Agriculture news in marathi ‘Proper use of online to deliver agricultural technology’ | Agrowon

‘कृषी तंत्रज्ञान पोहचविण्यासाठी ऑनलाइनचा योग्य उपयोग’

टीम अॅग्रोवन
सोमवार, 31 ऑगस्ट 2020

परभणी : ‘‘कोरोना साथीच्या पार्श्‍वभूमीवर शेतकऱ्यापर्यंत कृषी तंत्रज्ञान पोहचविण्यासाठी कृषी विद्यापीठ ऑनलाइन पध्‍दतीचा योग्‍यरितीने उपयोग करीत आहेत.

परभणी : ‘‘कोरोना साथीच्या पार्श्‍वभूमीवर शेतकऱ्यापर्यंत कृषी तंत्रज्ञान पोहचविण्यासाठी कृषी विद्यापीठ ऑनलाइन पध्‍दतीचा योग्‍यरितीने उपयोग करीत आहेत. हे कार्य अधिक प्रभावी, कार्यक्षमपणे करण्‍यासाठी सर्वांनी प्रयत्‍न करावे,’’ असे प्रतिपादन कुलगुरु डॉ. अशोक ढवण यांनी केले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या विस्तार शिक्षण परिषदेची २३ वी बैठक कुलगुरु डॉ. ढवण यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (ता.२८) झाली. शिक्षण संचालक डॉ. डी. एन. गोखले, संशोधन संचालक  डॉ. डी. पी. वासकर, विस्तार शिक्षण संचालक डॉ. डी. बी. देवसरकर, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी संतोष आळसे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

विस्तार उपक्रमात विद्यापीठातील सर्व महाविद्यालय, संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञांनी सक्रीय सहभाग घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. सहभागी मान्यवरांच्या सूचनेप्रमाणे राबविण्यात येणाऱ्या विस्तार उपक्रमांची दिशा निश्चित करण्यात आली. मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. व्ही. बी. कांबळे यांनी मागील बैठकीच्या कार्यवृत्तावरील कार्यवाही, विस्तार उपक्रमांचा अहवाल सादर केला. 

कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यु. एम. खोडके, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सय्यद इस्माईल, समुदाय विज्ञान महाविद्यालयाच्‍या प्राचार्या डॉ. जयश्री झेंड, उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. टी. बी. तांबे, विभाग प्रमुख डॉ. दिलीप मोरे उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. डी. डी. पटाईत यांनी केले. प्रा. वसंत ढाकणे, डॉ. संतोष चिक्षे आदींनी पुढाकार घेतला.


इतर ताज्या घडामोडी
शेतीमाल, दुग्धजन्य पदार्थ निर्यात...पुणे : कृषी व प्रक्रियायुक्त अन्न उत्पादन निर्यात...
बुडताना दिसले अन् काही क्षणांत दिसेनासे...वरुड, जि. अमरावती : डोळ्यांसमोर सारे बुडताना दिसत...
‘जनधन’मुळे मदत गरजूंपर्यंत : केंद्रीय...औरंगाबाद : जनधन, आधार आणि बँक खात्याशी मोबाईल...
पूर्वसूचना अर्ज भरण्यासाठी निलंग्यात...निलंगा, जि. लातूर : ऑफलाइन पद्धतीने विमा कंपनीस...
शेतकऱ्यांसाठी महावितरणने हप्ते बांधून...पुणे : कोरोनामुळे महावितरण कंपनीवरही आर्थिक ताण...
केंद्र्याच्या कृषी कायद्यांविरोधातील २७...कोल्हापूर : शेतकरीविरोधी कायदे मागे घ्यावेत,...
देवसंस्थांच्या जमिनीवर वहिवाटदारांचा...जेजुरी, जि. पुणे : देवसंस्थानच्या मालकीच्या...
पुरस्कारांच्या प्रस्तावावरून कृषी...अकोला : विविध पुरस्कारांसाठी शेतकऱ्यांनी दाखल...
कोयना धरणात १०१ टीएमसीवर पाणीसाठाकोयनानगर, जि. सातारा : शंभर दिवस ओलांडलेल्या...
उजनी धरणात उपयुक्त साठा ६४ टक्केच;...सोलापूर : उजनी धऱणाच्या पाणलोट क्षेत्रात अद्यापही...
अकोला जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा...अकोला ः जिल्ह्यात अतिपावसाने धुमाकूळ घातला असून...
राज्यात तीन अन्न प्रक्रिया प्रकल्पांचे...नाशिक : राज्यातील तीन अन्न प्रक्रिया प्रकल्पांचे...
वाशीम झेडपी निवडणुकीचा चेंडू पुन्हा...वाशीम : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रिक्त...
‘एफआरपी’च्या तुकड्यांनी शेतकरी...कऱ्हाड, जि. सातारा : एकरकमी ‘एफआरपी’चे तीन तुकडे...
हिंगोलीत मुहूर्ताच्या सोयाबीनला ११ हजार...हिंगोली : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत...
पीक नुकसान नोंदीसाठी विमा कंपन्यांच्या...परभणी : ७२ तासांच्या आत पीक नुकसानीची नोंद...
राज्यसभेच्या एका जागेसाठी ४ ऑक्टोबरला...नवी दिल्ली : महाराष्ट्रातून राज्यसभेवर रिक्त...
गणेशोत्सवासाठी सिंधुदुर्ग सज्ज; तीन...सिंधुदुर्गनगरी : घरोघरी गणेशोत्सव साजरा करण्याची...
ई-पीक पाहणीसाठी सोलापुरचे जिल्हाधिकारी...सोलापूर ः माढा तालुक्यात सुरू असलेल्या ई-पीक...
परभणी जिल्ह्यात १२७ गावे बाधितपरभणी ः जिल्ह्यात सोमवार (ता. ६) ते मंगळवार (ता....