Agriculture news in Marathi ‘Mama’ lake became muddy | Page 2 ||| Agrowon

‘मामा’ तलाव रुतले गाळात 

टीम अॅग्रोवन
बुधवार, 15 सप्टेंबर 2021

सिंचनाचे सोडा जनावरांना पिण्यासाठी पाणी मिळत नाही. एकेकाळी हजारो एकर शेती सिंचित करण्याची क्षमता असलेले मालगुजारी तलाव शासन व संबंधित विभागाच्या दुर्लक्षामुळे निरुपयोगी ठरले. शिवनीबांध, कुंभली, गुढरी येथील लघू प्रकल्पाशिवाय जुन्या तलावांची संख्या मोठी आहे.

साकोली, जि. भंडारा : भंडारा, गोंदिया जिल्ह्यांतील २,२६७ माजी मालगुजारी तलावांपैकी १,६०२ तलाव भंडारा जिल्ह्यात आहेत. पूर्वी अशा तलावांची मालकी परिसरातील मालगुजारांकडे होती. मात्र १९५० च्या संपत्ती हक्क कायद्यानुसार मामा तलाव शासनाच्या ताब्यात गेले. बर्वे आयोगाच्या शिफारशीनुसार दुरुस्ती व पाणीवाटपावर पाणीकर आकारायचे ठरविले. याला त्या वेळी जनतेने विरोध केला. मात्र शासनाने त्याची दखल घेतली नाही. तेव्हापासून या तलावांची दुरवस्था सुरू झाली. 

जिल्हा परिषदेला लघू पाटबंधारे विभागाकडे आलेले मालगुजारी तलाव ‘रोहयो’च्या कामापुरते मर्यादित राहिले. पावसाळ्यात भरलेला तलाव दोन महिन्यांत रिकामा होतो. सिंचनाचे सोडा जनावरांना पिण्यासाठी पाणी मिळत नाही. एकेकाळी हजारो एकर शेती सिंचित करण्याची क्षमता असलेले मालगुजारी तलाव शासन व संबंधित विभागाच्या दुर्लक्षामुळे निरुपयोगी ठरले. शिवनीबांध, कुंभली, गुढरी येथील लघू प्रकल्पाशिवाय जुन्या तलावांची संख्या मोठी आहे. 

एकोडी, चांदोरी, आमगाव, वलमाझरी, पिंडकेपार, पाथरी, सावरगाव, खंडाळा, उमरी, लवारी, सितेपार, सानगडी, केसलवाडा या गावांसह साकोली तालुक्यात तब्बल २४८ मालगुजारी तलाव आहेत. परंतु कालव्यांची अपूर्ण कामे, वाढते अतिक्रमण, गाळाचा उपसा न होणे यामुळे तलाव बिनकामाचे ठरले. बहुतांश नागरिकांचा मुख्य व्यवसाय शेतीच असल्याने तलावांच्या उद्धारावरच येथील अर्थकारण अवलंबून असल्याने हा प्रश्न प्राधान्याने सोडविणे गरजेचे आहे. 

सर्व विभागांकडून हवे नियोजनबद्ध काम 
तलाव खोलीकरणासाठी कृषी, वन, महसूल व वित्त विभागाने समन्वयाने काम करणे गरजेचे आहे. अनेक तलाव वनविभागाच्या अखत्यारीत येत असल्याने तलावांचे काम वन विभागाकडून अडवले जाते. साकोली तालुक्यातील वडेगाव खांबा येथील तलावांचे काम वनविभागाने तीस वर्षांपासून थांबविले. अद्याप कालव्याची कामे अपूर्ण आहेत. घानोड, भुरेजंगी, जांभळी, रेंगेपार येथील तलावांचे खोलीकरण झाल्यास तालुका सुजलाम् सुफलाम् होईल. तलावांच्या खोलीकरणासोबतच तलावातून शेतकऱ्यांच्या शेतीपर्यंत जाणारे नहर बनणे गरजेचे आहे. नहरापासून प्रत्येक बांधापर्यंत जाणाऱ्या कॅनॉलचे बांधकाम झालेले नसल्याने पाणी जमिनीत मुरते. त्यामुळे पाण्याचा अपव्यय होतो. शासनाच्या सर्व विभागांनी नियोजनबद्धरीत्या काम केले तरच शेतकऱ्यांना वर्षभर पाणी मिळेल.

...अन्यथा तलाव फक्त नकाशावर 
सिंचन क्षमता कमी झाल्याने मामा तलाव दोन महिन्यांत रिकामे होतात. शासनाने तलाव ताब्यात घेतले; मात्र देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले. खोलीकरण केले तरच तलावांचे आणि परिसरातील नागरिकांचे भाग्य उजळू शकते. अन्यथा, तालुक्यातील तलाव नकाशावर राहतील, यात शंका नाही. लघुपाटबंधारे उपविभाग साकोलीअंतर्गत साकोली तालुक्यात २४८, लाखांदूर १९० व लाखनी तालुक्यात १२७ मामा तलाव आहेत. यापैकी यंदा गाळ काढून तलाव खोलीकरण करण्यात आलेल्या तलावांची संख्या १५६ आहे. उर्वरित तलावांचे काम कधी होणार, हा प्रश्‍न आहे. शासनाच्या योजनेनुसार तलावातील गाळ काढणे, खोलीकरणाची कामे करणे आवश्यक आहे.

राज्य शासनाच्या दुर्लक्षामुळे मामा तलावांची दुर्दशा होत आहे. साकोली विधानसभेचा आमदार असताना २०१६ ते २०२० या काळात २५० कोटी रुपये खर्चून भंडारा जिल्ह्यातील तलावाचे खोलीकरण केले. परंतु काँग्रेसशासित काळात खोलीकरणाकडे दुर्लक्ष झाल्याने पूर्वजांनी खास करून कोहळी समाजाने केलेल्या मामा तलावाची वाताहात झाली. साकोली तालुक्यातील अर्थकारण मामा तलावांवर अवलंबून आहे. त्यामुळे नियोजनबद्धरीत्या तलावाचे खोलीकरण करण्यात यावे. 
- बाळाभाऊ काशिवार, माजी आमदार, साकोली विधानसभा क्षेत्र


इतर बातम्या
ग्रामबीजोत्पादनासाठी करा ‘महाडीबीटी'’वर...परभणी  ः ‘‘यंदा रब्बी हंगामात जिल्ह्यास...
पीक नुकसान ७२ तासांत विमा कंपनीला कळवासोलापूर ः ‘‘नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांची भरपाई...
थकीत ऊसबिले देऊनच कारखाने सुरू करावेत...सोलापूर ः ‘‘गतवर्षीची थकीत ऊसबिले अद्याप अदा केली...
अनधिकृत कलमांचे उत्पादन घेणाऱ्यांवर...नाशिक : ‘‘मालेगाव उपविभागीय कृषी...
पीककर्जाचे ‘वरातीमागून घोडे’पुणे ः शेतकऱ्यांना खरिपासाठी दिल्या जाणाऱ्या पीक...
शेतकरी पुत्रांचा #सोयाबीन ट्रेंडनांदेड : सोयाबीनचे दर ११ हजारांवरून पाच हजार...
कोकणात पावसाचा जोर कायमपुणे : राज्यात गेले काही दिवस पावसाने हजेरी लावली...
विदर्भ, कोकणात पावसाचा अंदाजपुणे : राज्यात पावसाने दमदार हजेरी लावल्यानंतर...
शेट्टींची कारखान्यांशी सेटलमेंट :...जयसिंगपूर, जि कोल्हापूर : थकीत ‘एफआरपी’वरील पंधरा...
पाऊस सुरूच; ओल्या दुष्काळाचे सावटपरभणी ः राज्यात आठ दिवसांपासून पावसाचे पुनरागमन...
मुंबै बँकेची चौकशी केवळ सुडाने आणि...मुंबई ः मुंबै बँकेच्या विरोधात चौकशी करण्याचा...
सेंद्रिय शेतीतून काळ्या आईचे आरोग्य जपा...नाशिक : रासायनिक शेतीचे परिणाम दिसत असल्याने...
नागपुरात पावणेदोन वर्षातही  कर्जमाफीची...नागपूर : शेतकऱ्यांवरील कर्जाचा डोंगर कमी...
नागपुरात ओला दुष्काळ जाहीर करण्याची...नागपूर : सरकारी नियमानुसार ११० टक्क्यांहून अधिक...
जळगावात ई-पीक नोंदणी प्रक्रियेत अडचणीवावडे, जि. जळगाव : राज्य शासनाने शेतातील पीकपेरा...
हवामान बदलाची दिशा ओळखा : शास्त्रज्ञ...कोल्हापूर : हवामान बदलांचा सर्वाधिक परिणाम बर्फाळ...
नगर : कांदादरात प्रति क्विंटल  दोनशे...नगर : बाजार समित्यांत कांद्याची आवक कमी झालेली...
परभणीत कृषी विद्यापीठाचे रब्बी पिकांचे...परभणी ः वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाने उत्पादित...
मुळा, भंडारदरा,  निळवंडेतून विसर्ग नगर : अकोले तालुक्याच्या पश्चिम भागात दोन...
गोदावरीच्या पाणीपातळीत  वाढ नाशिक : गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्याच्या...