Agriculture news in marathi For ‘One Village, One Variety’ Selection of nine villages in the fountain | Page 2 ||| Agrowon

‘एक गाव, एक वाण’साठी कारंजातील नऊ गावांची निवड

टीम अॅग्रोवन
रविवार, 20 जून 2021

राज्य शासनाच्या बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय ग्रामीण परिवर्तन प्रकल्पातंर्गत राबविण्यात येत असलेल्या स्मार्ट कॉटन या उपप्रकल्पासाठी जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील ९ गावे निवडण्यात आली आहेत. 

वाशीम : राज्य शासनाच्या बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय ग्रामीण परिवर्तन प्रकल्पातंर्गत राबविण्यात येत असलेल्या स्मार्ट कॉटन या उपप्रकल्पासाठी जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील ९ गावे निवडण्यात आली आहेत.  या ९ गावांमध्ये ‘एक गाव, एक वाण’ या संकल्पनेवर भर देत कापूस उत्पादन केले जाणार आहे.

कारंजा तालुक्यातील वाई, वढवी, पोहा, जानोरी, पानगव्हाण, गायवळ, सोहळ, भडशिवणी व महागाव या ९ गावांची निवड स्मार्ट कॉटन या उपप्रकल्पासाठी करण्यात आली आहे. या गावांमध्ये कापसाच्या उत्पादनासाठी महाकॉट, तिरुमला जिनिंग, कारंजा यांची मदत घेतली जात आहे. ‘एक गाव, एक वाण’ ही संकल्पना अंमलात आणण्यासाठी प्रशिक्षण दिले जात आहे. त्यासाठी पीक प्रात्याक्षिके, शेतीशाळा यासह अन्य उपक्रम राबविले जात आहेत. बियाण्यांच्या निवडीपासून तर पिकाची मशागत, किडींचे नियंत्रण, कापसाची वेचणी यासह अन्य महत्त्वाच्या बाबींवर शेतकऱ्यांना कृषी विद्यापीठाचे अधिकारी, कृषी पर्यवेक्षक व कृषी सहाय्यक मार्गदर्शन करीत आहेत.

भडशिवणी येथे ‘स्मार्ट कॉटन’ प्रकल्पांतर्गत आयोजित कार्यशाळेत बोलताना मंडळ कृषी अधिकारी संतोष चौधरी यांनी सांगितले की, कापूस मूल्य साखळी अधिक कार्यक्षम, सर्वसमावेशक व स्पर्धाक्षम करण्यासाठी ‘स्मार्ट कॉटन’ प्रकल्प राबविला जात आहे. तसेच रुई आधारित बाजारव्यवस्थेत शेतकऱ्यांचा सहभाग वाढवून उत्पादित कापसाला योग्य मोबदला मिळवून देणे व कापसाचा स्मार्ट कॉटन ब्रँड विकसित करणे, हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे. 
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच वर्षा अंबाळकर होत्या. यावेळी उपसरपंच रवींद्र लाहे, प्रगतशील शेतकरी रुपेश लाहे, विष्णू लाहे व गावातील कापूस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.


इतर ताज्या घडामोडी
राज्यात सरासरीच्या २४ टक्के अधिक पाऊसपुणे ः जुलैमध्ये झालेल्या अतिवृष्टीसदृश्य...
शेकापचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार...सोलापूर : शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते,...
अकोला झेडपीची सभा ऑनलाइन, तरीही नाश्‍...अकोला ः कोरोनामुळे बहुतांश सभा, बैठका ऑनलाइन होत...
खासगी पदविकाधारक, पशुधन पर्यवेक्षकांचे...मंचर, जि. पुणे : पशुसंवर्धन विभागातील खासगी...
सांगलीत अतिवृष्टीचा १८१ गावांना फटकासांगली : जिल्ह्यात गेल्या आठवड्यात झालेली...
पूरग्रस्तांना ठाकरे सरकारने तातडीने मदत...कोल्हापूर : सध्याची पूरस्थिती बिकट आहे,...
नगरमधील शेतकऱ्यांना मिळणार साडेेआठ...नगर : नगर जिल्ह्यामध्ये गेल्या वर्षी खरिपात...
ठाकरे, फडणवीस समोरासमोरकोल्हापूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी...
शिरोळमध्ये मुख्यमंत्र्यांचा फक्त पाच...शिरोळ, जि. कोल्हापूर : पूरस्थितीचा जिल्ह्यात...
पंढरपूरला जिल्हा करावासोलापूर ः गेल्या अनेक दिवसांपासून मागणी होत...
जल, मृद्‍संधारण कामांवर भर द्यावा ः एस...बुलडाणा : गावाची समृद्धी माती आणि पाणी यावरच...
खासगीकरणाविरोधात वीज कामगारांचा...नागपूर ः वीज उद्योगाच्या खासगीकरणाच्या...
युरियाची विषबाधा टाळण्यासाठी काळजी...युरियाची विषबाधा ही सर्व पाळीव प्राण्यांमध्ये...
जळगाव जिल्ह्यात ५७ टक्के पाऊसजळगाव : जिल्ह्यात आतापर्यंत ५७ टक्के पाऊस झाला...
शनिवारपर्यंत सुरू राहणार मका, ज्वारीची...औरंगाबाद : राज्यात रब्बीतील मका व ज्वारी खरेदीला...
परभणी जिल्ह्यात पीकविमा तक्रारींचा...परभणी ः पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गंत टोल फ्री...
नाशिक जिल्ह्यात धरणसाठा ४६ टक्क्यांवरनाशिक : गत सप्ताहात जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट...
सोलापूर ःविमा कंपनी शेतकऱ्यांपर्यंत...सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात पीकविम्यासाठी भारती...
अकोला ः नैसर्गिक आपत्तीनंतर पीकविमा...अकोला ः पीकविमा हा आपत्तीच्या काळात शेतकऱ्यांना...
मंगळवेढ्यात सूर्यफूल पीकविम्यातून वगळलेमंगळवेढा, जि. सोलापूर ः मंगळवेढा तालुक्यात...