Agriculture News in Marathi ‘Malegaon will give the factory FRP to farmers | Page 4 ||| Agrowon

‘माळेगाव कारखाना देणार  शेतकऱ्यांना ‘एफआरपी’’ 

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 30 सप्टेंबर 2021

माळेगाव साखर कारखाना आगामी काळात शासन धोरणानुसार एफआरपीची रक्कम शेतकऱ्यांना अधिकाधिक देण्यास प्रयत्न करेल. येत्या हंगामात १५ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट आहे.

माळेगाव, जि. पुणे : माळेगाव साखर कारखाना आगामी काळात शासन धोरणानुसार एफआरपीची रक्कम शेतकऱ्यांना अधिकाधिक देण्यास प्रयत्न करेल. येत्या हंगामात १५ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट आहे. साखर गोडाउनसह प्रतिदिनी १० टन सीएनजी गॅस प्रकल्प उभारणे आदी महत्त्वाकांक्षी कामे करीत माळेगाव कारखाना नक्की अग्रगण्य ऊसदराशी स्पर्धा करेल, असे प्रतिपादन अध्यक्ष बाळासाहेब तावरे यांनी केले. 

माळेगाव सहकारी साखर कारखान्याची ६६वी वार्षिक सर्वसाधारण सभा अध्यक्ष बाळासाहेब तावरे, उपाध्यक्ष बन्सीलाल आटोळे, कार्यकारी संचालक राजेंद्र जगताप यांच्या उपस्थितीत ऑनलाइन पार पडली. परिणामी, शासन निर्णयानुसार शेअर्स किंमत वाढविण्यासह सभेपुढे ठेवलेले ११ विषय सर्वांनुमते मंजूर झाले. या प्रसंगी अध्यक्ष तावरे यांनी वरील धोरणात्मक भूमिका स्पष्ट केली. या वेळी सर्वाधिक फायद्याच्या ठरलेल्या विमा रकमेत २ लाखांची मर्यादा ८ लाखांपर्यंत वाढविणे, परदेशी शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी अर्थिक तरतूद करणे, केंद्र शासनाच्या धोरणानुसार अधिकाधिक इथेनॉलनिर्मिती करणे, गतवर्षीच्या अंतिम बिलातील उर्वरित १९१ रुपये एकरकमी दिवाळीला द्यावेत आदी मागण्यांचा आग्रह झाला.

त्यामध्ये सभासद बाबूराव चव्हाण, सुनील पवार, अनिल जगताप, विनायक गावडे, डी. डी. जगताप, विजय तावरे, विलास तावरे, शेखर जगताप, इंद्रसेन आटोळे आदींचा समावेश होता. 

दुसरीकडे, अहवाल सालातील प्रतिटन २७५० अंतिम भाव कमी निघाला, विस्तारिकरणाच्या नावाखाली झालेल्या भ्रष्टाचाराबाबत श्‍वेतपत्रिका काढावी आदी मुद्दे कळीचे ठरले. या बाबत अध्यक्ष तावरे म्हणाले, ‘‘माळेगावने दोनशे कोटी रुपये खर्च करून कारखान्याचे विस्तारीकरण केले. परंतु त्या कालावधीमध्ये यंत्रसामग्रीने पाहिजे तेवढी साथ न दिली नाही. ऊस गाळप व रिकव्हरी घसरली. साखरेचा दर्जाही खालावला. वीज, डिस्टलरी आदी प्रकल्पाचे उत्पन्नही कमी आले. शिल्लक साखरेचा प्रश्‍नामुळे बॅंकांच्या व्याजाचा भुर्दंड वाढला, तोडणी वाहतुकीच्या कर्जासह विविध देणी द्यावी लागली. अशातच २०१९-२० हंगामात उत्पादन खर्च आणि उत्पनाचा विचार न करता प्रतिटन २७०० रुपये अंतिम दर दिला गेला. त्यामुळेच सन २०२०-२१चा अंतिम ऊस २७५० इतका निघाला. प्रादेशिक सहसंचालक यांच्याकडून विस्तारिकरणाची चौकशी चालू असून, या बाबत वस्तूस्थिती पुढे येईल.’’ 

अभिनंदनाचे ठराव ः  
गतवर्षी कोरोनासह विविध आजारांच्या पार्श्वभूमिवर अध्यक्ष बाळासाहेब तावरे, उपाध्यक्ष बंशीलाल आटोळे, संचालक नितीन सातव आदी संचालकांनी राबवलेल्या आरोग्य विमा योजनेचा सभासदांना सर्वाधिक फायदा होणे, उसाचे वेळेत गाळप केल्याने गहू व हरभाऱ्याची पिके घेता आली, माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी साखर कामगारांचा वेतन वाढीचा प्रश्न निकाली काढला, संचालकांनी शंभर टक्के प्रदुषण नियंत्रित करण्यासाठी प्रयत्न केले, कर्जमुक्तीकडे कारखान्याची वाटचाल होणे आदी संचालक मंडळाच्या चांगल्या कामांचे अभिनंदनाचे ठराव अनेक सभासदांनी मांडले.
 


इतर ताज्या घडामोडी
पुणे जिल्ह्यातील १ हजार शेतकरी होणार...पुणे ः जिल्ह्यात १ हजार शेतकरी कृषी निर्यातदार...
आजरा तालुक्यात यंदा ३०० हेक्टरवर रब्बी...आजरा, जि. कोल्हापूर आजरा तालुक्यात जमिनीला वापसा...
नांदेड जिल्ह्यात अवकाळीचा दोन हजार...नांदेड : जिल्ह्यात २९ डिसेंबर रोजी झालेल्या...
शेतकऱ्यांना तंत्रज्ञान स्वातंत्र्य...यवतमाळ : शेतकऱ्यांना तंत्रज्ञान स्वातंत्र्य...
अनुकूल स्थिती होताच शर्यतींना परवानगी ः...पुणे ः ‘‘राज्यात कोविडमुळे काही भागांमध्ये...
मोदी म्हणाले, शेतकरी माझ्यासाठी मेलेत...चंडीगड ः मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे...
रब्बी पीक हानीबाबत पूर्वसूचना दाखल करापुणे ः राज्यात खरिपानंतर आता रब्बी हंगामातील...
थंडी कमी, तापमानात वाढपुणे : राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात वाढ...
सिंधुदुर्गात ऊसतोड रखडलीसिंधुदुर्गनगरी ः जिल्ह्यातील ऊसशेती तोडणी अभावी...
कळमनामध्ये सोयाबीनची आवक मंदावलीनागपूर ः दरातील तेजीच्या अपेक्षेने कळमना...
नाशिकमध्ये डाळिंबाची आवक घटली; दर स्थिरनाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या...
जालन्यात तुरीची सर्वाधिक आवकजालना : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
‘महाबीज’च्या बीजोत्पादकांना मिळणार एकच...अकोला ः राज्यातील शेतकऱ्यांना वर्षानुवर्षे...
नगरला वांगी, फ्लॉवरच्या दरात सुधारणा...नगर, ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न...
चोपडा साखर कारखाना कर्मचाऱ्यांचे धरणे...चोपडा, जि.जळगाव : चोपडा साखर कारखान्याचे काही...
पुष्प संशोधन संचालनालयाचे कार्यालय,...पुणे ः भारतीय कृषी शिक्षण आणि संशोधन परिषदेच्या...
हुलगे हुलगे-पावन पुलगे..! वेळा...नांदेड : सोलापूर, मराठवाडा, कर्नाटकच्या सीमेवरील...
पशुरोगांच्या निदान, उपचारात नव...अकोला ः कोरोनासारख्या साथीच्या आजाराच्या पार्श्‍...
कापडावर वाढीव जिएसटीला तुर्तास स्थगिती...कापडावरचा जीएसटी (GST) वाढवण्याचा निर्णय...
सोयाबीन बाजार सुधारलागेल्या आठवड्यात सरकारने तीन महत्त्वाचे निर्णय...