Agriculture news in marathi ‘Pandekrivi’ should postpone the convocation ceremony | Agrowon

‘पंदेकृवि’ने दीक्षान्त सोहळा पुढे ढकलावा : कार्यकारी परिषद सदस्य

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 22 एप्रिल 2021

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने नियोजित केलेला ३० एप्रिलचा दीक्षान्त सोहळा कोविड १९ च्या आपात्‍कालीन परिस्थितीत पुढे ढकलण्यात यावा, अशी मागणी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषद सदस्यांनीही आता केली आहे.

अकोला ः डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने नियोजित केलेला ३० एप्रिलचा दीक्षान्त सोहळा कोविड १९ च्या आपात्‍कालीन परिस्थितीत पुढे ढकलण्यात यावा, अशी मागणी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषद सदस्यांनीही आता केली आहे. याबाबत सदस्य विनायक सरनाईक यांनी कुलगुरू तसेच कुलसचिवांना तातडीने ई-मेल पाठवीत वस्तुस्थिती निदर्शनात आणून देण्याचा प्रयत्न केला. 

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा दीक्षान्त सोहळा आॅनलाइन पद्धतीने ३० एप्रिलला होऊ घातला आहे. याला काही विद्यार्थी संघटनांनी विरोध दर्शविल्याने कार्यक्रम होण्यापूर्वीच चर्चेत आलेला आहे. आता या विद्यापीठाचे कार्यकारी परिषद सदस्य सरनाईक यांनीही पुढाकार घेत रद्द करण्याची मागणी केली. 

याबाबत त्यांनी म्हटले, की शासनाचे आदेश, संदर्भीय पत्रांनुसार सध्याच्या स्थितीत कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने विद्यापीठातील कर्मचारी व विद्यार्थ्यांच्या जीवन सुरक्षेच्या दृष्टीने ३० एप्रिलला आयोजित दीक्षान्त समारंभ पुढे ढकलण्यात यावा. राज्यात आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांच्या वार्षिक परीक्षा, नागपूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाचा दीक्षान्त समारंभ पुढे ढकलण्यात आला. दहावीची परीक्षा रद्द तर बारावीची पुढे ढकलली. दीक्षान्त समारंभ हा विद्यार्थ्यांच्या जीवनातील अतिशय महत्त्वाचा प्रसंग असताना आणि या आयोजनास विद्यार्थ्यांचा विरोध असताना कृषी विद्यापीठाचे प्रशासन अट्टहास का करीत आहे. दरवर्धी दीक्षान्त सोहळ्याची तारीख ५ फेब्रुवारी राहते. त्या वेळी परीस्थिती अनुकूल असताना हा कार्यक्रम का घेतला नाही, असाही प्रश्‍न उपस्थित होत आहे. 

दीक्षान्त समारंभासाठी फी वसूल करून दीक्षान्त समारंभ आयोजित केला जातो. समारंभात मुख्यत्वे खर्च हा देखावा व अतिथींचा बडेजाव, खानपानावर होत असतो. सध्या शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती बिकट असून, विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी नाहीत. त्यामुळे दीक्षान्त समारंभाची फी (एक हजार) ही माफ करावी. कोणताही बडेजाव न करता दीक्षान्त समारंभ विद्यार्थ्यांच्या मागणीप्रमाणे अत्यंत साध्या पद्धतीने कोरोना परिस्थिती निवळल्यानंतर आयोजित करावा, अशी सूचनाही सरनाईक यांनी केली आहे.


इतर बातम्या
पश्‍चिम महाराष्ट्रात ढगाळ वातावरण पुणे : अरबी समुद्रात तयार झालेल्या ताऊते या...
रासायनिक खतांच्या किमतीत मोठी वाढ पुणे ः केंद्र सरकारने रासायनिक खतांची दरवाढ...
लॉकडाउमुळे बेदाणा उत्पादकांची कोंडी सांगली ः जिल्ह्यातील तासगाव आणि सांगली बाजार...
नामपूर बाजार समितीत कांद्याला किमान दर...नाशिक : सोमवारी (ता. १०) सटाणा तालुक्यातील नामपूर...
खरिपात यंदा कपाशी, रब्बीत गहू चांगले...भेंडवळ, जि. बुलडाणा ः या हंगामात सर्वसाधारण...
विमा कंपन्यांनी गोळा केले २३ हजार कोटी...पुणे ः नैसर्गिक आपत्तीपासून शेतकऱ्यांना आधार...
औरंगाबाद जिल्ह्यात पावणेसात लाख...औरंगाबाद : येत्या खरीप हंगामात जिल्ह्यात ६ लाख ८१...
महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलसचिव...नगर : कामात अनियमिततेच्या कारणाने महात्मा फुले...
खतांच्या किमती कमी करून केंद्राने...बारामती, जि. पुणे : केंद्र सरकारने खताच्या...
मंगळवेढ्याच्या वाट्याला अखेर ‘म्हैसाळ’...सोलापूर ः मंगळवेढ्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या...
‘वॅक्सिन ऑन कॉल’ पद्धती जिल्हाभर राबवा...सोलापूर ः ‘‘जिल्ह्याला कोविड लस, रेमडेसिव्हिर...
निर्यात केंद्रामुळे कृषी व्यापाराला...पुणे ः मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड...
नांदेड जिल्ह्यात कोरोनाच्या विळख्याने...नांदेड : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने ग्रामीण भागाला...
मोदींना पत्र लिहिण्याचे धाडस...मुंबई : कोरोनाला गांभीर्याने न घेतल्यानेच कोरोना...
शिरपूर बाजार समिती दिवसाआड कार्यरत...जळगाव ः  खानदेशात शिरपूर (जि. धुळे), जळगाव...
उस्मानाबाद जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह...तुरोरी, जि. उस्मानाबाद : सीमावर्ती भागातील दगड...
लातूरच्या सिंचन प्रकल्पांच्या कामांना...मुंबई : मांजरा, रेणा आणि तावरजा प्रकल्पांतर्गत...
‘तौत्के’ चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर...नाशिक : ‘‘प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई...
आमदारांच्या दारात हलग्या वाजविणारसोलापूर ः उजनी धरणातून इंदापूरला पाच टीएमसी पाणी...
निविष्ठा खरेदीत गैरप्रकार झाल्यास भरारी...अमरावती : निविष्ठा खरेदीत शेतकऱ्यांची फसवणूक...