agriculture news in marathi For ‘Ootur, Sribhuvan’ Provision of nine crores | Agrowon

‘ओतूर, श्रीभुवन’साठी नऊ कोटींची तरतूद

टीम अॅग्रोवन
रविवार, 14 मार्च 2021

नाशिक : राज्य अर्थसंकल्पात कळवण तालुक्यातील ओतूर लघुपाटबंधारे प्रकल्पासाठी ४ कोटी व  सुरगाणा मतदारसंघात श्रीभुवन लघुपाटबंधारे प्रकल्पासाठी ५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली, अशी माहिती आमदार नितीन पवार यांनी दिली.

नाशिक : राज्याच्या नुकत्याच सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात कळवण तालुक्यातील ओतूर लघुपाटबंधारे प्रकल्पासाठी ४ कोटी व  सुरगाणा मतदारसंघात श्रीभुवन लघुपाटबंधारे प्रकल्पासाठी ५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली, अशी माहिती आमदार नितीन पवार यांनी दिली.

तब्बल ४० वर्षानंतर ओतूर धरणाचा प्रश्न मार्गी लागणार आहे.  प्रकल्पांच्या विकासकामांना गती मिळणार असल्यामुळे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कळवण व सुरगाणा तालुक्यातील विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही पवार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाला दिली होती. त्यानुसार तालुक्यातील सप्तश्रुंगी गडावरील पाणी टंचाई, ओतूर व श्रीभुवन प्रकल्पासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतुदीची घोषणा केली.  

असे आहे कामाचे स्वरूप

ओतूर धरणाचा जुना सांडवा तोडून नव्याने काँक्रिटमध्ये सांडवा बांधण्यात येईल. नवीन धरणासाठी जुन्या धरणाचे मटेरिअल न वापरता नवीन गुणवत्तेचे साधन- साहित्य वापरण्यात येईल. नवीन ओतूर धरण पूर्ण लांबीत नव्याने करण्यात येणार आहे. त्यासाठी ३९ कोटी २८ लाख रुपयांची सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली. ओतूर धरणातील अवैशिष्ट कामे, शिल्लक कामे, विशेष दुरुस्ती अंतर्गत अर्थसंकल्पात विशेष दुरुस्तीसाठी ४ कोटी रुपयांची ठोक तरतूद करण्यात आली.

श्रीभुवन प्रकल्प नवीन असून प्रकल्पाची किंमत ३३ कोटी रुपये आहे. अर्थसंकल्पात ५ कोटी रुपयांची तरतूद करून प्रकल्पाच्या कामास गती मिळेल. या प्रकल्पामुळे २.४० दशलक्ष घनफूट पाणीसाठा होईल. २२६ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.


इतर ताज्या घडामोडी
पशुवैद्यक करणार घरपोच सेवा बंदनागपूर : पशुवैद्यकांना फ्रंटलाइन वर्कर्स व कोरोना...
सोयाबीन बियाणे निर्बंध मध्य प्रदेशकडून...पुणे ः परराज्यांत सोयाबीन बियाणे विक्रीवर निर्बंध...
‘महाबीज’चे सोयाबीन बियाणे दर ‘जैसे थे’अकोला : खरीप हंगामासाठी ‘महाबीज’ने सोयाबीन...
देशाच्या तुलनेत निम्मी साखर एकट्या...कोल्हापूर : देशाच्या साखरनिर्यात कोट्यापैकी जवळ...
‘गोकुळ’चा कल सत्तांतराकडेकोल्हापूर : अत्यंत चुरशीने झालेल्या कोल्हापूर...
‘सह्याद्री’च्या पर्वतरांगेमधून...नाशिक : सह्याद्रीच्या पर्वतरांगेत पश्‍चिम घाट...
राज्यात आंब्याचा हंगाम ऐन बहरातअकोल्यात बदाम आंबा ४००० ते ४५०० रुपये क्विंटल...
सोशल मीडियाद्वारे ६५ टन कलिंगड विक्रीपुणे : कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी एप्रिल...
मध्य प्रदेश सरकारकडून बियाणे विक्रीवर...पुणे ः सोयाबीन बीजोत्पादनात देशात सर्वात मोठा...
पशुखाद्य निर्मितीचा कच्चा माल दुपटीने...सांगली : पशुखाद्य तयार करण्यासाठी लागणाऱ्या...
दक्षिण भागात गारपिटीची शक्यतापुणे :  गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा चटका...
परभणी जिल्ह्यात कडक निर्बंध लागूपरभणी ः  कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी...
परभणी जिल्ह्यात लघु तलावांत सरासरी १९...परभणी ः वाढते तापमान, बाष्पीभवनाचा वाढलेला वेग,...
नाशिक जिल्ह्यात बाजार समित्यांमध्ये...नाशिक : पणन विभागाच्या परिपत्रकात सलग ३...
नाशिक : 'ऑक्सिजन एक्स्प्रेस'द्वारे २७....नाशिक : ‘‘जिल्ह्यातील प्राणवायूची तूट भरून...
सांगलीत केळीच्या क्षेत्रात घट होण्याची...सांगली ः जिल्ह्यात गेल्या दोन वर्षात झालेल्या...
रत्नागिरीत ३७ टन काजू बी तारणरत्नागिरी ः काजूचे बाजारातील दर घसरल्यानंतर...
आदिवासी विकास मंडळ करणार गव्हाची खरेदीयवतमाळ : आदिवासी विकास महामंडळाकडून राज्यात...
परभणीत सोयाबीनचे दीड हजार क्विंटल...परभणी ः परभणी तालुक्यात यंदा ११० हेक्टरवर उन्हाळी...
भुईमुगाचे वाण निकृष्ट, कंपन्यांवर...यवतमाळ : जिल्ह्यात भुईमुगाच्या शेंगा न धरण्याचे...