agriculture news in marathi Of ‘Parbhani Shakti’ of Jowari Must be used in diet ' | Page 2 ||| Agrowon

‘ज्वारीच्या ‘परभणी शक्ती’चा आहारात उपयोग आवश्यक’

टीम अॅग्रोवन
शनिवार, 27 मार्च 2021

अंबाजोगाई : विद्यापीठाकडून विकसित परभणी शक्ती या वाणात लोह व जस्त या घटकांचे प्रमाण इतर वाणाच्या तुलनेत अधिक आहे. यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

अंबाजोगाई : ‘‘विद्यापीठाकडून विकसित परभणी शक्ती या वाणात लोह व जस्त या घटकांचे प्रमाण इतर वाणाच्या तुलनेत अधिक आहे. यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. कोरोना काळात याचा मानवी शरीराला फायदा होऊ शकतो. परभणी शक्ती वाणाच्या नियमित सेवनाने पोषण सुरक्षा साध्य करण्यास मदत होणार आहे,’’ असे मत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे संचालक संशोधन डॉ. दत्तप्रसाद वासकर यांनी व्यक्त केले.

अंबाजोगाई कृषी विज्ञान केंद्राने ज्वार संशोधन केंद्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी अंतर्गत ज्वारीच्या विविध वाणांचे प्रथमदर्शनी प्रात्यक्षिके आयोजित केली आहेत. यात परभणी शक्ती या वाणाची प्रात्यक्षिके घेण्यात आली. जवळबन, (ता. केज) येथे संदीप करपे याच्या शेतातील प्रक्षेत्रास डॉ. वासकर आणि संशोधन उपसंचालक डॉ. अशोक जाधव यांनी भेट दिली. शास्त्रज्ञ कृष्ण कर्डिले, डॉ. रवींद्र कोरके, अक्रम शेख, राजा दहिभाते, शेतकरी उपस्थित होते. 

भेटी दरम्यान पिकाची पाहणी करण्यात आली. शेतकऱ्यांशी चर्चा करून त्यांचे अभिमत घेण्यात आले. डॉ. वासकर यांनी ज्वारीचा दैनंदिन आहारात उपयोग व्हावा, यासाठी त्याचे मार्केटिंग करण्याबाबत, परभणी शक्ती या वाणाचे गुणवैशिष्टे शेतकऱ्यांमध्ये प्रसारित करण्याबाबत मार्गदर्शन केले. परभणी येथील ज्वार संशोधन केंद्राचे डॉ. कांबळे यांचेही सहकार्य लाभले.
 


इतर ताज्या घडामोडी
अकोल्यात ५५ हजार हेक्टरला तडाखाअकोला ः गेल्या आठवड्यात जिल्ह्यात ५२ पैकी ३५...
रत्नागिरीत हजार हेक्टर भातक्षेत्र...रत्नागिरी : अतिवृष्टीमुळे मोठ्या नद्यांना आलेल्या...
सांगलीत ३३ हजार हेक्टर पिकांचे नुकसानसांगली : जिल्ह्यात गेल्या चार-पाच दिवसांपासून...
खानदेशात पंधरा हजार हेक्टर बाजरीची...जळगाव : खानदेशात यंदा पाऊस लांबल्याने आणि...
नाशिक बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांचे...नाशिक : नाशिक बाजार समितीसंदर्भात शासनाकडे...
खानदेशात हलक्या सरी; जोरदार पावसाचा अभावजळगाव : खानदेशात यंदा पाऊसमान अद्याप कमी आहे....
नांदेड जिल्ह्यात पीकविमा योजनेत नऊ लाख...नांदेड : पंतप्रधान पीक विमा योजनेत शेतकऱ्यांनी...
मराठवाड्यातील पशुविज्ञान केंद्राचे घोडे...परभणी ः भारतीय कृषी संशोधन परिषदेने महाराष्ट्र...
परभणी जिल्ह्यात भाजीपाला पिकांची नासाडीपरभणी ः अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेकडो एकरवरील...
पैसे थकवणाऱ्या व्यापाऱ्यांचे लिलाव बंद...सोलापूर ः शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या पट्ट्या...
पुण्यात लाख हेक्टरवर खरिपाच्या पेरण्या पुणे : जिल्ह्यात जुलै महिन्याच्या तिसऱ्या...
पीकविम्यासाठी स्वाभिमानीचा कृषी...पुणे : पीकविमा योजनेतील गेल्या खरिपाची नुकसान...
नगरमध्ये खरीप पेरण्यांनी सरासरी ओलांडली नगर : नगर जिल्ह्यात खरिपाच्या पेरण्यांनी सरासरी...
`लातूरला शेतकऱ्यांनी भरला २३ कोटीचा...लातूर : ‘‘पंतप्रधान खरीप पीक विमा २०२१...
नियमित कर्जदार शेतकऱ्यांना  मिळणार...गोंदिया : राज्य सरकारने नियमित कर्ज परतफेड...
सातारा : पाच हजार हेक्टर क्षेत्र ...सातारा : जिल्ह्यात मागील आठवड्यात झालेल्या...
सांगलीतील पूर ओसरू लागला  सांगली : कृष्णा नदीला आलेल्या महापुराचा सांगली...
सिंधुदुर्गमध्ये नुकसानीचे पंचनामे सुरू सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात अतिवृष्टीने झालेल्या...
पुराचा वारंवार फटका बसणाऱ्या घरांच्या...सांगली : ज्या भागातील घरांना आणि रहिवाशांना...
रानभाज्यांचे आहारातील महत्त्वमहाराष्ट्रामध्ये स्थानिक वातावरणानुसार, तिथे...