Agriculture news in marathi ‘Nasaka’ to begin with Process postponed | Page 2 ||| Agrowon

‘नासाका’ सुरू होण्याची प्रक्रिया पुढे ढकलली

टीम अॅग्रोवन
रविवार, 26 सप्टेंबर 2021

नाशिक रस्ता : नाशिक सहकारी साखर कारखाना सुरू करण्यासाठी सहकारमंत्र्यांनी बैठक बोलविली. टेंडरमधील काही अटी-शर्तींची पूर्तता करण्यासाठी फेरनिविदा काढण्याचे आदेश या वेळी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिले.

नाशिक रस्ता : नाशिक सहकारी साखर कारखाना सुरू करण्यासाठी सहकारमंत्र्यांनी बैठक बोलविली. टेंडरमधील काही अटी-शर्तींची पूर्तता करण्यासाठी फेरनिविदा काढण्याचे आदेश या वेळी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिले. त्यामुळे कारखाना सुरू होण्याची प्रक्रिया काही काळ पुढे ढकलली गेली आहे. शासनाच्या निर्णयामुळे शेतकरी, सभासद व कामगारांमध्ये नाराजी पसरली आहे.

नाशिक, सिन्नर, इगतपुरी व त्र्यंबकेश्वर या चार तालुक्यांचे कार्यक्षेत्र असलेला नाशिक कारखाना सुरू करण्यासाठी आमदार सरोज आहिरे, खासदार हेमंत गोडसे यांनी  पाठपुरावा केला. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सहकारमंत्र्यांना नासाका सुरू करण्याबाबत निर्णय घेणे गरजेचे असल्याचे सांगितले. त्यानुसार तीन वेळा शासकीय बैठका झाल्या.

मागील बैठकीत मंत्र्यांनी आदेश दिल्यानुसार, जिल्हा बँकेने ऑनलाइन भाडेतत्त्वाची टेंडर प्रक्रिया राबवली. त्यात लक्ष्मी इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीने निविदासह डिपॉझिटची रक्कम जमा केली होती. या टेंडरवर निर्णय घेण्यासाठी गुरुवारी (ता.२३) पाटील यांच्या दालनात बैठक झाली. हेमंत गोडसे, सरोज आहिरे, देविदास पिंगळे, दिलीपराव बनकर, जिल्हा बँकेचे प्रशासक अरिफ मोहम्मद, प्रादेशिक सहसंचालक मिलिंद भालेराव, जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश पिंगळे, प्राधिकृत अधिकारी दीपक पाटील, मतीन बेग, कारखान्याचे अवसायक रतन जाधव, शहाजीराजे भोसले, दीपक चांदे, तानाजी गायधनी, विष्णुपंत गायखे, शिवराम गायधनी, नामदेव बोराडे, भाऊसाहेब ढिकले, अंबादास ढिकले आदी उपस्थित होते. साखर आयुक्त शेखर गायकवाड हे ऑनलाइन सहभागी झाले.

सकारात्मक निर्णय होईल, अशी अपेक्षा सभासदांकडून व्यक्त केली. ही प्रक्रिया तांत्रिक कारणांअभावी पुढे ढकलली गेल्याने शेतकरी व कामगारांमध्ये निराशेचे वातावरण निर्माण आहे.

शेतकरी, व सभासदांच्या हिताला प्राधान्य देण्याचा आपला प्रयत्न आहे. गळीत हंगाम सुरू करण्यासाठी कालावधी थोडा राहिला आहे. फेरनिविदा काढण्याचा निर्णय हंगाम घेण्यासाठी घातक ठरू शकतो. कारखाना सुरू होणे ही चार तालुक्यांतील शेतकरी, सभासदांची इच्छा आहे. 


इतर बातम्या
जालन्यात ३९९५ खातेदारांचे आधार...जालना : जिल्ह्यात कर्जमाफी योजनेअंतर्गत एकूण १...
जळगाव जिल्ह्यात फळपीक विमा योजनेतून...जळगाव  : पंतप्रधान पीकविमा योजनेंतर्गत...
कोल्हापूर :महावितरणच्या थकबाकीमुक्तीत ...कोल्हापूर : कृषिपंपाच्या वीजबिलातून थकबाकीमुक्त...
नाशिक : शेतकरी सोसायटीकडून सभासदांना १५...नाशिक : निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत परिसरात...
कृषिपंप वीजबिलांच्या थकबाकीमुक्तीत...सोलापूर ः कृषिपंपाच्या वीजबिलातून थकबाकीमुक्त...
कृषी विकासाचे भगीरथ ठरलेल्या...पुणे : कष्टकरी शेतकऱ्यांच्या मनगटाला बारा...
राज्यात ‘ऑक्टोबर हीट’चा प्रभावपुणे : राज्याच्या तापमानात चढ-उतार सुरूच आहेत....
‘दूधगंगा वेदगंगा’ एकरकमी ३०५६ रुपये...कोल्हापूर : ‘‘बिद्री (ता. कागल) येथील श्री...
वऱ्हाडात सोयाबीनची बाजारात हजारो...अकोला ः वऱ्हाडातील सर्वच बाजार समित्यांमध्ये...
भाजपतर्फे एक नोव्हेंबरला काळ्या फिती...परभणी : मराठवाडा, विदर्भातील अतिवृष्टिग्रस्त...
नाशिक :कांदा व्यापाऱ्यांवर आयकर...नाशिक : जिल्ह्यात कांदा विक्रीसाठी आघाडीवर...
उसाच्या तोडणीला कोल्हापुरात सुरुवातकोल्हापूर: जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा गळीत...
गुजरातमधून गुळाला मागणी वाढलीकोल्हापूर : यंदा गुजरातमधून गुळाला मागणी वाढत आहे...
नांदेडमध्ये ‘रयत क्रांती’कडून शासन...नांदेड : रयत क्रांती संघटनेच्या वतीने आमदार...
अनिश्‍चित काळासाठी रस्ते अडविता येणार...नवी दिल्ली ः आंदोलन करण्याचा शेतकऱ्यांना अधिकार...
हिरापुरात कापसाची पाण्यातच वेचणीपारोळा, जि. जळगाव : खरीप हंगामाच्या वेळी पावसाने...
मालेगाव तालुक्यात ऊस जळून खाककळवाडी, ता. मालेगाव : तालुक्यातील नरडाणे...
पुणे जिल्ह्यात रब्बीचे अडीच लाख हेक्टर...पुणे  ः ‘‘सध्या रब्बी हंगाम सुरू झाला आहे....
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी...वाशीम : जिल्ह्यात २६ व २७ सप्टेंबर आणि २ व १७...
नांदेड जिल्ह्यात पीकविमा भरपाईची...नांदेड : अतिवृष्टीमुळे पूरस्थिती उद्‌भवून सहा लाख...