agriculture news in marathi ‘Nashik Division first In the e-change system' | Agrowon

‘ई-फेरफार प्रणालीत नाशिक विभागाची बाजी’

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 4 मार्च 2021

नाशिक : महसूल विभागाच्या ई-फेरफार प्रणालीत प्रलंबित अनोंदणीकृत व नोंदणीकृत फेरफारांची प्रलंबितता कमी करण्याबाबत नाशिक विभागात उल्लेखनीय कामकाज झाले आहे. 

नाशिक : ‘‘महसूल विभागाच्या ई-फेरफार प्रणालीत प्रलंबित अनोंदणीकृत व नोंदणीकृत फेरफारांची प्रलंबितता कमी करण्याबाबत नाशिक विभागात उल्लेखनीय कामकाज झाले आहे. विभागातील नंदुरबार, नगर, जळगाव, धुळे व नाशिक हे जिल्हे अनुक्रमे एक ते पाच स्थानी आहेत. नंदुरबार हा आदिवासी बहुल जिल्हा राज्यात प्रथम स्थानावर आहे’’, अशी माहिती विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिली.

गमे म्हणाले, ‘‘ई-फेरफार प्रणालीच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत विभागातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांच्या वेळोवेळी बैठका घेऊन त्यांचे अधिनस्त अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. नाशिक विभागातील सर्व तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांनी अथक मेहनत घेऊन राज्यात ई-फेरफार प्रणालीमधील प्रलंबित फेरफारांची प्रलंबितता कमी करून विभागातील जनतेला दिलासा देणारे कामकाज केले.’’  

‘‘महसूल विभागाच्या ई फेरफार प्रकल्पातील सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी सामान्य नागरिकाला सोपे जावे म्हणून महाभूमी हे https://mahabhumi.gov.in संकेतस्थळ आहे. या आधारे कोणालाही महसूल विभागाच्या सर्व सशुल्क आणि निःशुल्क सेवांचा लाभ घेता येईल,’’ असे गमे यांनी सांगितले.

दृष्टिक्षेपात कामगिरी 

राज्यातील स्थान  जिल्हा तालुका संख्या प्रमाणित नोंदी कामाची टक्केवारी
 नंदुरबार   ६  १,३३,०२६ ९७.९७ 
नगर  १४ १०,३२,७३७ ९७.८१
जळगाव १५ ६,७२,८२२ ९७.८०
धुळे २,६२,१६१  ९७.७६
नाशिक १५ ६,३१,९३४  ९७.५९

 


इतर ताज्या घडामोडी
पूर्व भारताच्या विकासावर भर ः पंतप्रधान...नवी दिल्ली ः देशाचा पूर्व भाग नेतृत्व करत होता,...
विधानसभा पोटनिवडणुकीसाठी पंढरपुरात...सोलापूर : पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत मतदारांना...
बाजारात गर्दी नियंत्रणासाठी नियमांची...नाशिक : कोरोना संसर्ग वाढत असल्याने जिल्ह्यातील...
नेरूर येथे नारळ बागेला आगसिंधुदुर्गनगरी ः जिल्ह्यातील नेरूर कर्याद नारूर (...
जळगावात बीटी कापसाच्या २५ लाख पाकिटांची...जळगाव :  राज्यात कापूस लागवडीत आघाडीवर...
दर्यापूर बाजार समितीत सोयाबीनला सात...अमरावती : सोयाबीन दरातील तेजीची घौडादौड कायम असून...
मंत्रिमंडळात विदर्भाचे वजन घटलेनागपूर : गृहमंत्री अनिल देशमुख आणि वनमंत्री संजय...
नाविन्यपूर्ण प्रयोग करणारे शेतकरी कृषी...कोल्हापूर : जिल्ह्यात सोयाबीनच्या...
 खानदेशात कांद्याची आवक वाढतच दर दबावातजळगाव :  खानदेशात गेल्या आठवड्यात लाल...
अकोला जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना...अकोला : एकीकडे केंद्र, राज्य शासन लाभार्थ्यांच्या...
दर वाढले म्हणून शेतकऱ्यांनी सोयाबीन...परभणी : दर वाढले म्हणून बियाण्यासाठी राखून...
शेतकरी नियोजन पीक ः डाळिंबसध्या बाग ताणावर सोडली आहे. मळद येथील ६० एकर...
महिला शेतकऱ्यांसाठी उत्पादक कंपनीगावपातळीवरील १० शेतकरी महिला किंवा महिला शेतकरी...
सोलापुरात वाढत्या उन्हामुळे शुकशुकाटसोलापूर ः सोलापूर शहर जिल्हयात सध्या उष्ष्णतेची...
काबुली हरभऱ्याचे दर खानदेशात टिकूनजळगाव :  खानदेशात काबुली हरभऱ्याचे दर यंदा...
पणन संचालनालयाच्या सूचनांची काटेकोरपणे... नाशिक : पणन संचालनालयाने परिपत्रक काढून सलग तीन...
जलसाठा घटू लागला; ‘गिरणा’ ४७ टक्क्यांवरजळगाव : खानदेशात गेल्या काही दिवसांमध्ये रब्बी,...
कृषी सल्ला :आंबा, काजू, नारळ, वाल,...खरीप हंगामाच्या पिक लागवडीसाठी पूर्वतयारी म्हणून...
नाशिक : गोठेधारकांना परवाना नूतनीकरण...नाशिक : शासनाने ३१ ऑक्टोबर २००३ च्या...
वनशेतीसाठी उपयुक्त शिवणशिवण लाकडाचा उपयोग इंधन, फर्निचर, लॅमिनेटेड बोर्ड...