‘माळेगाव कारखाना देणार  शेतकऱ्यांना ‘एफआरपी’’ 

माळेगाव साखर कारखाना आगामी काळात शासन धोरणानुसार एफआरपीची रक्कम शेतकऱ्यांना अधिकाधिक देण्यास प्रयत्न करेल. येत्या हंगामात १५ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट आहे.
‘माळेगाव कारखाना देणार  शेतकऱ्यांना ‘एफआरपी’’  ‘Malegaon will give the factory FRP to farmers
‘माळेगाव कारखाना देणार  शेतकऱ्यांना ‘एफआरपी’’  ‘Malegaon will give the factory FRP to farmers

माळेगाव, जि. पुणे : माळेगाव साखर कारखाना आगामी काळात शासन धोरणानुसार एफआरपीची रक्कम शेतकऱ्यांना अधिकाधिक देण्यास प्रयत्न करेल. येत्या हंगामात १५ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट आहे. साखर गोडाउनसह प्रतिदिनी १० टन सीएनजी गॅस प्रकल्प उभारणे आदी महत्त्वाकांक्षी कामे करीत माळेगाव कारखाना नक्की अग्रगण्य ऊसदराशी स्पर्धा करेल, असे प्रतिपादन अध्यक्ष बाळासाहेब तावरे यांनी केले.  माळेगाव सहकारी साखर कारखान्याची ६६वी वार्षिक सर्वसाधारण सभा अध्यक्ष बाळासाहेब तावरे, उपाध्यक्ष बन्सीलाल आटोळे, कार्यकारी संचालक राजेंद्र जगताप यांच्या उपस्थितीत ऑनलाइन पार पडली. परिणामी, शासन निर्णयानुसार शेअर्स किंमत वाढविण्यासह सभेपुढे ठेवलेले ११ विषय सर्वांनुमते मंजूर झाले. या प्रसंगी अध्यक्ष तावरे यांनी वरील धोरणात्मक भूमिका स्पष्ट केली. या वेळी सर्वाधिक फायद्याच्या ठरलेल्या विमा रकमेत २ लाखांची मर्यादा ८ लाखांपर्यंत वाढविणे, परदेशी शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी अर्थिक तरतूद करणे, केंद्र शासनाच्या धोरणानुसार अधिकाधिक इथेनॉलनिर्मिती करणे, गतवर्षीच्या अंतिम बिलातील उर्वरित १९१ रुपये एकरकमी दिवाळीला द्यावेत आदी मागण्यांचा आग्रह झाला. त्यामध्ये सभासद बाबूराव चव्हाण, सुनील पवार, अनिल जगताप, विनायक गावडे, डी. डी. जगताप, विजय तावरे, विलास तावरे, शेखर जगताप, इंद्रसेन आटोळे आदींचा समावेश होता.  दुसरीकडे, अहवाल सालातील प्रतिटन २७५० अंतिम भाव कमी निघाला, विस्तारिकरणाच्या नावाखाली झालेल्या भ्रष्टाचाराबाबत श्‍वेतपत्रिका काढावी आदी मुद्दे कळीचे ठरले. या बाबत अध्यक्ष तावरे म्हणाले, ‘‘माळेगावने दोनशे कोटी रुपये खर्च करून कारखान्याचे विस्तारीकरण केले. परंतु त्या कालावधीमध्ये यंत्रसामग्रीने पाहिजे तेवढी साथ न दिली नाही. ऊस गाळप व रिकव्हरी घसरली. साखरेचा दर्जाही खालावला. वीज, डिस्टलरी आदी प्रकल्पाचे उत्पन्नही कमी आले. शिल्लक साखरेचा प्रश्‍नामुळे बॅंकांच्या व्याजाचा भुर्दंड वाढला, तोडणी वाहतुकीच्या कर्जासह विविध देणी द्यावी लागली. अशातच २०१९-२० हंगामात उत्पादन खर्च आणि उत्पनाचा विचार न करता प्रतिटन २७०० रुपये अंतिम दर दिला गेला. त्यामुळेच सन २०२०-२१चा अंतिम ऊस २७५० इतका निघाला. प्रादेशिक सहसंचालक यांच्याकडून विस्तारिकरणाची चौकशी चालू असून, या बाबत वस्तूस्थिती पुढे येईल.’’  अभिनंदनाचे ठराव ः   गतवर्षी कोरोनासह विविध आजारांच्या पार्श्वभूमिवर अध्यक्ष बाळासाहेब तावरे, उपाध्यक्ष बंशीलाल आटोळे, संचालक नितीन सातव आदी संचालकांनी राबवलेल्या आरोग्य विमा योजनेचा सभासदांना सर्वाधिक फायदा होणे, उसाचे वेळेत गाळप केल्याने गहू व हरभाऱ्याची पिके घेता आली, माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी साखर कामगारांचा वेतन वाढीचा प्रश्न निकाली काढला, संचालकांनी शंभर टक्के प्रदुषण नियंत्रित करण्यासाठी प्रयत्न केले, कर्जमुक्तीकडे कारखान्याची वाटचाल होणे आदी संचालक मंडळाच्या चांगल्या कामांचे अभिनंदनाचे ठराव अनेक सभासदांनी मांडले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com