‘मांजरा’ ४२ वर्षांत पंधरा वेळा भरले

लातूर ः लातूर, उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या मांजरा धरणाला ४२ वर्ष झाली आहेत. यात केवळ १५ वेळेसच हे धरण शंभर टक्के भरले आहे.
 ‘Manjra’ in 42 years Filled fifteen times
‘Manjra’ in 42 years Filled fifteen times

लातूर ः लातूर, उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या मांजरा धरणाला ४२ वर्ष झाली आहेत. यात केवळ १५ वेळेसच हे धरण शंभर टक्के भरले आहे. इतर वर्षी मात्र धरणात समाधानकारक पाणीसाठा झालेला नाही. त्यात गाळही मोठ्या प्रमाणात आला आहे. त्यामुळे मृतसाठ्याची क्षमताही कमी झाली आहे.  गेल्या काही वर्षांत तर धरणाच्या पाणलोट ऐवजी खालच्या क्षेत्रातच जास्त पाऊस पडत आहे. याचा परिणाम पिण्याचे पाणी तसेच सिंचनाच्या पाण्यावर होत आहे. धरणातील पाण्याचे योग्य नियोजन करण्याची गरज आहे.

या धरणात १९८० पासून पाणी साठविण्यास सुरवात झाली. नऊ वर्षानंतर म्हणजे १९८८-८९ मध्ये हे धरण पहिल्यांदा शंभर टक्के भरले. ते सलग तीन वर्ष शंभर टक्के भरले होते. त्यानंतर २००५ ते २००७,  २०१० ते २०१२, २०१६ ते २०१८, तसेच गेल्या वर्षी व या वर्षीही हे धऱण शंभर टक्के भरले आहे. त्यानंतरच्या वर्षात धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मात्र फारसा पाऊस झालेला नाही. या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस पडला, तर सलग एक दोन वर्ष चांगला पडतो. अन्यथा कोरडा दुष्काळ राहत आहे. त्यात २००१ ते २००५ ही सलग चार वर्षे तसेच २०१२ ते २०१६ ही सलग चार वर्षे अशी आठ वर्ष व इतर पाच वर्ष या धरणात शून्य टक्के पाणीसाठा राहिला आहे. 

गाळाचा साठ्यावर परिणाम

मांजरा धरणात सुरवातीपासून मृतसाठ्यातील पाणी साठवण क्षमता ७७.३८० दशलक्ष घनमीटर होती. हळूहळू या धरणात गाळ येत गेला. २००१ पासून तर धरणाची मृतसाठ्यातील पाणी साठवण क्षमता ४७.१३० दशलक्ष घनमीटर झाली आहे. म्हणजे ३०.२५० दशलक्ष घनमीटरने मृतसाठ्यातील पाणीसाठवण क्षमता कमी झाली आहे. 

धरणाची माहिती

प्रकल्पीय पाणीसाठा २२४.०९३ दशलक्ष घनमीटर
उपयुक्त पाणीसाठा १७६.९६३ दशलक्ष घनमीटर
मृत पाणीसाठा ४७.१३० दशलक्ष घनमीटर
सिंचन क्षेत्र १८ हजार २२३ हेक्टर
उजवा कालवा ७६ किलोमीटर
डावा कालवा ९० किलोमीटर
पाणी पुरवठा योजनांची संख्या १६
पिण्यासाठी आरक्षित पाणी ६१.९३ दशलक्ष घनमीटर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com