती करून आरक्षण देणे  हाच केंद्र सरकारपुढे पर्याय’ 

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 15 जून 2021

घटनादुरुस्ती करून मराठा आरक्षण देणे हाच केंद्र सरकारपुढे पर्याय आहे. राज्य शासन आरक्षणासाठी सकारात्मक आहे, असे मत श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी व्यक्त केले.

कोल्हापूर : घटनादुरुस्ती करून मराठा आरक्षण देणे हाच केंद्र सरकारपुढे पर्याय आहे. राज्य शासन आरक्षणासाठी सकारात्मक आहे, असे मत श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी व्यक्त केले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शाहू महाराजांची सोमवारी (ता. १४) भेट घेतली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी आरक्षणाबाबत सकारात्मक चर्चा झाल्याचेही शाहू महाराज म्हणाले.

छत्रपती शाहू महाराज म्हणाले, ‘‘सुप्रीम कोर्टाने निकाल दिला असून, त्याचा अभ्यास करणे गरजेचे आहे. तो निकाल समजून घेऊन जे शक्य आहे, ते सर्व केले पाहिजे. मराठा आरक्षणाच्या इतर मागण्यांकडे सरकारचे लक्ष असून, यापुढेही राहणार आहे. आंदोलनाबाबत आमच्यात कोणती चर्चा झालेली नाही. मराठा समाजाने आता स्वत: सक्षम होऊन आपल्या पायावर उभे राहणे गरजेचे आहे.

सुप्रीम कोर्टाच्या निकालाचा ज्यांनी अभ्यास केला नाही, त्यांनी तो करणे गरजेचा आहे. त्याचे मराठीत भाषांतर करून अर्थ समजून घेतला पाहिजे. तसेच कोर्टाचा अवमानही होता कामा नये.’’ सारथी, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, या दोन्ही संस्था आर्थिकदृष्ट्या सक्षम करणार असल्याचे पवार यांनी सांगितले. 


इतर ताज्या घडामोडी
सेंद्रिय शेतीचे तंत्र अंगीकारा ः डॉ. ढवणबदनापूर, जि. जालना : अधिक उत्पादन देणाऱ्या संकरित...
पंतप्रधान आवास योजनेसाठी ११ लाख नावे...नगर ः ग्रामीण भागातील गरीब, अल्पभूधारक, घर...
अमरावती : निकृष्ट बियाणेप्रकरणी भरपाईचे...अमरावती ः निकृष्ट बियाण्यासंदर्भाने तालुकास्तरीय...
सात-बारासह फेरफारही मिळणार आता ऑनलाइन...पुणे : शेती संबंधीच्या दस्ताऐवजांची संगणकीकृत...
सांगली : पूरबाधितांच्या पंचनाम्यांचा...सांगली : महापुरानंतर आता नुकसानीचे पंचनामे सुरू...
अतिवृष्टीने नुकसान; ३४ हजारांवर अर्जअकोला : गेल्या महिन्यात जिल्ह्यात तीन दिवस...
जमीन अधिग्रहणाला विरोध; आळेफाट्यावर...आळेफाटा, जि. पुणे : पुणे-नाशिक हायस्पीड...
नगरमध्ये मिळाला पीकविमा; श्रेयासाठी...नगर : अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर गेल्या...
पदविकाधारकांना खासगी पशुवैद्यकीय...अकोला : दुग्ध व्यवसाय व्यवस्थापन व पशुसंवर्धन...
राळेगावमध्ये कपाशीवर बोंडअळीचा...राळेगाव, जि. यवतमाळ : जिल्ह्याचे मुख्य पीक...
परभणीत ४४६ कोटी ५९ लाख रुपये वितरणपरभणी ः चालू आर्थिक वर्षात (२०२१-२२) जुलै...
अनेक नोंदणीधारक शेतकरी ज्वारी...भालेर, जि. नंदुरबार ः जिल्ह्यात शुक्रवार (ता. ३०...
डाळ व्यापाऱ्याची चार कोटींनी फसवणूक नागपूर : डाळ व्यापाऱ्याला आमिष दाखवून साखरेच्या...
महसूली प्रकरणांचा निपटारा तीन टप्प्यांत...नाशिक : सेवाहक्कांतर्गत १००पेक्षा अधिक व राज्यात...
उजनीतून खरिपासाठी पहिले आवर्तन सोडणारसोलापूर ः उजनी धरणात आतापर्यंत उपयुक्त पाणीसाठा...
नागपुरात सोयाबीन दरातील घोडदौड कायम नागपूर ः प्रक्रिया उद्योजकांची मागणी वाढल्याने...
कृषी सल्ला : दापोली विभागपावसाच्या पाण्यामुळे फवारणी केलेले कीटकनाशक किंवा...
नगरला वाटाणा, भेंडीच्या दरात सुधारणा;...नगर ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न...
नाशिकमध्ये डाळिंबाच्या आवकेत वाढनाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
पावसाच्या उघडिपीमुळे भाजीपाला आवकेत वाढपुणे ः पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी...