नगर ः कोरोना व्हायरस संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात चिकन, अंड्याला मागणी वाढली आहे.
ताज्या घडामोडी
‘पणन’ची कापूस खरेदीला मुदतवाढ
राज्यात २८ फेब्रुवारी पासून कापूस खरेदी बंद करण्याचा निर्णय पणन महासंघाने घेतला होता. पूर्वीचा हा निर्णय फिरवीत आता बुधवार (ता. १०) पर्यंत खरेदी सुरू ठेवण्याचा निर्णय महासंघाने घेतला आहे.
नागपूर : राज्यात २८ फेब्रुवारी पासून कापूस खरेदी बंद करण्याचा निर्णय पणन महासंघाने घेतला होता. पूर्वीचा हा निर्णय फिरवीत आता बुधवार (ता. १०) पर्यंत खरेदी सुरू ठेवण्याचा निर्णय महासंघाने घेतला आहे. महासंघाच्या या निर्णयामुळे कापूस उत्पादकांना काही अंशी दिलासा मिळाला आहे.
महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाकडून राज्यात सीसीआय करिता कापूस खरेदी करण्यात आली. केंद्र सरकारने या वर्षी कापसाला पाच हजार आठशे पंचवीस रुपये हमीभाव जाहीर केला आहे. मात्र संततधार पाऊस, बोंडअळीचा प्रादुर्भाव बोंडसड या कारणांमुळे कापसाची उत्पादकता प्रभावित झाली. देशाअंतर्गत प्रक्रिया उद्योगांना देखील कापसाची उपलब्धता करताना अडचणी येत होत्या. त्यामुळे मागणी वाढली आणि दरात तेजी आली. हमीभावापेक्षा चारशे ते पाचशे रुपये आधीचा दर खुल्या बाजारात कापसाला मिळू लागला. त्यामुळे खरेदी केंद्रावरची गर्दी ओसरली.
महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाकडून ५६ केंद्र व १६४ फॅक्टरीच्या माध्यमातून राज्यात कापूस खरेदी होती. मात्र, अलीकडच्या काळात केंद्रावर एक क्विंटल देखील कापसाची आवक होत नव्हती. त्यामुळे केंद्रावरील मनुष्यबळ व इतर बाबींवर नाहक खर्च होत असल्याने पणन महासंघाने २८ फेब्रुवारी पासून कापूस खरेदी बंद करण्याचा निर्णय घेतला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचालक मंडळाची बैठक या संदर्भाने घेणे शक्य नव्हते. त्यामुळे सर्कुलेटींग नोटीस या विषयावर काढण्यात आली. २८ फेब्रुवारी पासून खरेदी बंद करण्यावर एकमत झाले असताना बुधवार (ता. १०) पर्यंत खरेदी सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
हे आहेत झोन
अकोला, अमरावती, औरंगाबाद , जळगाव, खामगाव, नागपूर, नांदेड, परळी वैजनाथ, वनी, यवतमाळ, परभणी हे ११ झोन असून या झोनमध्ये प्रत्येकी एक केंद्र याप्रमाणे अकरा खरेदी केंद्र दहा मार्चपर्यंत सुरू राहतील.